
उन्हाळ्यात जनावरांना चरायला (grazing) सोडल्यानंतर जर त्यांनी विषारी गवत खाल्ले तर त्यांना विषबाधा होण्याची शक्यता असते. तशीच शक्यता जनावरे चरत असताना सर्पदंश होण्याची असते. काही वेळेस गोठ्याच्या भोवताली अस्वच्छता असल्यास, अशा ठिकाणी साप आडोसा घेण्याची शक्यता वाढते. जनावरे चरत असताना, मानेवर, तोंडाला, पायाला किंवा शेपटीला सर्पदंश (snake bite) होण्याची दाट शक्यता असते. या सर्पदंशाच्या खुणा वेळेत पशुपालकांच्या लक्षात न आल्यास, जनावरांच्या मज्जातंतूवर परिणाम होतो. श्वसनक्रिया बंद होऊन, जनावरे दगावण्याची दाट शक्यता निर्माण होते. यासाठी पशुपालकांनी जनावरांना चारून आणल्यानंतर त्यांचे बारीक निरीक्षण केले पाहिजे.
सर्पदंशाची दाहकता ठरविणारे घटक-
- सापाचा प्रकार- विषारी, निमविषारी आणि बिनविषारी असे तीन प्रकार येतात.
- सापाचा आकार- जेवढा सापाचा आकार मोठा तेवढी विष पसरण्याची क्षमता अधिक असते.
- चाव्यांची संख्या- जनावरांना पहिल्यांदा घेतलेल्या चाव्याची दाहकता अधिक असते. त्यानंतरच्या चाव्यांची दाहकता काही प्रमाणात कमी असते.
- जनावरांचा प्रकार- गायी-म्हशीपेक्षा शेळीमध्ये सर्पदंश पसरण्याचे प्रमाण अधिक असते. शेळीच्या शरीराचा आकार लहान असल्याने सापाने चावा घेतल्यानंतर त्याची दाहकता शरीरात लवकर पसरते.
- जनावराचे वय- तरुण जनावरांच्या तुलनेत वयस्कर जनावरांमध्ये विष पसरण्याचा कालावधी कमी असतो.
- चावा घेतल्याची जागा – सापाने दंश केल्याची जागा जेवढी हृदय आणि मेंदूच्या जवळ असते त्या परिणामात सर्पदंशाची परिणामकारकता अधिक असते. जनावराला मागील शेपटीला किंवा पायाला चावा घेतल्याची सर्पदंश दाहकता पुढील पायाला चावा घेतल्याच्या तुलनेने कमी असते.
जनावरांना साप चावल्याचे निदान कसे करावे-
- सर्पदंश झालेले जनावर अस्वस्थ आणि बैचेन होते.
- जनावर एकसारखे डोके हालवते.
- जनावर पाय झटकायला लागते.
- जनावर उड्या मारू लागते.
- विषारी सापाने चावा घेतलेला असल्यास जनावर सैरभर पळत सुटते.
सर्पदंश झाल्यावर कोणते उपाय कराल-
- सर्पदंश झाल्यावर विष जनावरांच्या रक्तात मिसळून ते पूर्ण शरीरभर पसरण्याची शक्यता असते.
- जनावरांना सर्पदंश झाल्याचे लक्षात आल्यानंतर पशुवैद्यक येईपर्यंत विष शरीरात पसरू नये यासाठी उपाय करावेत.
- यासाठी सर्वप्रथम सर्पदंश झालेल्या ठिकाणच्या वरील बाजूस दोरीने घट्ट बांधावे. असे केल्यास विष शरीरात पसरण्यास अटकाव घालण्यास मदत होईल.
- दंश झालेल्या ठिकाणी नवीन निर्जंतुक ब्लेडने काप द्यावा. पण काप देताना त्याची खोली जास्त असू नये.
- असे केल्यास विष शरीरात न पसरता रक्तप्रवाहाबरोबर बाहेर निघून जाण्यास मदत होईल.
- जखमेतून पुरेसा रक्तप्रवाह झाल्यानंतर त्यावर पोटॅशियम परमॅग्नेट लावावे. यामुळे रक्तप्रवाह आटोक्यात येण्यास मदत होईल.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.