Lumpy Skin Update : नगर जिल्ह्यात ‘लम्पी स्कीन’ला आळा

Lumpy Skin Disease : शेतकरी, तसेच सरकारी यंत्रणेची झोप उडवणाऱ्या लम्पी स्कीन या जनावरांच्या आजाराने जिल्ह्यातून काढता पाय घेतला आहे.
Lumpy Skin
Lumpy SkinAgrowon
Published on
Updated on

Nagar News : शेतकरी, तसेच सरकारी यंत्रणेची झोप उडवणाऱ्या लम्पी स्कीन (lumpy Skin) या जनावरांच्या आजाराने जिल्ह्यातून काढता पाय घेतला आहे. एप्रिल महिन्यात केवळ ३३ जनावरे बाधित आढळून आली आहेत. राज्यात नगरमध्ये सर्वाधिक प्रादुर्भाव होता.

कर्जत, श्रीगोंदे, संगमनेर तालुक्यांत बाधित जनावरांची संख्या मोठी होती. युद्धपातळीवर केलेले लसीकरण, शासनाकडून राबविण्यात आलेल्या उपक्रमांमुळे लम्पीच्या प्रादुर्भावास आळा बसला असल्याचे दिसून येत आहे.

नगर जिल्ह्यात आतापर्यंत ५६ हजार ५५९ जनावरे बाधित झाली आहेत. ५२ हजार १४६ बरी झालीत. तब्बल ४ हजार ३८४ जनावरे दगावली. कर्जत आणि श्रीगोंदे तालुक्यांत लम्पीने जनावरे दगावण्याचे प्रमाण सर्वाधिक होते.

सीना व भीमा नदी परिसरांत बाधितांची संख्या मोठी होती. केंद्राच्या पथकानेही याच परिसराला भेट दिली होती. प्रतिजैविकाऐवजी बाधित जनावरांचे एका भागातील रक्त काढून दुसऱ्या भागात टोचवण्याचा प्रयोग केला जात होता. या उपचारपद्धतीचा चांगला फायदा झाला.

Lumpy Skin
Lumpy Skin : ‘लम्‍पी स्कीन’ने आतापर्यंत १२८० जनावरांचा मृत्यू

नगर,जिल्ह्यात तब्बल १५ लाख जनावरांना लसीकरण करण्यात आले आहे. दिवाळीच्या दिवसांत लम्पी स्कीनने शेतकरी मेटाकुटीस आले होते.

डिसेंबरनंतर पाऊस उघडल्यावर लम्पी आटोक्यात येऊ लागला. जानेवारी- फेब्रुवारीत बाधित जनावरांचे प्रमाण कमी झाले. मार्च महिन्यात जिल्ह्यात ३३३ बाधित जनावरे होती. या महिन्यात केवळ १६ बाधित आहेत. एकूण बाधितांचा आकडा ३३ आहे.

४,३८४ पशुपालकांना भरपाई

लम्पी स्कीनने जनावर दगावल्यास सरकारकडून आर्थिक मदत दिली जाते. त्यानुसार दुभत्या जनावरास ३० हजार, बैल २५ हजार, तर वासरासाठी १६ हजार रुपयांची तरतूद आहे.

जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून काही शेतकऱ्यांना मदत देण्यात आली. आतापर्यंत मृत ४, ३८४ जनावरांपोटी शेतकऱ्यांना भरपाई देण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com