सुमीत गरूड आपल्या शेळीपालन फार्मंमध्ये
सुमीत गरूड आपल्या शेळीपालन फार्मंमध्ये  
यशोगाथा

शुद्ध आफ्रिकन बोअर शेळीचे उत्कृष्ट व्यवस्थापन 

विकास जाधव

सातारा जिल्ह्यातील जिंती येथील सुमीत राजेंद्र गरूड या पदवीधर युवा शेतकऱ्याने नोकरीच्या मागे न लागता आफ्रिकन बोअर शेळीचे संगोपन सुरू केले. सुमारे सहा-सात वर्षांपासून चिकाटी, ध्यास व प्रयत्नपूर्वक त्यात सातत्य ठेवले. शुध्द, निरोगी वंशावळ, चारा-पाणी व आरोग्याचे चोख व्यवस्थापन व सोशल मीडियाद्वारे मार्केटिंग या वैशिष्ट्यांच्या आधारे शेळीपालनात सुमीतने चांगले नाव कमावले आहे.    फलटण हा सातारा जिल्ह्यात सर्वाधिक दूध उत्पादक तालुका म्हणून ओळखण्यात येतो. तालुक्यातील  जिंती गावातून निरा नदी वाहत असल्याने बहुतांशी बागायत शेती केली जाते. यात सर्वाधिक ऊस, डाळिंब तसेच हंगाम निहाय हरभरा, गहू, ज्वारी, कांदा असतात. येथील राजेंद्र गरूड हे प्रगतशील शेतकरी आहेत. त्यांची संयुक्त शंभर एकर तर वैयक्तिक २६ एकर शेती आहे. त्यांना सागर व सुमीत ही दोन मुले असून दोघे वाणिज्य शाखेचे पदवीधर आहेत. सध्या वडील व सागर ऊस, डाळिंब शेती तर सुमीत शेळीपालन व्यवसाय सांभाळतात.  शेळीपालनाचा श्रीगणेशा  सुमीत यांनी २०११-१२ मध्ये शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरी न करता शेती करण्याचा निर्णय घेतला.  घरात दोन शेळ्या होत्या. त्यामुळेच हाच व्यवसाय शास्त्रशुद्ध पणे वाढवण्याचे त्यांच्या मनात आले.  गावाशेजारीच निंबकर फार्म असल्याने शेळीपालनाचा अभ्यास सुरू केला. निमकर गोट फार्म मधील  डॉ. मल्हारी ढेबरे यांची भेट झाली. त्यांनी आफ्रिकन बोअर जातीचे शेळीपालन करावे असा सल्ला दिला.  घरी चर्चा झाली. अभ्यास झाला. पुढे जाण्याचे नक्की झाले.  व्यवसायाची उभारणी  निंबकर फार्ममधून २० हजार रुपयांची शुद्ध वंशावळीची शेळी (आफ्रिकन बोअर) आणली. उत्तम नियोजनातून त्यातून मादी करडे मिळाली. पुढे पैदास करीत त्यांची संख्या वाढवत नेली.  त्यानुसार शेडही मोठे केले. टप्प्याटप्प्याने चार वर्षांत १२ शेळ्या तयार झाल्या. आज १०० शेळ्या मावतील असे शेड उभारले आहे.  शेळीपालन -  शेड 

  • सुरवातीच्या उत्पादनातून सात शेळ्याची खरेदी करत विस्तार 
  • आजमितीला मोठ्या ३२ व लहान १० ते १५ शेळ्या 
  • भविष्यात शंभर शेळ्या मावतील अशी वाटचाल 
  • प्रकल्पास माधवानंद बोअर गोट फार्म असे नामकरण 
  • लहान, गाभण तसेच अन्य शेळ्या असे तीन विभाग 
  • शेड उभारणीसाठी सुमारे साडे तीन लाख रुपये गुंतवणूक 
  • शेळ्या मुक्त संचार करतील अशी रचना 
  • आवश्यक वाटेल तेव्हा पाणी पिता येईल यासाठी प्रत्येक विभागात पाण्याची सोय 
  • चाऱ्यासाठी गव्हाण 
  • प्रत्येक शेळीला टॅगिंग. त्याद्वारे शेळीची सर्व ‘हिस्ट्री’ मिळते. यामुळे शेळीचे आरोग्य चांगले राहून काळजी घेता येते. 
  • संयुक्त शंभर एकर शेती असल्याने घरचाच विविध पिकांचे खाद्य उपलब्ध होते. 
  • बाहेरील पशुखाद्यावरील खर्च कमी 
  • दुधाची बकेट  पिल्लांना दूध देण्यासाठी बकेट बनवली आहे. त्यास चार ठिकाणी निपल्स आहेत. बकेटमध्ये  शेळीचे तसेच गाईचे दूध भरले जाते.  साडेतीन लाखांचा फटका  सन २०१५ मध्ये पीपीआर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने चार मोठ्या शेळ्या व दोन पिलांची मरतूक झाली.  यामुळे सुमारे साडेतीन लाख रुपयांचे नुकसान सहन करावे लागले. त्यामुळे निराशा आली. मात्र कुटुंब पाठिशी उभे राहिल्याने या संकटातून बाहेर पडल्याचे सुमीत सांगतात.  मुख्य वैशिष्ट्ये 

  • शेळीचे शुद्ध ब्रीड 
  • पैदाशीसाठीच मुख्य विक्री 
  • स्वच्छ, आरोग्यदायी शेड 
  • सोनोग्राफी (गाभण शेळ्यांची शिरवळ येथील पशुवैद्यक महाविद्यालयातून सोनोग्राफी केली जाते. त्यामुळे शेळीची प्रकृती, पिल्लांची वाढ आदींबाबत सविस्तर माहिती मिळते.) 
  • विक्री  सुमारे २० ते २२ किलो वजनाच्या पिल्लाची  वर्षाला सुमारे ५० नग  दर (प्रति किलो)  नर - प्रति किलो- १५०० रु.  मादी - २००० रु.  (आफ्रिकन बोअर मादीला नरापेक्षा मिळतो अधिक दर)  पुरस्कार  सुमित यांना उत्कृष्ट शेळी व्यवस्थापनासाठी जालना येथील अखिल भारतीय पशूपक्षी प्रदर्शनात प्रथम क्रमांक मिळाला आहे. लोणंद येथील शरद कृषी महोत्सव, पुसेगावातील सेवागिरी रथोत्सवातही त्यांनी प्रथम क्रमांक टिकवला आहे.  लेंडीखत उपलब्ध  वर्षला सुमारे पाच ते सहा ट्रेलर लेंडीखत मिळते. त्याचा वापर शेतात होतो. त्यामुळे पीक उत्पादन वाढले आहे. खताच्या वापरामुळे अन्य खतांवरील खर्च कमी झाला. यंदा रेसीड्यू फ्री डाळिंबाला किलोला ११० रुपये दर दिल्याचे सुमीत यांनी सांगितले. संपूर्ण शंभर एकरांवर ठिबक सिंचनही केले आहे. 

    संपर्क- सुमित गरूड - ९४२३८८१९०९, ९५११७६७६८८   

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Agriculture Update : गुणवत्तापूर्ण बियाणे, खते शेतकऱ्यांना द्या : इटनकर

    Summer Weather : परभणीत दिवसाचा पारा ४३ अंशांवर

    Water Stock : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांवर

    Flower Rate : लग्नसराईमुळे फुलांच्या दरांत वाढ

    Anandacha Shidha : आनंदाच्या शिध्याची प्रतीक्षा

    SCROLL FOR NEXT