डावीकडून पृथ्वीराज आणि सुवर्णजीत हे चव्हाण बंधू आपल्या उत्पादनांसह  
यशोगाथा

पॅकिंग व दर्जातून परिपूर्ण अॅग्रो प्राईम उत्पादने

घोगाव (ता. पलूस, जि. सांगली) येथील सुवर्णजीत व पृथ्वीराज या उच्चशिक्षीत चव्हाण बंधूंनी उत्कृष्ट दर्जाचे पॅकिंग, गुणवत्ता व किंमत या कसोट्यांवर अन्नप्रक्रिया उद्योगात आश्‍वासक वाटचाल केली आहे. ‘ॲग्रो प्राइम ब्रॅण्ड नावाने विविध उत्पादनांची निर्मिती करून सुमारे १६ जिल्ह्यांत वितरकांचे नेटवर्क तयार केले आहे.

Abhijeet Dake

घोगाव (ता. पलूस, जि. सांगली) येथील सुवर्णजीत व पृथ्वीराज या उच्चशिक्षीत चव्हाण बंधूंनी उत्कृष्ट दर्जाचे पॅकिंग, गुणवत्ता व किंमत या कसोट्यांवर अन्नप्रक्रिया उद्योगात आश्‍वासक वाटचाल केली आहे. ‘ॲग्रो प्राइम ब्रॅण्ड नावाने विविध उत्पादनांची निर्मिती करून सुमारे १६ जिल्ह्यांत वितरकांचे नेटवर्क तयार केले आहे.   सांगली जिल्ह्यातील पलूस हा सधन तालुका असून द्राक्ष उत्पादनासह ऊस, भाजीपाला उत्पादनात अग्रेसर आहे. तालुक्यातील घोगाव हे कृष्णाकाठी वसलेले सधन गाव आहे. येथील धनाजी चव्हाण नजीकच्या किर्लोस्करवाडी येथील नामांकित कंपनीत नोकरी करायचे. आपल्या १२ एकर बागायती शेतीत ते ऊस, द्राक्ष पिकवायचे. खोडवा ऊस उत्पादनात त्यांना ‘वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट’ चा पुरस्कार मिळाला आहे. त्यांना दोन मुले आहेत. पैकी सुवर्णजीत यांनी एम. टेक मेकॅनिकल तर पृथ्वीराज यांनी एमई (सिव्हिल) चे शिक्षण घेतले आहे. नोकरीपेक्षा उद्योग भला सुवर्णजीत यांनीही सुरवातीला किर्लोस्करवाडी येथील कंपनीत नोकरी, त्यानंतर अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काही वर्षे अनुभव घेतला. बंधू पृथ्वीराज यांनीही असाच अनुभव घेतला. मात्र नोकरीत मन रमत नव्हते. स्वतःचा उद्योग उभारावा असे वाटे. घरची शेतीची पार्श्‍वभूमी होती. त्यावर आधारित काहीतरी सुरू करावे हे निश्‍चित झाले. त्यातून आपल्या शिक्षणाचाही योग्य वापर होणार होता. उद्योगाची तयारी बाजारपेठेतील मोठी दुकाने, बझार, मॉल्सला भेट देऊन सर्वेक्षण केल्यानंतर कोणत्या पदार्थांना कशी मागणी आहे याचे सर्वेक्षण केले. कोणकोणते ब्रॅण्ड आहेत, त्यांचा दर्जा, गुणवत्ता आदीही गोष्टींचा अभ्यास केला. सुरवातीला सल्लागारांकडून माहिती घेतली. ‘सकाळ एसआयएलसी’, कृषी विभाग यांच्याकडून काही प्रशिक्षण घेतले. त्यानंतर पुरेशी तयारी केल्यानंतर शेतातच प्रक्रिया युनिट उभारून ‘शिवपर्व फूड्स’ कंपनीची स्थापना केली. `मार्केटिंग’चे कसब सुवर्णजीत सांगतात की आम्ही ‘इंजिनिअरिंग’ चे शिक्षण घेतले असल्याने उत्पादनाच्या तांत्रिक बाबी आत्मसात करता आल्या. काही पाककृतींसाठी संशोधन आणि विकास (आर ॲण्ड डी) या बाबीवर लक्ष द्यावे लागले. गुणवत्तेवर लक्ष केंद्रित केले. अर्थात पुढील आव्हान महत्त्वाचे होते. आपण उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ मिळवायची होती. मग दोघा बंधूंनी तालुका आणि जिल्हा स्तरावरील प्रमुख ‘स्टॉकिस्ट’ किंवा डीलर शोधण्यास सुरवात केली. त्यांच्याकडे उत्पादनांचे नमुने देण्यास सुरवात केली. तीस टक्के प्राथमिक ‘मार्केटिंग’ आम्ही करून देतो असे सांगितले. त्यानुसार त्यांच्यासोबत हे काम सुरूही केले. त्यातून ग्राहक मिळत गेले व उद्योगाचा टप्प्याटप्प्याने विस्तार करणे शक्य झाले. चव्हाण बंधूंचा उद्योग दृष्टीक्षेपात

  • उत्पादने- टोमॅटो केचप, मिक्स फ्रूट जॅम, ट्रुटीफ्रूटी, कोकम सिरप,
  • सॉसेसचे ८ प्रकार, जॅम व क्रश ४, फ्रूट सिरप ५ प्रकार, केक ग्लेझिंग जेल १२ प्रकार
  • व्यवसायात एकूण ४ वर्षे पूर्ण.
  • मासिक उलाढाल- १४ ते १५ लाख
  • प्रति दिन उत्पादन क्षमता- तीन टन
  • प्रत्यक्षात सध्या होणारे उत्पादन व विक्री- १ ते सव्वा टन (मागणीनुसार)
  • यांत्रिक सेटअप- बॉयलरपासून ते पॅकिंगपर्यंत सुमारे १६ यंत्रे
  • भांडवल चव्हाण बंधूंनी उद्योगासाठी सुमारे ७६ लाखांचे भांडवल गुंतवले आहे. यामध्ये शेड, यंत्रे, कच्चा माल, पॅकिंगसाठी लागणारे साहित्य आणि खेळते भांडवल अशी आर्थिक तरतूद केली आहे. यामध्ये ३५ टक्के रक्कम स्वतःकडील आहे. बँकेचे ६५ टक्के कर्ज घेतले आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर कृषी विभागाच्या माध्यमातून मुख्यमंत्री कृषी अन्न प्रक्रिया योजनेचा लाभ घेतला. त्यातून सहा लाख ३० हजार रुपयांचे अनुदान मिळाले. ग्राहकांच्या मागणीनुसार उत्पादनांची मागणी वाढली. तशी उलाढाल व खर्चही वाढत गेला. त्यासाठी दर महिन्याला ठराविक रक्कम बाजूला ठेवली जाते. उद्योगातील वैशिष्ट्ये

  • लागणारा कच्चा माल स्थानिक बाजारातून आणि गरजेनुसार शेतकऱ्यांच्या बांधावरून खरेदी केला जातो. काही वेळा फळांचे पल्पही घ्यावे लागतात.
  • अन्न सुरक्षिततता विषयातील ‘एफएसएएसएआय’ चा परवाना घेतला आहे.
  • सांगली, कोल्हापूर, सातारा, कोकण, गोवा, पश्‍चिम कर्नाटक आदी सर्व भाग मिळून
  • सुमारे १६ जिल्ह्यांत तालुका आणि जिल्हा स्तरावर स्टॉकिस्टची नेमणूक.
  • उद्योगाच्या दृष्टीने दौऱ्यावर जावे लागल्यास वडील जबाबदारी सांभाळतात.
  • आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्विकाराहर्ता मिळू शकेल असे ब्रॅण्ड नेम’, पॅकिंग, स्पर्धकांच्या उत्पादनांच्या
  • किमती पाहून तुलनात्मक दर व गुणवत्ता या बाबींवर भर.
  • 'ऑनलाइन कंपन्यांसोबतही बोलणी करून विक्रीचे प्रयत्न सुरू.
  • संपर्क- सुवर्णजीत चव्हाण- ९७६३३५८१६५

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

    ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

    Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

    La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

    Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

    SCROLL FOR NEXT