Desi Product Agrowon
यशोगाथा

Gomay Product : गोमय उत्पादनांमध्ये तयार झाली ओळख

एकनाथ पवार

Desi Cattle Rearing : महादेव शिर्के हे मुंबईतील एका खासगी कंपनीत नोकरीला होते. मुंबईमध्ये नोकरी करीत असतानाच त्यांना देशी गोवंश संगोपनात रस वाटू लागला. गोपालन आणि शेण, गोमूत्र आणि दुधापासून विविध उत्पादनांच्या निर्मितीची त्यांना ओढ लागली होती.

त्यामुळे मुंबईमध्येच त्यांनी गोमय उत्पादने बनविण्यास सुरुवात केली. पनवेल परिसरातील देशी गाईच्या गोठ्यातून ते शेण, गोमूत्र विकत घेऊन त्यापासून काही उत्पादने बनविण्याचा प्रयोग सुरू केला.

याचवेळी त्यांच्या मनात गावी जाऊन शेतीसोबतच देशी गोवंश संगोपनाचा विचार घोळू लागला. खासगी नोकरीतील ताणतणाव आणि शहरी धावपळीचा होणारा त्रास लक्षात घेऊन त्यांनी २०१९ मध्ये कुटुंबासह मुंबई सोडली आणि शिरशिंगे गावचा रस्ता धरला.

सावंतवाडी शहरापासून २५ किलोमीटर अंतरावरील किल्ले मनोहर मनसंतोष पायथ्याशी निसर्ग रम्य परिसरात शिरशिंगे हे गाव वसले आहे. या गावात शिर्के यांची दोन एकर शेती आहे. यामध्ये प्रामुख्याने भात लागवड असते.

गावी आल्यानंतर शिर्के यांनी देशी गोपालकांच्या गोठ्यांना भेटी देऊन व्यवस्थापन समजून घेतले.त्यानंतर ते विविध कार्यशाळा, प्रशिक्षण वर्गामध्ये सहभागी होऊ लागले. कांचीपुरम (तमिळनाडू) येथील स्वर्गीय राजीवभाई दीक्षित प्रेरित पंचगव्य गुरुकुलममधून त्यांनी एमडी. पंचगव्य हा अभ्यासक्रम पूर्ण केला.

यामध्ये त्यांनी देशी गाईचे दूध, गोमूत्र, गोमय, तूप आणि ताक यांपासून विविध उत्पादननिर्मितीचे प्रशिक्षण घेतले. कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातून निसर्गोपचार आणि योग तज्ज्ञ, तसेच अलाहाबाद विद्यापीठातून ॲक्युप्रेशर डिप्लोमा अभ्यासक्रम पूर्ण केला.

प्रक्रिया उत्पादनांच्या निर्मितीस सुरुवात

महादेव शिर्के यांनी एप्रिल २०२० मध्ये पाच कोकण कपिला गाईंची खरेदी केल्या. त्यानंतर टप्प्याटप्प्याने त्यांनी पंचगव्य उत्पादनाची निर्मिती सुरू केली. मात्र या उत्पादनाच्या विक्रीसाठी बाजारपेठेचा मोठा प्रश्न तयार झाला.

सावंतवाडी शहरात जेथे आंबा फळांची विक्री केली जाते, त्या स्टॉलवर या गोमय उत्पादनांची ग्राहकांना विक्री सुरू केली. परंतु पहिल्यांदा ग्राहकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. परंतु नाउमेद न होता त्यांनी देशी गाईच्या दुधापासून ताक आणि लस्सी उत्पादन आणि विक्री सुरू केली.

यासाठी परिसरातील देशी गोवंश संगोपन करणाऱ्या शेतकऱ्यांकडून दूध गोळा करण्यास सुरुवात केली. सावंतवाडी शहरातील एका स्टॉलवर देशी गाईच्या दुधाचे ताक आणि लस्सी मिळेल असे फलक लावले.

तेथे गोमय उत्पादने मांडली. पुणे, मुंबई, कर्नाटक, गोवा अशा भागांतून आलेले पर्यटक ताक आणि लस्सी पिण्यासाठी थांबू लागले. त्यातून उत्पादनाची विक्री सुरू झाली. सध्या प्रति किलो अडीच हजार रुपये दराने तुपाची विक्री होते.

याशिवाय इतर उत्पादनांच्या किमती प्रति १०० ग्रॅम १०० रुपयांपासून १५० रुपयांपर्यंत आहेत. या उत्पादनांच्या विक्रीतून वर्षाला तीन लाखांची उलाढाल होते. गेल्या काही वर्षांपासून परिसरातील शेतकरी, महिला बचत गटांना पंचगव्य उत्पादनांची निर्मिती आणि सेंद्रिय शेतीविषयी शिर्के मार्गदर्शन करतात.

- महादेव शिर्के, ९४२०७८१७०५

पंचगव्य उत्पादने

अमृत धारा, अमृत बाम, उटणे, अबोली साबण, पंचगव्य साबण, चाफा हेअर टॉनिक, गो नीम फिनाइल, गोमूत्र अर्क, शाम्पू, वातशामक तेल, गौ दंतमंजन, पित्तशामक चूर्ण, पंचगव्य धृत, धूपबत्ती, हवन कुंड धूप, अगरबत्ती, गोवरी, तूप.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT