Lumpy Skin : राजापुरात ४१ जनावरे लम्पी बाधित

Ratnagiri Lumpy Update : गेल्या तीन-चार महिन्यांपासून थैमान घालणाऱ्या आणि जनावरांत प्रादुर्भाव झालेल्या लम्पी स्कीन या त्वचा आजाराने तालुक्यात पुन्हा डोके वर काढले आहे.
Lumpy skin disease
Lumpy skin diseaseAgrowon
Published on: 
Updated on: 

Ratnagiri News : गेल्या तीन-चार महिन्यांपासून थैमान घालणाऱ्या आणि जनावरांत प्रादुर्भाव झालेल्या लम्पी स्कीन या त्वचा आजाराने तालुक्यात पुन्हा डोके वर काढले आहे. गेल्या काही दिवसांमध्ये सहा जनावरे मृत्यूमुखी पडली आहेत तर, ४१ जनावरे लम्पी स्कीन बाधित आहेत. १६ जनावरे बरी झाली आहेत.

जानेवारी-फेब्रुवारीत लम्पी स्कीनचा संसर्ग वाढला होता. त्या काळामध्ये तालुक्यातील दीडशेहून अधिक जनावरे बाधित होती. प्रादुर्भाव रोखण्यासाठी पशुवैद्यकीय विभागाकडून उपाययोजना करण्यात आल्या. आजाराला प्रतिबंध करणारी लसही टोचण्यात आली. त्यामुळे तालुक्यात लम्पी स्कीन आजार काहीसा आटोक्यात आला.

Lumpy skin disease
Lumpy Skin : खानदेशात लसीकरणानंतरही ‘लम्पी’चा विळखा वाढला

त्यानंतर, गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा आजाराने डोके वर काढले आहे. तालुक्यातील विविध भागांतील गावांमधील ६७ जनावरांत गेल्या काही दिवसांमध्ये आजाराचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यापैकी सद्यःस्थितीत ६ जनावरे मृत्यूमुखी पडल्याची माहिती तालुक्याचे पशुवैद्यकीय अधिकारी किनरे यांनी दिली.

Lumpy skin disease
Nashik Lumpy Skin : नाशिक ‘लम्पी स्कीन’बाधित जिल्हा म्हणून घोषित

तर १६ जनावरे उपाचाराअंती बरी झाली असून, अद्याप ४१ जनावरे बाधित आहेत. मृत्यूमुखी पडलेल्या जनावरांच्या मालकांना शासनाकडून नुकसान भरपाईपोटी मदत केली जाणार आहे.

त्यामध्ये गायीसाठी ३० हजार, बैलासाठी २५ हजार आणि लहान वासरासाठी १६ हजार रुपये अनुदानाचा समावेश आहे. आजाराचा संसर्ग होऊन मृत्यूमुखी पडलेल्या २० जनावरांच्या मालकांनी शासनाकडे प्रस्ताव सादर केले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.