Cow Heat Stress : गाईंसाठी दिवस - रात्र शीतकरण प्रणाली ठरते अधिक फायदेशीर

Animal Care : सामान्यतः कुरणामध्ये फिरत्या स्वरूपामध्ये व्यवस्थापन केल्या जाणाऱ्या दुधाळ गाईंमध्ये त्या संध्याकाळी गोठ्यात आल्यानंतर त्यांच्यावरील उष्णतेचे ताण कमी करण्यासाठी काही यंत्रणा राबवणे सोपे असते.
Animal Care
Animal CareAgrowon

Cow Milk Production : सामान्यतः कुरणामध्ये फिरत्या स्वरूपामध्ये व्यवस्थापन केल्या जाणाऱ्या दुधाळ गाईंमध्ये त्या संध्याकाळी गोठ्यात आल्यानंतर त्यांच्यावरील उष्णतेचे ताण कमी करण्यासाठी काही यंत्रणा राबवणे सोपे असते. मात्र दिवसा कुरणामध्ये चरत असलेल्या कळपांबाबत मर्यादित पायाभूत सुविधांच्या अभावी शीतकरणाचे पर्याय वापरता येत नाहीत. परिणामी, दिवसाच्या उष्ण हवामानाचा दुग्धोत्पादन जनावरांच्या आरोग्यावर आणि कळपाच्या एकूण दूध उत्पादनावर मोठा परिणाम होतो.

ज्या गाईंचे व्यवस्थापन एका जागी गोठ्यामध्ये केले जाते, तिथे शेड, पंखे, स्प्रिंकलर्स किंवा अशा काही उपाययोजनांच्या मिश्रणातून उष्णतेचा ताण टाळता येतो. पूर्वी या सुविधा दिवसातील काही काळ चालवल्या जात. मात्र सध्या ऑस्ट्रेलियातील अनेक डेअरी उत्पादक विविध प्रकारच्या प्रभावी शीतकरण प्रणालींचा वापर दररोज २४ तास करण्याचा कल वाढत आहे. या नव्या तंत्राचे प्रभावीपण आणि फायदे, तोटे यांचा अभ्यास क्वीन्सलॅंड विद्यापीठातील संशोधकांनी केला आहे. त्यांच्या अभ्यासाचे निष्कर्ष ‘एल्सवियर’ यांच्या ‘जर्नल ऑफ डेअरी सायन्स’मध्ये नुकतेच प्रकाशित करण्यात आले आहेत.

त्या विषयी माहिती देताना क्वीन्सलँड विद्यापीठातील कृषी आणि अन्न शाश्‍वतता विद्यालयाचे जॉन बी. गौघन यांनी सांगितले, की तार्किकदृष्ट्या ज्ञात असलेल्या बाबीनुसार वातावरणातील तापमान चांगले असल्याच्या स्थितीमध्ये दुभत्या गायी रात्रीच्या वेळी शरीरातील उष्णता चांगल्या प्रकारे विसर्जित करू शकतात. परंतु दुभत्या गाईंसाठी थंड करण्याच्या धोरणांवर प्रकाशित केलेल्या बहुतेक अभ्यासामध्ये शेडमध्ये असलेल्या गाईंवर लक्ष केंद्रित केले आहे.

तर मांसासाठी व्यवस्थापन करणाऱ्या अभ्यासकांच्या मते, उष्णतेच्या तणावाचा सामना करण्यासाठी प्राण्यांवरील रात्रीच्या काळातील उष्णता भार कमी करणे महत्त्वाचे आहे. अशा गाईंचे व्यवस्थापन सामान्यतः मर्यादित यार्ड क्षेत्रातील चराईद्वारे पुरेसा व नियमित आहार मिळेल, अशा प्रकारे केले जाते.

Animal Care
Bamboo Farming : बांबू शेती खरेच फायदेशीर ठरते का?

...असा झाला अभ्यास
आतापर्यंत झालेल्या अभ्यासातील या मर्यादांवर मात करण्यासाठी गौघन आणि त्यांच्या गटाने संशोधन सुरू केले. त्यासाठी त्यांनी उन्हाळ्यातील उच्च तापमानातही बाहेर चराईवर असलेल्या १२० एचएफ गाई असलेल्या कळपाच्या आरोग्यावर दिवसा थंड वातावरण आणि सोबतच रात्री थंड वातावरण सुमारे १०६ दिवसांच्या कालावधीत देण्याचेही परिणाम तपासण्यात आले. त्यासाठी या कळपाचे दोन भाग करून दोन स्वतंत्र थंड उपचार दिले.

गाई गोठ्यामध्ये असताना ओव्हरहेड स्प्रिंकलर आणि पंखे, तसेच दूध काढताना गायींवर वाहणारी हवा, फीडपॅडवर असताना सावली आणि पंखे आणि छायांकित क्षेत्राद्वारे दिवसाही कळपाचे तापमान थंड ठेवण्यात आले. दिवसासोबतच रात्रीच्या वेळीही एका कळपाला गाईंवर पंख्याने हवा खेळती ठेऊन त्यांना थंड ठेवण्यात आले. हे कळप चराईसाठी बाहेर पडताना फवाऱ्याद्वारे संपूर्ण ओले केले जाते. दुधाचे उत्पादन, पचन संस्थेचे (रुमेन) तापमान आणि शरीराचे तापमान यांच्या नियमित नोंदी घेण्यात आल्या.

Animal Care
Cow Hug Day : ‘गाय अलिंगन दिवस’ टीकेनंतर अखेर मागे

अशा प्रकारे रात्रभर मोकळ्या स्वरूपामध्येही गाईंना थंड वातावरण देण्यासाठी वाहिनीद्वारे हवा पुरविण्याच्या तंत्राची संभाव्यता तपासणारा हा पहिला अभ्यास असल्याचे गौघन यांनी स्पष्ट केले.
या संपूर्ण अभ्यासात दर १० मिनिटांच्या अंतराने रेडिओ-ट्रान्समिटिंग बोलस (bolus) वापरून रुमेन तापमानाचे निरीक्षण केले. त्याच प्रमाणे गाईंची क्रियाशीलता, त्यांची हालचाल, कोरड्या चाऱ्याचे सेवन आणि एकूण दुधाचे उत्पादन यांच्या नोंदी घेतल्या.

या अभ्यासाच्या कालावधीत, वाढवलेल्या शीतकरण गटातील गायींनी अधिक दूध उत्पादन दिले. तर केवळ दिवसा शीतकरण प्राप्त करणाऱ्या गाईंच्या तुलनेत पचनसंस्थेचे (रुमेन) तापमान आणि हालचाल कमी होते. संपूर्ण अभ्यासादरम्यान या वाढवलेल्या शीतकरण गटातील गाईंनीही दिवसा थंड होणाऱ्या गाईंपेक्षा जास्त वेळ झोपून काढला.

आर्थिकदृष्ट्याही फायदेशीर ठरू शकेल...

गौघन म्हणाले, की शॉवर अॅरे आणि डक्टेड एअर सिस्टिमच्या
संयोजनाचा दूध उत्पादन आणि गाईच्या कल्याणावर फायदेशीर परिणाम दिसला. फीडपॅडवर शीतकरण यंत्रणा व्यवस्थापित केलेल्या बाहेरील कळपांसाठीही हे एक किफायतशीर धोरण असल्याचे स्पष्ट झाले.
या अभ्यासात वापरल्या गेलेल्या डक्ट सिस्टिमची किंमत अंदाजे ३१,५०० ऑस्ट्रेलियन डॉलर होती. या पद्धतीमुळे मिळालेल्या अधिक दुधातून २१,३०८ ऑस्ट्रेलियन डॉलर इतके उत्पन्न मिळाले. म्हणजे डक्टच्या स्थापनेसाठी झालेल्या खर्चातील ६७.७ टक्के पहिल्या उन्हाळ्यातील वाढलेल्या उत्पन्नातून वसूल झाले. त्यामुळे भविष्यामध्ये वाढत्या तापमानाच्या स्थितीमध्ये अशा प्रकारची वर्धित दिवस-अधिक-रात्रीची शीतकरण प्रणाली बाहेरील चराऊ कळपांचे आरोग्य अबाधित ठेवतानाच वाढीव उत्पादन आणि नफा मिळवून देऊ शकेल, हे स्पष्ट झाल्याचे गौघन यांनी सांगितले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com