जनावरांसाठी मॉन्सूनपूर्व लसीकरण करून घ्यावे

बारामती तालुक्यातील दुभत्या जनावरांसाठी न्युट्रीफीड आणि शुगरगेजचे उपलब्ध झालेले बियाणे यांचेही वाटप करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी जनावरे सृदृढ राहण्यासाठी सकस चाऱ्यावर भर देण्याचे आवाहन या वेळी डॉ. पाटील यांनी केले आहे.
Animal Care
Animal CareAgrowon

मोरगाव, ता. बारामती ः पशुधनाच्या (Livestock) संतुलित आरोग्यासाठी (Animal Health) मॉन्सूनपूर्व लसीकरण (Pre-monsoon Vaccination) सुरू असून, प्रत्येक पशुपालकाने जबाबदारीने पशुधनाच्या आरोग्यासाठी लसीकरण (Animal Vaccination) करून घ्यावे, असे आवाहन बारामती पंचायत समितीचे पशुधन विस्तार अधिकारी डॉ. आर. आर. पाटील यांनी केले आहे.

पशुधनाची प्रतिकारक्षमता वाढण्यासाठी व कोणत्याही रोगापासून सुरक्षित राहण्यासाठी हंगामाप्रमाणे नियमित लसीकरण करून घेणे गरजेचे आहे. बारामती तालुक्यातील प्रत्येक पशुवैद्यकीय केंद्रांतर्गत मोफत लसीकरण दिले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांनी लसीकरणासाठी योग्य तो प्रतिसाद देणे गरजेचे आहे. गाय, म्हैस या मोठ्या जनावरांसाठी घटसर्पावरील १४,५०० लसीकरण, फऱ्यावरील १,१०० लसीकरण, शेळ्या मेंढ्यामध्ये आढळणाऱ्या आंत्रविषार आजारावर १३,५०० लसीकरण, कोंबड्यांमध्ये आढळणाऱ्या मानमोडी आजारावर १६,००० लसीकरण, तर देवी आजारावर १७,००० लसीकरण, तसेच मोठ्या जनावरांमध्ये आढळणाऱ्या ब्रुसेलोसिस या आजारावर २६, ३०० लसीकरण असे उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण करण्याचे नियोजन तालुकास्तरावरून केले आहे.

बारामती तालुक्यातील दुभत्या जनावरांसाठी न्युट्रीफीड आणि शुगरगेजचे उपलब्ध झालेले बियाणे यांचेही वाटप करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी जनावरे सृदृढ राहण्यासाठी सकस चाऱ्यावर भर देण्याचे आवाहन या वेळी डॉ. पाटील यांनी केले आहे.

मोरगाव पशुधन विकास केंद्राच्या अंतर्गत असलेल्या पन्नास टक्के जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले असून, शंभर टक्के लसीकरण पूर्ण करण्याचे नियोजन केले असल्याची माहिती पशुधन विकास अधिकारी डॉ. औदुंबर गावडे यांनी दिली.

बारामती पंचायत समितीचे आवाहन

सध्या प्रत्येक पशुधन विकास केंद्राच्या कार्यक्षेत्रात पशुपालकांच्या गोठ्यावर जाऊन लसीकरण करून घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. वेळेत लसीकरण पूर्ण करण्यासाठी व कोणतीही जनावरे लसीकरणापासून वंचित राहू नये, यासाठी पशुपालकांनी पशुधन केंद्राशी संपर्क करावा. बारामती तालुक्यात चोवीस ठिकाणी पशुधन विकास केंद्रे असून, शेतकऱ्यांनी पशुधनविकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. तसेच मॉन्सूनपूर्व लसीकरण वेळेत पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन बारामती पंचायत समितीकडून करण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com