अंजिराची प्रतवारी व बाॅक्स पॅकिंग.  
यशोगाथा

वाशीच्या बाजारात लोकप्रिय झेंडेचा अंजीर ब्रॅण्ड

दुष्काळी पुरंदर तालुक्यात दिवे येथील झेंडे कुटुंब शेततळे, सिंचन व पीक व्यवस्थापनातून उत्तम दर्जाचे अंजीर काही वर्षांपासून पिकवीत आहेत. ग्रेंडिग, पॅकिंग करून दोन्ही बहारांमधून सातत्याने चांगला दर मिळवीत वाशी बाजारपेठेत झेंडे हा लोकप्रिय ब्रॅण्ड त्यांनी तयार केला आहे.

sandeep navale

दुष्काळी पुरंदर तालुक्यात दिवे येथील झेंडे कुटुंब शेततळे, सिंचन व पीक व्यवस्थापनातून उत्तम दर्जाचे अंजीर काही वर्षांपासून पिकवीत आहेत. ग्रेंडिग, पॅकिंग करून दोन्ही बहारांमधून सातत्याने चांगला दर मिळवीत वाशी बाजारपेठेत झेंडे हा लोकप्रिय ब्रॅण्ड त्यांनी तयार केला आहे.   पुणे जिल्ह्यातील दुष्काळी पुरंदर तालुक्यातील दिवे गावाचा परिसर डोंगराळ भागाने व्यापला आहे. बऱ्यापैकी हलकी जमीन आहे. पावसाचे प्रमाण कमी असल्याने येथील शेतकऱ्यांनी फळबागांकडे मोर्चा वळवला आहे. गावात मुरलीधर पंढरीनाथ झेंडे यांचे एकत्रित कुटुंब आहे. मोठे भाऊ ज्ञानोबा सैन्यदलातून, त्यानंतर पोलिस खात्यातील मोठ्या पदावरून निवृत्त झाले. ते व अन्य बंधू बाळासाहेब मुंबई येथे राहतात. मुरलीधर शेती पाहतात. डोंगराळ, माळरानावर त्यांची दहा एकर शेती आहे. पैकी दोन एकरांत अंजीर असून त्यासह सीताफळ व पेरू अशी मिळून साडेचार एकर फळबाग आहे. शेतीची सुधारणा डोंगराळ भाग असल्याने चढउतार, छोटे-मोटे दगड मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे योग्यरीत्या बांधबंदिस्ती केली. १५ वर्षांपूर्वी चार किलोमीटरवरील सासवड जवळील जाणूबाई बंधाऱ्यावरून पाइपलाइन उभारली. साडेचार ते पाच लाख रुपयांचा खर्च झाला. पाणी आल्याने सुरवातीला भाजीपाला, कांदा आदी पिके घेतली. मात्र बाजारभाव व अन्य समस्या जाणवू लागल्या. फळबाग लागवड भौगोलिक स्थान, पाणी, बाजारपेठ आदींचा अभ्यास करून फळबाग पिकांकडे झेंडे वळले. पुरंदर भागात अंजीर हे प्रमुख पीक आहे. वाणही स्थानिक आहे. त्यादृष्टीने हेच पीक घेण्याचा निर्धार केला. मुरलीधर पूर्वी सहकार खात्यात शिक्षणाधिकारी होते. पुणे व अन्य ठिकाणी २२ वर्षांचा अनुभव घेतल्यानंतर शेतीतच पूर्ण लक्ष देण्याच्या उद्देशाने त्यांनी राजीनामा दिला. दिवस-रात्र एक करून कुटुंबातील सदस्यांसहीत अंजीर पिकाची मन लावून जोपासना केली. आज बागेत १४ वर्षे जुनी अंजिराची झाडे पाहण्यास मिळतात. नवी लागवडही केली आहे. सीताफळही जुने आहे. बांधावर आंबा, जांभूळ आहे. बहारांचे योग्य नियोजन

  • टप्प्याटप्याने शंभर, नंतर ५५ त्यानंतर १०० अशी अशी सुमारे २५५ अंजीर झाडे.
  • दरांची जोखीम टाळण्यासाठी खट्टा आणि मीठा अशा दोन्ही बहारांत उत्पादन.
  • झेंडे सांगतात की मीठा बहरातील फळे फेब्रुवारीनंतर सुरू होतात. त्या काळात अन्य फळे बाजारात असल्याने तुलनेने दर व मागणी कमी असते. त्या तुलनेत खट्टा बहर फायदेशीर ठरतो. कारण दसरा किंवा त्यापुढील काळात फळे येतात. त्यावेळी अन्य फळे कमी असतात.
  • सेंद्रिय व रासायनिक पध्दत ८० टक्के सेंद्रिय व २० टक्के रासायनिक अशी पध्दत असते. जीवामृत, शेणखत, लेंडीखत, कोंबडीखत आदींचा वापर होतो. त्यामुळे फळाला चमक, गोडवा व टिकाऊपणा मिळतो. पाचटाचा वापर करून जिवाणूंची संख्या वाढवली आहे. फवारणीसाठी आधुनिक यंत्रणा वापरतात. तोडणी केलेला माल छोट्या ट्रॅक्टरचलित ट्रॉलीद्वारे बागेतून बाहेर आणला जातो. मागील वर्षी व यंदा अतिवृष्टीमुळे पुरंदर तालुक्यातील अनेक बागांचे नुकसान झाले. करपा, तांबेरा रोगांचा फटका बसला. मात्र झेंडे यांनी बागेचे योग्य व्यवस्थापन करून नुकसान टाळण्याचा प्रयत्न केला. डोंगरावरून वाहून येणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी त्यांनी चारी पाडल्या आहेत. तीन शेततळी डोगराच्या कडेला शेती असल्याने पाण्याचा फारसा स्रोत नाही. त्यामुळे पाइपलाइन करून पाणी आणले. फळबागांवर भर दिल्याने कमी पाण्यात चांगले पीक घेता येत आहे. दोन मोठ्या व एका छोट्या अशा तीन शेततळ्यांची उभारणी केली आहे. छोटे तळे डोंगराच्या वरील बाजूस असून सायफन पद्धतीने पाणी खाली आणले जाते. या भागात वीज नेणे अडचणीचे असल्याने या पध्दतीचा फायदा होतो. उत्पादन व बाजारपेठ प्रति झाड ऐंशी ते शंभर किलो तर एकरी अठरा टनांपर्यंत उत्पादन मिळते. एकरी दीड ते दोन लाख रुपयांचा खर्च होतो. ए ग्रेडच्या प्रति बारा नगाच्या चार पेट्या एकत्र बांधल्या जातात. त्यास जोटा म्हणतात. सर्व विक्री वाशी मार्केटला होते. ए ग्रेड जोट्याला ३४० ते ३५० रुपये, बी ग्रेड २२० ते २३० रुपये व त्यानंतरच्या ग्रेडला १०० ते १३० रुपये दर मिळतो. डी. पी. झेंडे (मोठे बंधू) नावाने वाशी मार्केटमध्ये अंजिरे प्रसिद्ध झाली आहेत. गुणवत्ता व प्रतवारीच्या जोरावर चांगला दर मिळतो. संकटात दिला आधार विविध ठिकाणचे शेतकरी, अधिकारी झेंडे यांची बाग पाहण्यास येतात. मार्गदर्शन घेतात. गेल्यावर्षी लाँकडाऊन काळात मार्च ते मे या काळात पावणेतीन लाखांचा माल विकण्यात झेंडे यशस्वी झाले. कृषी खात्याने त्यांना वाहतुकीची परवानगी दिली होती. शेतीत बारा ते पंधरा जणांना रोजगारही दिला आहे. अंजीराप्रमाणे सीताफळाची गुणवत्ताही चांगली असते. त्याच्या १६ फळांच्या बॉक्सला ७०० ते ८०० रुपये तर २४ फळांच्या बॉक्सला ५०० ते ६०० रुपये दर मिळतो. आई जनाबाई झेंडे व कुटुंबातील सर्व सदस्यांचे योगदान मोलाचे ठरले आहे. संपर्क- मुरलीधर झेंडे- ९८२२६७२१५९  

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

    Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

    Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

    Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

    Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

    SCROLL FOR NEXT