Milk Processing Industry  Agrowon
यशोगाथा

Milk Processing Industry : दूध प्रक्रिया उद्योगातून अर्थकारण केले बळकट

Milk Products Business : दुर्गम चंद्रपूर जिल्ह्यातील अजयपूर हे दुग्धोत्पादनाचे गाव म्हणून ओळखले जाते. येथील धनराज व कमलेश या परसुटकर भावंडांनी घरचा दुग्धव्यवसाय सांभाळताना प्रक्रियेतून एक पाऊल पुढे टाकले.

Vinod Ingole

Milk Processing : चंद्रपूर (Chandrapur) हा विदर्भातील अत्यंत दुर्गम जिल्हा आहे. जिल्ह्यातील अजयपूर हे गाव चंद्रपूर-मुल महामार्गावर वसले आहे. अडीच हजार लोकवस्तीच्या या गावात घरटी दुग्ध व्यवसाय केला जातो.

त्यामुळे गावातील एकूण दूध संकलन एकहजार लिटरच्या घरात आहे. बहुतांश पशुपालक जिल्ह्याच्या ठिकाणी दुधाचा पुरवठा (Milk Supply) करतात. अनेकांनी दुधापासून दही तयार करीत त्यातून उत्पन्न वाढविले आहे.

परसुटकर भावंडांचा व्यवसाय

गावातील धनराज व कमलेश या परसुटकर भावंडांची १४ एकर शेती आहे. अन्य शेतकऱ्यांप्रमाणे ते देखील धानाची (भात) लागवड करायचे. परंतु प्रति एकरी उत्पादकता व उत्पन्न यांचा ताळेबंद जुळत नव्हता. शिवाय गावात पशुपालकांची संख्याही भरपूर आहे.

त्यामुळे या भावंडांनी दुग्धव्यवसायावरच लक्ष केंद्रित करायचे ठरविले. सन २००२ मध्ये प्रत्येकी पाच गाई (जर्सी) व म्हशी (मुऱ्हा) खरेदी केल्या. सुरवातीला दूध संकलन कमी असायचे. एका व्हॅनमधून ते चंद्रपूरपर्यंत आणले जायचे.

त्या ठिकाणी दोघे भावंडे सायकल उभी करून ठेवायचे. नंतर शहरातील विविध भागात घरोघरी जाऊन ते दुधाचा पुरवठा करायचे. चांगली मेहनत व व्यावसायिक वृत्तीतून चांगला परतावा मिळू लागला. मग व्यवसायाचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला.

आज जनावरांची संख्या सुमारे १८ वर पोचली आहे. त्यात १० गायी व उर्वरित म्हशी आहेत. गीर, साहिवाल, जर्सी अशा विविध जातींची विविधता गायींमध्ये ठेवली आहे. कृषी विभागाच्या योजनेतून ४० बाय ३० फूट गोठ्याची उभारणी करण्यात आली आहे.

त्यासाठी अडीच लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे. सिमेंटची गव्हाण तयार केली असून पाण्याची सोयही करण्यात आली आहे. विहिरीच्या माध्यमातून पाणी उपलब्ध करून दिले जाते.

दूध संकलन केंद्राची सुविधा

घरोघरी जाऊन दुधाचा पुरवठा करीत राहण्यापेक्षा एकाच ठिकाणावरून दूध व दुग्धजन्य पदार्थांची विक्री करता येईल का असा विचार परसुटकर भावंडांच्या मनात आला. चंद्रपूर-मुल मार्गावरच राहते गाव, शेती व गोठा आहे.

या रस्त्यावर नेहमी वर्दळ राहते. याच ठिकाणी विक्रीचे ‘आउटलेट’ सुरू करण्याचे ठरविले. उत्पादनांबरोबर अन्य शेतकऱ्यांकडूनही दूध संकलन करायचा पर्याय पुढे आला. त्यासाठी एका प्रसिद्ध डेअरी कंपनीचे संकलन केंद्र सुरू केले. त्याची जबाबदारी कमलेश यांनी स्वीकारली. आज स्वतःच्या गोठ्यातील दररोज ८० ते १०० लिटर दूध संकलित होते.

प्रक्रियायुक्त उत्पादने तयार करण्यासाठी अन्य शेतकऱ्यांकडून १५० लिटर दूध तर डेअरीला देण्यासाठी ६०० लिटर अशा प्रकारे दूध संकलन नियोजन केले जाते. कंपनीने एकहजार लिटर क्षमतेचा चिलिंग प्लांट दिला आहे. स्वतःचाही तीनशे लिटरचा असा प्लांट आहे.

पदार्थांचे उत्पादन

धनराज यांच्याकडे दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन व विक्रीची जबाबदारी असते. ११ प्रकारची उत्पादने या ठिकाणी तयार केली जातात. वर्षभरातील ऋतूतील बदलती मागणी लक्षात घेऊन उत्पादने तयार केली जातात.

उदाहरण सांगायचे तर दररोज सरासरी सात किलो पेढा तयार केला जातो. ९५ ते १०० रुपये प्रति पाव किलोचा त्याचा दर आहे. उन्हाळ्यात दह्याच्या मागणीत वाढ होते. त्यामुळे दररोज शंभर किलो त्याचे उत्पादन होते. ७० रुपये प्रति किलो दराने विक्री होते.

कलाकंदला चांगली मागणी राहते. दररोज सरासरी दोन ते अडीच किलो उत्पादन व चारशे रुपये प्रति किलो दराने विक्री होते. बासुंदी साधारण पाच किलो व अडीचशे रुपये दराने विक्री होते. सात किलो खवा दररोज तयार केला जातो.

उन्हाळ्यात लस्सीला मागणी

उन्हाळ्यात ग्राहकांकडून असलेली मागणी लक्षात घेता दररोज सरासरी १०० वा त्याहून अधिक ग्लासच्या संख्येने लस्सी तयार केली जाते. ३५ रुपये प्रति ग्लास ( २५० ग्रॅम) असा त्याचा दर आहे.

हिवाळ्यात मिल्क केक (कलाकंद व खवा मिश्रण) तयार केला जातो. किलोला चारशे रुपये त्याचा दर आहे. तुपाला सर्वाधिक मागणी असली तरी उत्पादन तुलनेने कमी होते. पनीरची दररोज सरासरी १० ते १२ किलो विक्री होते.

अर्थकारण उंचावले

दररोज विविध उत्पादनांच्या विक्रीतून १५ हजार ते १८ हजार रुपयांपर्यंत उलाढाल होते. सणासुदीच्या काळात त्यात वाढ होते. धनराज यांच्यासह पत्नी विद्या, वडील विठ्ठल, आई सुनंदा, बंधू कमलेश व पत्नी असे सर्वजण व्यवसायात राबतात. ट

सोबतच गावातील तीन व्यक्तींना रोजगारही दिला आहे. सुमारे ११ लाख रुपये खर्चून बॉयलर, क्रीम सेपरेटर, दूध संकलन यंत्रणा आदी यांत्रिकीकरण केले आहे.

याच व्यवसायातून पाच एकर शेती घेणे , गोठा व पक्के घर बांधणे शक्य झाल्याचे धनराज यांनी सांगितले. तालुका कृषी अधिकारी भास्कर गायकवाड यांनीही पशुधन व गोठा उभारणीसाठी सहकार्य केले आहे.

धनराज परसुटकर- ९७६३८७६६९०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Purchase Investigation : कांदा खरेदीची केंद्राकडून चौकशी सुरू

Raisins Deal : पेमेंट द्या; अन्यथा सौद्यात सहभाग नाही

Cotton Moisture Content : कापसातील ओलाव्यासाठी हवा १५ टक्क्यांचा निकष

Yellow Peas Import : पिवळा वाटाणा आयात पोहोचली १२.५४ लाख टनांवर

Maharashtra Assembly Election Counting : आज मतमोजणी; ८ वाजता सुरुवात

SCROLL FOR NEXT