Animal Vaccination : जनावरांच्या लसीकरणामुळे टळले आजारांचे संकट

Animal Care : गुरांना लाळ खुरकत या विषाणूजन्य आजाराची लागण झाल्यानंतर उद्भवणारा धोका लक्षात घेता, लसीकरणाची मोहीम तालुक्यात राबविण्यात आली.
Animal Vaccination
Animal VaccinationAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News : हिवाळ्यापूर्वी जनावरांना विविध आजारांची लागण होऊ नये, यासाठी पशुवैद्यकीय विभागातर्फे लसीकरण केले जाते. चाळीसगाव तालुक्यात जनावरांना विशेषतः लाळखुरकत रोगाची लागण होण्याची शक्यता लक्षात घेता, ४५ दिवसांत तब्बल एक लाख २४ हजार जनावरांचे १०० टक्के लसीकरण करण्यात आल्याची माहिती येथील पशुवैद्यकीय विभागाने दिली.

लाळखुरकत रोगाच्या प्रादुर्भावाने जनावरांचा मृत्यू होण्याची भीती असते. शिवाय, गाय व म्हैस यांसारख्या जनावरांच्या दुधात घट होण्याची भीती असते. त्यामुळे वर्षातून दोन वेळा ही प्रतिबंधक लस देण्याचे नियोजन पशुवैद्यकीय विभागाने केले आहे.

Animal Vaccination
Animal Vaccination : बारामतीत ६१ हजार जनावरांचे लसीकरण

गुरांना लाळ खुरकत या विषाणूजन्य आजाराची लागण झाल्यानंतर उद्भवणारा धोका लक्षात घेता, लसीकरणाची मोहीम तालुक्यात राबविण्यात आली. गायी व म्हशींना येथील पशुवैद्यकीय दवाखान्यातून लसीकरण करण्याची व्यवस्था करण्यात आली होती. याशिवाय ठिकठिकाणच्या गुरांच्या दवाखान्यातही लसीकरणाचे नियोजन करण्यात आले.

Animal Vaccination
Animal Vaccination : पशुसंवर्धन विभागामार्फत रेबीज रोगप्रतिबंधात्मक लसीकरण

त्यामुळे अवघ्या ४५ दिवसांत १०० टक्के लसीकरण झाल्याचा दावा तालुका पशुधन अधिकारी डॉ. संदीप भट यांनी केला आहे. लाळ खुरकत रोग हा आर्थिक नुकसान करणारा रोग असल्याने वेळेत प्रतिबंधात्मक उपाय करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, गुरांचे लसीकरण झाल्यानंतर त्यांना पुरेशी सावली असलेल्या ठिकाणी बांधावे. त्यांना भरपूर पाणी पाजावे, बैलांना एक दिवस विश्रांती द्यावी, कामाला जुपू नये असेही डॉ. भट यांनी ‘सकाळ’शी बोलतांना सांगितले.

वर्षातून दोन वेळा लसीकरण

चाळीसगाव तालुक्यातील जनावरांसाठी लाळखुरकत या विषाणूजन्य आजाराच्या एक लाख २८ हजार ७०० प्रतिबंधात्मक लस शासनाकडून प्राप्त झाल्या होत्या. म्हैस व गायवर्गीय जनावरांना ४५ दिवसांच्या कालावधीत तालुक्यातील सर्व शासकीय पशुवैद्यकीय रुग्णालयांतून तसेच खासगी पशुवैद्यकीय अधिकारी असे एकूण २२ कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून जनावरांचे लसीकरण करण्यात आले. यात एक लाख ७०० गायींना, तर २३ हजार ३०० म्हशींना लस देण्यात आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com