Turmeric and Capsule Agrowon
यशोगाथा

वायगाव हळदीपासून आरोग्यदायी कॅप्सूल्स

हळद व काळी मिरी यांच्यापासून नावीन्यपूर्ण कॅप्सूल व टॅब्लेट्‌स तयार केल्या आहेत.

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

वर्धा जिल्ह्यातील गिरड येथील पंकज भगत यांनी वायगाव हळदीपासून (Turmeric) अस्सल पावडरनिर्मितीचा ब्रॅण्ड तयार केला. त्यापुढे जात कुरकुमीनेच ९ टक्के प्रमाण असलेली हळद व काळी मिरी यांच्यापासून नावीन्यपूर्ण कॅप्सूल व टॅब्लेट्‌स (Capsules and tablets) तयार केल्या आहेत. शेतकरी उत्पादक कंपनीचे (farmer-producing company) सचीव असलेले भगत यांनी अशा प्रकारे मूल्यवर्धनातून स्वतःबरोबर अन्य हळद उत्पादकांच्या अर्थकारणासही बळकटी दिली आहे.

वर्धा जिल्ह्यातील वायगाव हळद सर्वत्र प्रसिद्ध आहे. समुद्रपूर तालुक्यातील गिरड गाव परिसरदेखील
हळदीसाठी (Turmeric) प्रसिद्ध आहे. गावाबाबत बोलायचे तर येथे शेख फरीद यांचा दर्गा आहे. देशभरातून भाविक या ठिकाणी येतात. याला पर्यटनस्थळाचा दर्जा असल्याने पर्यटकांची देखील या ठिकाणी गर्दी राहते. गावात प्रत्येकाच्या अंगणात सीताफळाची झाड आहेत. हंगामात अनेक कुटुंब सीताफळाची (Custard apple) थेट विक्री करून चांगली कमाई करतात. वायगावहून १२ किलोमीटरवर असलेल्या या गावात पाच वर्षांपूर्वी
दहा शेतकरी हळद उत्पादन घ्यायचे. आता त्यांची संख्या तीसवर पोहोचली आहे. वायगाव हळदीचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात कुरकुमीनचे प्रमाण पाच ते सहा टक्क्यांपेक्षा अधिक आहे. सुगंध त्यासोबतच तेलाचे प्रमाणही यात जास्त असते.


अशी मिळाली वायगावला ओळख

जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार मुघलकाळात काही शेतकऱ्यांकडे हळद लागवडीची (Cultivation of turmeric) जबाबदारी देण्यात आली. उत्पादित हळद मुघलांना द्यावी लागे. पारंपरिक पद्धतीने हळद तांब्याच्या कढईत उकळली जायची. वायगावमध्ये हे काम मोठ्या प्रमाणावर व्हायचे. मुघलांनी त्यासाठी जमिनीचे पट्टे दिले होते. त्यानंतरच्या काळात याच हळदीला वायगाव अशी ओळख मिळाली. याच भौगोलिक हवामानात व मातीत हळद चांगली रुजली. वायगाव हळद उत्पादक संघ व शेतकरी उत्पादक कंपनी कार्यरत आहे. याच संघाने वायगाव हळदीचे भौगोलिक निर्देशांक (जीआय) मिळवण्यातही यश मिळवले. असे मानांकन मिळवणारी ही देशातील पहिली हळद असावी.

भगत यांची प्रयोगशीलता

संघाचे सचीव पंकज भगत गिरड गावचे आहेत. त्यांची वडिलोपार्जित चार एकर शेती आहे. यात
दीड एकर ते सेंद्रिय (Organic) पद्धतीने घेतात. अन्य पिकांमध्ये हंगामी पिके (Seasonal Crop) असतात. तुरीची डाळ तयार करून त्याचीही विक्री करतात. हळदीचे एकरी २५ क्विंटलपर्यंत (वाळवलेले) उत्पादन ते घेतात.
केवळ उत्पादनापर्यंत न थांबता त्यांनी हळदीचे मूल्यवर्धन साधत पासून पावडर, त्यापुढे जात कॅप्सूल व टॅब्लेट्‌स तयार करण्यास सुरुवात केली आहे.

कॅप्सूलचे उत्पादन (Production of capsules)

सेंद्रिय काळी मिरी (Organic black pepper) व कुरकुमीनचे प्रमाण ९ टक्के असलेल्या वायगाव हळदीपासून कॅप्सूल्स व टॅब्लेट्‌स
तयार केल्या जातात. एका खासगी कंपनीकडून त्याची निर्मिती करून घेतली जाते.
सन २०१८ पासून पंकज या व्यवसायात कार्यरत झाले आहेत. दररोज सकाळी व संध्याकाळी या कॅप्सूल्सचे सेवन उपयुक्त राहते. प्रवासात किंवा अन्यत्र मुक्कामी असल्यास दूध (Milk) उपलब्ध होईल असे नाही.
अशावेळीही कॅप्सूलचा उपयोग अधिक होतो. हळदीचे सर्व गुणधर्म त्यातून मिळू शकतात. शरीराची प्रतिकारशक्‍तीही (body's immune system) वाढते असे पंकज सांगतात. प्रति बॉटल (६० नग) कॅप्सूल ३७० रुपये व टॅब्लेट १९० रुपये असे दर ठेवले आहेत. पूरक आहार या प्रकाराखाली त्यांची विक्री होते.

पावडरनिर्मिती (Powder making)

वायगाव हळदीपासूनच गावातच कांडप यंत्राद्वारे पावडर तयार करण्याची प्रक्रिया होते. रंग, गंध आणि चवीत वेगळेपण त्योबतच कुरकुमीनचे प्रमाण त्यात पाच टक्के वा त्याहून अधिक असते. त्यामुळे ग्राहकांकडून चांगली मागणी राहते. साधारण एक किलो हळकुंडांपासून पावडर तयार करायची तर त्यात १० ग्रॅमचा घसारा असतो. अस्सल वायगाव हळद या ब्रॅंडने आकर्षक पॅकिंगद्वारे विक्री २५० रुपये प्रति किलो दराने केली जाते.

उत्पादनांचा दर्जा व ब्रॅंडिंग

सर्व मूल्यवर्धित उत्पादने सेंद्रियच (Organic)असतील याकडे अधिकाधिक लक्ष दिले जाते. अर्थात, अजून त्यासंबंधीचे प्रमाणीकरण केलेले नाही. काळी मिरी केरळमधील सेंद्रिय उत्पादकांकडून घेण्यात येते.
ओल्या हळदीचे चिप्स केले जातात. ते सावलीत वाळविले जातात. त्यामुळे कुरकुमीनचे प्रमाण अधिक राहते. पावडर तसेच कॅप्सूल यांच्यातील त्याच्या प्रमाणाची प्रयोगशाळेत चाचणी केली जाते. त्यानंतरच उत्पादने विक्रीस (Products for sale)उपलब्ध केली जातात. सोशल मीडिया तसेच विविध प्रदर्शनांमधून उत्पादनांचे प्रमोशन व ब्रॅंडिग केल्याने ग्राहकांकडून अधिकाधिक मागणी मिळवण्यात पंकज यशस्वी झाले आहेत. वर्षाला सुमारे एक लाख पर्यंत कॅप्सूल निर्मिती होते. तर २० क्विंटलपर्यंत पावडरीच खप होतो. संघाचे सुमारे दीडशे हळद उत्पादकांचे संघटन आहे. उत्पादनांसाठी आवश्‍यक कच्चा माल म्हणजे हळकुंडांची खरेदी संघातील शेतकरी सदस्यांकडूनच सुमारे १० हजार रुपये प्रति क्‍विंटल दराने होते.
साहजिकच त्यांचेही हळदीतील अर्थकारण वाढीस लागण्यात मदत झाली आहे.

मधुमक्षिकापालन (Beekeeping)

कृषी विभागाच्या आत्मा योजनेतून पंकज यांनी मधुमक्षिका पालनासाठी पुढाकार घेतला आहे. सध्या त्यांच्याकडे दोन मधपेट्या आहेत. उन्हाळ्यात विदर्भात तापमान (Summer temperatures in Vidarbha) अधिक राहते. त्यासोबतच फुलांची उपलब्धता देखील पुरेशी नसते. त्यामुळे फुलशेतीच (Flower farming) पर्यायही निवडला आहे.

संपर्क : पंकज भगत, ९८३४९०४८४५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Summer Paddy Procurement: चंद्रपूर जिल्ह्यात उन्हाळी धान खरेदीचे उद्दिष्ट मर्यादित

Pomegranate Orchard Damage: वादळी वाऱ्यासह गारपीट; डाळिंब बागांचे नुकसान

Declining Water Storage: लघु प्रकल्पात १८ टक्के, तर मध्यम प्रकल्पात १९ टक्के पाणीसाठा

Tractor Cultivation Charges Hike: शेती मशागतीचे दर २०० रुपयांनी वाढले

Drip Irrigation Project: ढिवरवाडी सिट्रस इस्टेटमध्ये अखेर लागणार ड्रीप

SCROLL FOR NEXT