पुणे जिल्ह्यात इंदापूर तालुक्यातील अवर्षणग्रस्त लाखेवाडी येथील श्रीमंत ढोले यांनी सिंचनाचे काटेकोर व्यवस्थापन करून ४५ एकरांत निर्यातक्षम द्राक्षबाग फुलवली आहे. आपल्या ११० एकरांतील शेतीतून दीडशे जणांच्या कुटुंबाला रोजगार उपलब्ध केला आहे. पशुपालनाची जोड देत गोबरगॅस निर्मिती साधत स्लरी, शेणखत वापरातून रासायनिक खतांच्या वापरात बचत साधली आहे. पुणे जिल्ह्यात इंदापूर तालुक्यातील सुमारे २२ दुष्काळी गावांंपैकी एक असलेल्या लाखेवाडी गावात पारंपरिक पद्धतीने बाजरी, ज्वारी, मका, भाजीपाल्यासह रब्बी पिके घेतली जायची. सन १९९७- ९८ च्या काळात वीर धरण आणि खडकवासला धरणांच्या कालव्यातून या भागात पाणी आले. शेतकऱ्यांनी शेतीकडे कल वाढविला. पाण्याच्या उपलब्धतेमुळे चारा पिकांची लागवड वाढल्याने परिसर दुग्धोत्पादनातही अग्रेसर झालेला. वेगळ्या पिकांची वाट लाखेवाडीचे श्रीमंत ढोले हिमतीचे शेतकरी. परिसरात वेगळ्या पिकाची वाट धरत सात एकरांतील खडकाळ रानावर डाळिंबाची लागवड केली. दहा वर्षे त्यात सातत्यही राहिले. दरम्यान, डाळिंबावर तेलकट डाग, मर रोगांचा प्रादुर्भाव वाढला. दरांची साथही मिळेना. इंदापूर भागात तसे स्वच्छ, कोरडे वातावरण असल्याने द्राक्षासाठी पोषक स्थिती असते. मग अभ्यासातून खडकाळ जमिनीत माती भरून २००७ मध्ये द्राक्षाची लागवड केली. त्यात आज सातत्य आहे. ढोले यांची शेती
नियोजनातील महत्त्वाच्या बाबी
निर्यातीवर भर नानासाहेब पर्पल या रंगीत वाणाची लागवड आहे. एकरी १३ टनांपर्यंत उत्पादन मिळते. त्यात १० ते ११ टन माल निर्यातक्षम असतो. उर्वरित मालाची स्थानिक विक्री होते. गेल्यावर्षी एकूण ३७५ टन द्राक्षे निर्यात झाली. श्रीमंत म्हणाले की मागील वर्षी निर्यातीसाठी किलोला ९० रुपयांपासून १४१ रुपयांपर्यंत कमाल दर मिळाले होते. यंदा हे दर ८० रुपयांपर्यंतच आहेत. देशांतर्गत दर ५० ते ६० रुपयांपर्यंत मिळतात. यंदा नैसगिक स्थिती चांगली नाही. त्यातच केंद्र सरकारची निर्यात धोरणे सक्षम नसल्याने गुजरात, काेलकत्ता, बंगळुरू, हैदराबाद आदी बाजारपेठेतच द्राक्षे द्यावी लागत आहेत. निर्यातदारांना ३७ टक्के जीएसटी द्यावा लागतो. त्यामुळे शेतकऱ्यांना कमी दर मिळत आहे. यंदा आमची २०० टनांपर्यंत निर्यात होईल, असेही श्रीमंत यांनी सांगितले. तिसऱ्या प्रतवारीतील मणी (सुमारे ५० ते ६० टन) नाशिक परिसरातील वाईन उत्पादकांना दिले जातात. त्यास प्रति किलो १० ते १२ रुपये दर मिळतो. अन्य शेती
दूध, गोबरगॅस, खत
सिंचन
घरच्यांचे साह्य वडील श्री. पोपट, आई सौ. सुशीला, पत्नी सौ. चित्रलेखा यांची साथ आहे. राज्य सरकारच्या सेवेत सचिव असलेले मोठे बंधू दिलीप व विक्रीकर विभागात सहआयुक्त त्यांच्या पत्नी सौ. सुजाता यांचे मोलाचे सहकार्य. इंदापूर येथील राजेंद्र वाघमोडे, बाग व्यवस्थापक दत्तात्रय कांबळे यांचाही मोठा हातभार. मजुरांच्या कुटुंबाचे संगोपन
संपर्क- श्रीमंत ढोले - ९९२२७०३२९९
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.