महेंद्र भोर यांची द्राक्षबाग.  
यशोगाथा

द्राक्षाच्या जंबो वाणाचे निर्यातक्षम उत्पादन

नारायणाव (जि. पुणे) या प्रसिद्ध द्राक्षपट्ट्यातील युवा शेतकरी महेंद्र भोर सुमारे पाच वर्षांपासून जम्बो वाणाच्या द्राक्षांची शेती करीत आहेत. शास्त्रीय व्यवस्थापनातून एकरी ८ ते १० टनउत्पादन घेताना निर्यातक्षम दर्जा साध्य करीत आपल्या द्राक्षांना विविध देशांची बाजारपेठ त्यांनी हस्तगत केली आहे.

गणेश कोरे

नारायणाव (जि. पुणे) या प्रसिद्ध द्राक्षपट्ट्यातील युवा शेतकरी महेंद्र भोर सुमारे पाच वर्षांपासून जम्बो वाणाच्या द्राक्षांची शेती करीत आहेत. शास्त्रीय व्यवस्थापनातून एकरी ८ ते १० टन उत्पादन घेताना निर्यातक्षम दर्जा साध्य करीत आपल्या द्राक्षांना विविध देशांची बाजारपेठ त्यांनी हस्तगत केली आहे.   पुणे जिल्ह्यात नारायणगाव पट्टा द्राक्षशेतीसाठी प्रसिद्ध आहे. या भागात उत्तमोत्तम द्राक्ष उत्पादक पाहण्यास मिळतात. याच गावातील युवा शेतकरी महेंद्र भोर यांची पाच एकर शेती आहे. पैकी तीन एकर घरची द्राक्ष बाग आहे. तर मक्त्याने ते १० एकर शेती करतात. त्यातही द्राक्षपीक आहे. महेंद्र यांचा या पिकात सात-आठ वर्षांचा अनुभव तयार झाला आहे. जंबो हे काळ्या रंगाचे वाण एकूण सुमारे ११ एकरांवर आहे. नारायणगाव भागातील हवामान या वाणाला अनुकूल ठरत असून गोडी, वजन चांगले मिळत असल्यानेच त्याला पसंती दिल्याचे महेंद्र सांगतात. अभ्यास व अनुभवातून प्रत्येक वर्षी द्राक्षाचे निर्यातक्षम उत्पादन घेण्यात त्यांनी सातत्य ठेवले आहे. व्यवस्थापनातील बाबी काढणी हंगाम संपल्यानंतर साधारण मार्चनंतर बागेला एका महिना विश्रांती दिली जाते. यानंतर एप्रिलमध्ये खरड छाटणीची लगबग सुरू होते. या वेळी दरवर्षी एकरी ७ ते ८ टन शेणखताची मात्रा दिली जाते. काडी तयार होत असताना मुख्य, दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्ये यांचा माती- पाणी व देठ परीक्षणानुसार वापर होतो. काडी संख्या प्रति चौरस फूट एक याप्रमाणे ८ बाय ४ चौरस फुटांमध्ये २५ ते २८ काड्यांचे नियोजन असते. ऑक्टोबर छाटणीनंतरचे नियोजन सप्टेंबरनंतर पुढील दीड महिना टप्प्याटप्प्याने छाटणीचे नियोजन केले जाते. त्याच्या १५ दिवस आधी एकरी ७ ते ८ टन या प्रमाणात शेणखताची मात्रा दिली जाते. बेसलडोस मध्ये प्रातिनिधिक सांगायचे तर एकरी सिंगल सुपर फॉस्फेट २०० किलो, १८-४६-० हे १०० किलो, एसओपी (सल्फेट ऑफ पोटॅश २५ किलो, फेरस सल्फेट १० किलो, मॅग्नेशिअम सल्फेट २५ किलो, झिंक सल्फेट १० किलो असे प्रमाण असते. मिलीबग व खोडकिडा यांच्या समस्या द्राक्षबागेत जाणवतात. त्यांच्या नियंत्रणासाठी छाटणी झाल्यानंतर चौथ्या ते पाचव्या दिवशी वेलींवर ‘स्प्रेअर गन’च्या साह्याने खोडांवर फवारणी केली जाते. वातावरणातील तापमान, जमिनीचा पोत व पिकाची गरज यानुसार ठिबक सिंचनाद्वारे पाणी देण्यात येते. यानंतर १० ते १२ दिवसांनी फळधारणेच्या नियोजनाला प्रारंभ होतो. तर १७ व्या दिवशी फुटींचे नियोजन केले जाते. यामध्ये काडीवर घडांची ठेवावयाची संख्या निश्‍चित केली जाते. यामध्ये साधारण ३० ते ३५ फुटवे, तर २५ ते ३० घड ठेवले जातात. कीडनाशकांची फवारणी हवामानानुसार आणि गरजेनुसार व प्रसंगी दररोजही घ्यावी लागते. जिबरेलिक ॲसिड वा अन्य संजीवकांचा वापर वाढीच्या अवस्थेनुसार होतो. इलेक्ट्रोस्टॅटिक स्प्रेयरचा वापर त्यासाठी होतो. घडांचे संरक्षण छाटणीनंतर ६५ व्या दिवसांनंतर व ९० व्या दिवसापर्यंत घडांचे सूर्यप्रकाशापासून संरक्षण करण्यासाठी (सन बर्निंग प्रतिबंध) कागदाचे आवरण केले जाते. सुमारे ९० दिवसांनी मण्यांमध्ये पाणी उतरण्यास आणि गोडी भरण्यास आणि रंग येण्यास सुरुवात होते. काढणी हंगाम साधारण तीन महिन्यांचा असतो. यामध्ये देखील घडांच्या पोषणासाठी विद्राव्य खतांची मात्रा सुरू असते. यामध्ये दर आठ दिवसांनी मॅग्नेशिअम, कॅल्शिअम, पोटॅश आदींचा वापर केला जातो. उत्पादन व विक्री व्यवस्था अवकाळी पाऊस, थंडीमधील चढउतार, धुके व एकूण हवामानाचा विचार केल्यास सर्वसाधारणपणे एकरी सुमारे ८ ते १० टनांपर्यंत उत्पादन मिळते. यातील ७० टक्के उत्पादनाची निर्यात होते. तर उर्वरित मालाची देशांतर्गत आणि स्थानिक बाजारपेठेत विक्री होते. निर्यात विषयातील कंपन्या वा व्यावसायिकांना माल देण्यात येतो. काही निर्यातदार थेट बांधावर येऊन खरेदी करतात. त्यासाठी आधी बागांची पाहणी केली जाते. महेंद्र सांगतात की जंबो वाणाला चीनमध्ये अधिक मागणी आहे. तर क्रिमसन रेड वाणाची युरोपला निर्यात होते. दुबई, थायलंड, चीन आदी देशांतही मालाची निर्यात झाली आहे. निर्यातदारांच्या मागणीनुसार अर्धा किलो वजनाचे पनेट व त्याचा पाच किलोचा बॉक्स तसेच आठ किलोचा पाऊच बॉक्स या पद्धतीने पॅकिंग केले जाते. त्यावरील मजुरीचा खर्च शेतकरी स्वतः करतात. पुणे, मुंबई बाजार समितीतही काही मालाची विक्री होते. किलोला ७५ रुपयांपासून ९०, १०० रुपयांपर्यंतही दर मिळतात. काही वेळा हे दर ५० ते ६० रुपये यादरम्यानही खाली आल्याचे महेंद्र सांगतात. उत्पादन खर्च एकरी किमान अडीच लाख रुपये येतो. संपर्क- महेंद्र भोर, ९९६०३४४७९७

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT