Lumpy Skin : ‘लम्पी स्कीन’मुळे दोन महिन्यांत सांगलीत २३३ जनावरे दगावली

Animal died Due to Lumpy : आतापर्यंत गेल्या दोन महिन्यांत ३६०१ जनावरे या संसर्गजन्य विषाणूने बाधित झाली आहेत.
Lumpy Skin
Lumpy SkinAgrowon

Sangli News : जिल्ह्यात जुलैपासून पुन्हा लम्पी स्कीन या त्वचा आजाराचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. आतापर्यंत गेल्या दोन महिन्यांत ३६०१ जनावरे या संसर्गजन्य विषाणूने बाधित झाली आहेत. त्यापैकी २३३ जनावरे या आजाराने दगावली आहेत. गो वंशीय जनावरांमधील आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्यांचे शंभर टक्के लसीकरण करण्यात आले आहे.

Lumpy Skin
Nashik Lumpy Skin : नाशिक ‘लम्पी स्कीन’बाधित जिल्हा म्हणून घोषित

जिल्ह्यात गतवर्षी लम्पी स्कीन आजाराची पहिली लाट आली होती. त्यानंतर लाट ओसरली होती. या काळात गो वंशीय जनावरांना तातडीने लसीकरण करण्यात आले होते. गाय, बैल, वासरू या गो वंशीय जनावरांची संख्या ३ लाख २४ हजार ७५६ इतकी आहे.

जुलैमध्ये पुन्हा एकदा लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव होण्यास सुरुवात झाली आहे. दोन महिन्यांत ३६०१ जनावरांत आजाराचा प्रादुर्भाव झाला आहे. प्रादुर्भाव वाढू नये यासाठी लसीकरण सुरू करण्यात आले होते.

Lumpy Skin
Lumpy Skin : खानदेशात लसीकरणानंतरही ‘लम्पी’चा विळखा वाढला

गेल्या आठवड्यात ६५ टक्के लसीकरण पूर्ण झाले होते. परंतु वाढत्या प्रादुर्भाव लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने जनावरांना तातडीने लसीकरण करण्याची मोहीम रावबा, अशा सूचना पशुसंवर्धन विभागाला दिल्या होत्या. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाने लसीकरण मोहीम राबवून शंभर टक्के लसीकरण केले.

जिल्ह्यात ३६०१ जनावरांना रोगाची लागण झाली असून त्यापैकी १७६८ जनावरे बरी झाली आहेत. १६०० जनावरांवर उपचार सुरू आहेत. तर २३३ जनावरे या आजाराने दगावली आहेत.

लम्पी स्कीनमुळे मृत्यू झालेल्या जनावरांना शासन आदेशानुसार मदत देण्यात येणार आहे. ज्या पशुपालकांची जनावरे दगावली आहेत. अशा पशुपालकांनी मदतीसाठी प्रस्ताव सादर केले आहेत, अशी माहिती पशुसंवर्धन विभागातून देण्यात आली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com