Weekly Market: जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या येथील उपबाजारात गुरुवारी (ता. २१) झालेल्या गाईंच्या बाजारात ६५ लाख रुपयांची उलाढाल झाली. बाजारात आलेल्या ३५६ गाईंपैकी ३२४ गाईंची विक्री झाली असून, प्रतवारीनुसार ५ हजार ते ७० हजार रुपयांपर्यंत बाजारभाव मिळाला..येथील बाजारात अहिल्यानगर, नाशिक आणि ठाणे जिल्ह्यातून शेतकरी खरेदी-विक्रीसाठी येतात. बाजार समितीचे सभापती संजय काळे, उपसभापती प्रितम काळे, सचिव रूपेश कवडे व सतीष म्हस्करे यांनी ही माहिती दिली..Agriculture Market Update: कोथिंबीर, मेथीच्या दरात सुधारणा.दरम्यान, जुन्नरच्या पूर्व भागातील राजुरी, आळे, वडगाव आनंद या परिसरात दुग्धव्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो. मात्र, सध्या कडक उन्हाळ्यामुळे चाऱ्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. .Livestock Compensation: राज्य सरकारचा मोठा निर्णय; अतिवृष्टीमुळे दगावलेल्या सर्वच पशुधनासाठी मिळणार मदत.दुधाचे दर जेमतेम आणि पशुखाद्याचे भाव वाढलेले असतानाही शेतकरी शेतीपूरक खतासाठी हा व्यवसाय टिकवून आहेत. .या पार्श्वभूमीवर शासनाने तातडीने चारा डेपो सुरू करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.