राहुल रसाळ यांचा सुव्यवस्थापन असलेला टोमॅटो प्लाॅट.  
यशोगाथा

शेती- निर्यातक्षम टोमॅटोची, भाग ७

राहुल रसाळ यांच्या व्यावसायिक पीकपद्धतीतील टोमॅटो हे महत्त्वाचे पीक आहे. ते सांगतात की पावसाळी हंगामात या पिकात जिवाणूजन्य करपा, अर्ली व लेट ब्लाइट आदी रोग उद्‌भवतात. अनेक शेतकरी या हंगामात हे पीक टाळतात. अशावेळी ज्ञान, अनुभव व तंत्रज्ञान पणास लावून बिगरहंगामात पीक यशस्वी करण्याची किंवा ज्या कालावधीत माल पिकविणे शेतकऱ्यांना शक्य नसते तो शोधून त्या वेळी लागवड करण्याची हातोटी आम्ही साधली आहे.

मंदार मुंडले

राहुल रसाळ यांच्या व्यावसायिक पीकपद्धतीतील टोमॅटो हे महत्त्वाचे पीक आहे. ते सांगतात की पावसाळी हंगामात या पिकात जिवाणूजन्य करपा, अर्ली व लेट ब्लाइट आदी रोग उद्‌भवतात. अनेक शेतकरी या हंगामात हे पीक टाळतात. अशावेळी ज्ञान, अनुभव व तंत्रज्ञान पणास लावून बिगरहंगामात पीक यशस्वी करण्याची किंवा ज्या कालावधीत माल पिकविणे शेतकऱ्यांना शक्य नसते तो शोधून त्या वेळी लागवड करण्याची हातोटी आम्ही साधली आहे. टोमॅटो लागवड व्यवस्थापन- ठळक बाबी २० ते २५ ऑगस्टपासून प्लॉट सुरू झाला पाहिजे असे लागवड नियोजन. जेणे करून मार्केटमधील टोमॅटो संपले की आपले हार्वेस्टिंग सुरू होते. (सुमारे १५ ते २० जून दरम्यान लागवड. जूनपासून सहा महिने प्लॉट चालतो.) सुमारे १४ ते १५ दिवस टिकवणक्षमता असलेल्या खासगी कंपनीच्या वाणाचा वापर सात वर्षांपासून. या वाणाची वैशिष्ट्ये

  • झाडाची अतिरिक्त वाढ होत नाही.
  • फळसंख्या जास्त.
  • फळ कडक. हाताने सहजासहजी फुटत नाही. (कापल्याशिवाय)
  • अन्य बाबी

  • सिंगल लॅटरल ठिबक. प्रति ४० सेंटिमीटरला १.६ लिटर डिस्चार्ज प्रति तास.
  • रोपे खात्रीशीर, प्रमाणित नर्सरीतून आणतात. तेथे सीएमव्ही (कुकुंबर मोझॅक व्हायरस) रोगाचा प्रादुर्भाव नाही याची खात्री केली जाते. नर्सरीतून ट्रे उतरवून घेण्यापासून ते लागवडीपर्यंत दोन- तीन वेळा निर्जंतुकीकरण. त्यात सहा ग्रॅम प्रति ६० लिटर पाण्यासाठी स्ट्रेप्टोमायसीन प्रतिजैविकाचा वापर.
  • सायॲट्रानिलीप्रोल कीटकनाशकाची फवारणी.
  • नागअळी व लाल कोळ्याचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी अबामेक्टीनचा वापर.
  • पाच बाय दीड फूट अंतरावर लागवड. ट्रॅक्टरचलित यंत्राद्वारे फवारणी असल्याने अंतर जास्त ठेवले. तारा व बांबूचा वेलींचा आधार.
  • पानांची काळोखी चांगली. रोगांचे प्रमाण कमी व फळांना ‘शायनिंग’ चांगले.
  • पॉली मल्चिंग, ट्रायकोडर्मा व सेंद्रिय स्लरीचा वापर. कमी खर्चात खतनिर्मिती   झाडाला खालून सल्फेटयुक्त सूक्ष्म अन्नद्रव्ये देतात. हजार लिटरच्या टॅंकमध्ये खते विरघळवून घेतात. प्रति हजार लिटर पाण्यात १० किलो कॉपर सल्फेट, ३५ किलो मॅग्नेशिअम सल्फेट, २५ किलो झिंक सल्फेट,१५ किलो मॅंगेनीज सल्फेट, १५ किलो युरिया, १५ किलो फेरस, १० किलो अमिनो ॲसिड, १० किलो फुल्व्हिक ॲसि ड असे ‘स्टॉक सोल्यूशन’ तयार केले जाते. एका दिवसाला एकरी
  • दोन लिटर किंवा चार दिवसांला ड्रीप चालवले तर आठ लिटर या प्रमाणात त्यातून देतो. हे
  • द्रावण तयार करण्याचा खर्च २० रुपये प्रति लिटर एवढाच येतो. हेच खत बाजारातून आणायचे तर हा खर्च २०० रुपये प्रति किलो येतो.
  • तज्ज्ञांचे विवेचन मृद्‌ व अन्नद्रव्ये विषय शास्त्रज्ञ डॉ. हरिहर कौसडीकर म्हणतात, की राज्य खत समितीने जमिनींचे प्रकार, पिके व त्यांच्या विविध अवस्थांनुसार सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या ११ ग्रेड्‌स तयार केल्या आहेत. माती परीक्षण अहवाल तपासून त्यानुसार वापर करावा. काटेकोर पद्धतीने माती, पाणी, अन्नद्रव्ये व कीडनाशके यांचा वापर करून उत्पादन खर्चात बचत करावी. महात्मा फुले कृषी विद्यापीठातील मृदाशास्त्रज्ञ डॉ. अनिल दुरगुडे म्हणतात, की क्षार, सामू व चुनखडीचे प्रमाण या तीन मुख्य गोष्टींमुळे जमिनीची नाडी आपल्याला समजते. जमीन, पाणी व हवा यांचा सूक्ष्म अभ्यास हवा. त्यामुळे समस्या कमी करता येतील. जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढवणेही गरजेचे आहे.   उत्पादन, विक्री

  • टोमॅटोचे सरासरी वजन १०० ते १५० ग्रॅम, तर एकरी ३५ टनांपर्यंत उत्पादन.
  • कोलकाता, बांगला देश, श्रीलंका, पाकिस्तान, अफगाणिस्तानात निर्यातदारांमार्फत निर्यात.
  • राहुल सांगतात, की बाकी वाण व हंगामात एकरी ७० ते ८० टन उत्पादनापर्यंतही पोहोचलो आहोत. मात्र त्यांचे ‘शेल्फ लाइफ’ कमी आहे.
  • राहुल यांना मिळालेले सन्मान (निवडक)

  •  राज्य शासनाचा उद्यान पंडित (२०१९)
  • राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, पुणे- उत्कृष्ट द्राक्ष बागायतदार- (२०२१)
  • दाभोळकर प्रयोग परिवार (२०२०)
  • अभिनव द्राक्ष उत्पादक सहकारी संस्थेचा अभिनव गौरव (२००१)
  • आयडीएल फार्मर ॲवॉर्ड (२०१९), कृषीथॉन, किसानमित्र कृषी प्रदर्शन
  • सदस्य निवड

  • अखिल भारतीय डाळिंब उत्पादक संशोधन संघ, पुणे येथील मध्यवर्ती विज्ञान समिती. (२०१५)
  • महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी- जलसिंचन अभ्यास मंडळ.
  • कृषी विभाग- ‘आत्मा’अंतर्गत राज्यस्तरीय शेतकरी सल्ला समिती. (२०२१)
  • उल्लेखनीय राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राच्या संकेतस्थळावर क्षारयुक्त पाणी समस्येवर मात करून निर्यातक्षम डाळिंब उत्पादन घेण्याविषयीची माहिती प्रसिद्ध. गुणांची शिदोरी आपल्या गुणांचा राहुल यांनी चांगला विकास केला आहे. प्रयोग ‘शेअर’ करण्याचा त्यांचा स्वभाव आहे. त्यामुळे इतरांना माहिती होण्याबरोबरच काही शेतकरी त्या प्रयोगात स्वकौशल्याची भर घालून अजून नवी निर्मिती करतात. राहुल दरवर्षी शेतकऱ्यांकडे जाऊन त्यांचे प्लॉटस पाहतात. नव्या देशांना भेटी आहेतच. जगभरातील संशोधन प्रबंध ते अभ्यासतात. त्यातून नवे संशोधन वापरण्याची दिशा मिळते. लॉकडाउन काळात ३५ ते ४० वेबिनार्समध्ये त्यांनी सहभाग घेतला. आता विविध प्रशिक्षण कार्यक्रमांत ते मार्गदर्शक म्हणून भूमिका बजावतात.   रासायनिक अवशेष कमी करण्यासाठी राहुल यांच्या टिप्स १ ) सूक्ष्मजीवांवर आधारित घटकांचा अधिकाधिक वापर केल्याने रासायनिक अंश कमी होण्यास मदत होते या संकल्पनेवर राहुल काम करतात. सूर्यप्रकाशामुळेही अवशेषांचे विघटन होते. त्यामुळे बागेत द्राक्षघड किंवा फळे चारही बाजूंनी सूर्यप्रकाशात कशी येतील याचे नियोजन करतात. ते म्हणतात, की एखाद्या बुरशीनाशकाचा पीएचआय ६६ दिवस आहे. माझ्या भागात त्याचे विघटन ६० ते ६६ दिवसांत होत असेल, तर सूर्यप्रकाश भरपूर असलेल्या भागात (उदा. सांगली, कर्नाटक) भागात त्याचे ५० दिवसांतच विघटन होऊ शकते. कारण सूर्यप्रकाश भरपूर आहे. इक्वेडोरसारख्या देशात तर त्याही कमी दिवसांत विघटन होते. २) शेजारील शेतातील रासायनिक फवारण्यांचे थेंब आपल्या शेतात येऊ नयेत यासाठी शेताच्या बांधाला १२ ते १५ फूट उंच वाढणाऱ्या गवताची लागवड करतात. रसायन उडून आपल्या शेतात आले तर पहिल्यांदा त्या गवतावर पडते. गवताची एक ओळ पुरेशी ठरते. कुंपणाची उंच भिंत तयार होते. ३) क्षेत्र मोठे असल्याने तण काढण्यासाठी मजुरांची टंचाई असते. त्यामुळे ग्लायफोसेटचा वापर होतो. त्याचे तणांवर ‘कव्हरेज’ चांगले होईल याकडे लक्ष देतात. पाणी ‘आरओ’चे असते. ‘स्प्रेडर’ चांगले वापरतात. त्यामुळे परिणाम प्रभावी मिळतो. संपर्क- राहुल रसाळ-  ९७६६५५०६२४

    मालिका समाप्त.

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Pomegranate Export : राज्यातून डाळिंब निर्यातीसाठी २१ हजार शेतकऱ्यांची नोंदणी

    MahaDBT Portal : ‘महाडीबीटी’वरील अर्जांची नऊ महिन्यांपासून सोडतच नाही

    Banana Rate : केळीची कमी दराने खरेदी सुरूच कारवाईसत्र राबविण्याची मागणी

    Onion Purchase Investigation : कांदा खरेदीची केंद्राकडून चौकशी सुरू

    Raisins Deal : पेमेंट द्या; अन्यथा सौद्यात सहभाग नाही

    SCROLL FOR NEXT