डॉ. अजित माळी, डॉ. चेतन क्षीरसागर Goat Nutrition: लवकर गर्भनिदान केल्यामुळे कमी वेळात जास्त पिले आणि निरोगी कळप राखणे शक्य होते, ज्यामुळे पशुपालकाचा नफा वाढतो. शेळी गाभण असल्याचे लवकर समजल्यास तिला सुरुवातीपासूनच प्रथिने, खनिजे आणि जीवनसत्त्वयुक्त आहार देता येतो..गर्भधारणेचे लवकर निदान आणि गर्भ संख्या निश्चित करणे हे शेळी व मेंढी उत्पादकांना आर्थिकदृष्ट्या फायदेशीर आहे. गर्भधारणेचे निदान करण्यासाठी वापरली जाणारी पद्धत सोपी, अचूक, जलद, स्वस्त, व्यावहारिक आणि ऑपरेटर व प्राण्यांसाठी सुरक्षित असावी..Goat Farming: मांस उत्पादनासाठी स्थानिक शेळ्यांच्या जातीच ठरतात अधिक फायदेशीर.गर्भधारणा निदानासाठी पद्धतीबाह्य लक्षणेसुरुवातीच्या काळात लक्षणे ओळखणे कठीण असते, परंतु तीन महिन्यांनंतर खालील बदल दिसतात.माजावर न येणे : रेतन झाल्यानंतर १८ ते २१ दिवसांनी शेळी पुन्हा माजावर आली नाही, तर ती गाभण असण्याची दाट शक्यता असते..पोटाचा आकार वाढणे : ३ ते ४ महिन्यांनंतर पोटाचा भाग मोठा दिसू लागतो.कासेचा विकास : पहिल्यांदा गाभण राहणाऱ्या शेळ्यांमध्ये विण्यापूर्वी १ ते २ महिने आधी कास तयार होऊ लागते.स्वभावात बदल : गाभण शेळी शांत होते आणि जास्त हालचाल टाळते..तपासणीच्या शास्त्रीय पद्धतीबॅलोटमेंटशेळीच्या उजव्या कुशीत पोटाच्या खालच्या बाजूला हाताने हलका धक्का दिल्यास आत पिलू असल्याचा भास होतो. ही पद्धत साधारण १०० दिवसांनंतर वापरली जाते. नवीन असल्यास पोटावर जोरात दाब देऊ नका, यामुळे गर्भपात होऊ शकतो. अनुभवी पशुवैद्यकाकडूनच तपासणी करून घ्यावी..अल्ट्रासोनोग्राफीशेळी/मेंढ्यांमध्ये गर्भधारणा निश्चित करण्यासाठी सामान्यतः अल्ट्रासोनोग्राफी केली जाते. या तपासणीमध्ये गर्भाशयातील गर्भ आणि प्लेसेंटोम्स स्पष्टपणे दिसून येतात. सोनोग्राफी ही गर्भधारणा तपासण्यासाठी जलद, सुरक्षित आणि विश्वासार्ह पद्धत आहे. साधारणपणे ३० दिवसांपासून गर्भधारणा ओळखता येते. रेडिओग्राफी आणि सोनोग्राफी या दोन्ही पद्धतींच्या मदतीने गर्भधारणा तसेच गर्भांची संख्या निश्चित करता येते. मात्र सोनोग्राफी ही अधिक सुरक्षित आणि तुलनेने कमी खर्चिक पद्धत असून, गर्भ जिवंत आहे की नाही हे देखील तपासता येते. गर्भाची क्राउन-टू-रंप लांबी, बायपॅरिएटल व्यास आणि प्लेसेंटोम्स दिसण्यावरून गर्भावस्थेचे वय अंदाजे निश्चित करता येते..रेडिओग्राफीशेळी आणि मेंढीमध्ये गर्भधारणा तपासण्यासाठी रेडिओग्राफी ही एक जुनी आणि अत्यंत अचूक पद्धत आहे. विशेषतः पिलांची नेमकी संख्या मोजण्यासाठी या पद्धतीचा वापर केला जातो.७० दिवसांनंतर ही पद्धत जवळ जवळ १०० टक्के अचूक निकाल देते. वारंवार एक्स-रे काढल्यास किंवा चुकीच्या पद्धतीने वापर केल्यास रेडिएशनचा मादी आणि गर्भावर परिणाम होऊ शकतो..Pregnant Goat Care: पावसाळ्यात गाभण शेळ्यांची काळजी कशी घ्याल?.गाभण काळ ओळखण्याचे फायदेशेळी आणि मेंढीपालनामध्ये गाभण काळ लवकरात लवकर ओळखणे हे फायदेशीर व्यवसायासाठी अत्यंत गरजेचे आहे.आहार व्यवस्थापन : शेळी गाभण असल्याचे लवकर समजल्यास तिला सुरुवातीपासूनच प्रथिने, खनिजे आणि जीवनसत्त्वयुक्त आहार देता येतो. गाभण काळातील शेवटच्या ५ ते ६ आठवड्यांत पिलांची वाढ वेगाने होते. लवकर निदान झाल्यास या काळात शेळीला ‘स्टीमिंग अप’ आहार देऊन सशक्त पिले जन्माला घालण्यास मदत होते..आर्थिक बचत : ज्या माद्या गाभण नाहीत, त्यांना गाभण शेळ्यांसारखा महागडा खुराक देण्याची गरज नसते. अशा माद्यांना ओळखून त्यांचा खाद्याचा खर्च कमी करता येतो. जर एखादी शेळी वारंवार प्रयत्न करूनही गाभण राहत नसेल, तर तिचे लवकर निदान करून तिला कळपातून काढून टाकणे किंवा विकणे फायदेशीर ठरते.पुनरुत्पादन कार्यक्षमता : जर शेळी गाभण नसल्याचे ३० ते ४० दिवसांत समजले, तर तिला लगेच दुसऱ्या माजावर असताना रेतन करता येते. यामुळे दोन वेतांमधील अंतर कमी होते..गर्भपात प्रतिबंध : गाभण शेळ्यांना इतर शेळ्यांपासून वेगळे ठेवल्यास त्यांना इजा होण्याची किंवा धक्काबुक्कीमुळे गर्भपात होण्याची शक्यता कमी होते.पिलांची संख्या : आधुनिक पद्धतींमुळे (उदा. सोनोग्राफी) आत एक पिलू आहे की जुळी/तिळी आहेत हे समजते..प्रजनन विकारांचे निदानसुरुवातीचा गर्भमृत्यू ः अनेकदा गर्भाची वाढ सुरुवातीच्या काळात थांबते आणि गर्भ दगावतो. सोनोग्राफी तपासणीमध्ये गर्भाच्या हृदयाचे ठोके थांबलेले दिसतात.हायड्रोमेट्रा ः हा आजार विशेषतः शेळ्यांमध्ये अधिक आढळतो. याला खोटी गर्भधारणा असे म्हणतात. यामध्ये गर्भाशय द्रवाने भरलेले असते, परंतु त्यात गर्भ नसतो..पायोमेट्रा ः हा देखील शेळ्यांमध्ये आढळणारा गर्भाशयाचा आजार आहे. यामध्ये गर्भाशयामध्ये पूयुक्त द्रव जमा होतो. पायोमेट्रा मध्ये गर्भ नसतो, आणि यामुळे शेळीमध्ये प्रजननक्षमता कमी होऊ शकते.अंडाशयातील संरचनांचे परीक्षण ः प्रजननाशी संबंधित समस्यांचे मूळ शोधण्यासाठी अंडाशयाची तपासणी महत्त्वाची असते. फॉलिक्युलर वेव्हज, कॉर्पस ल्युटियम, अंडाशयावरील गाठी.- डॉ. चेतन क्षीरसागर, ९०९६८२०८६७(पशुप्रजनन शास्त्र विभाग, क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.