Flower Rate : लग्नसराईमुळे फुलांच्या दरांत वाढ

Flower Market : संपूर्ण महाराष्ट्रात यंदा दुष्काळ असल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे पिकांना भर उन्हाळ्यात पाणी नसले तरी या दिवसांत लग्नसराईमुळे फुलांना मोठी मागणी असते.
Flower Market
Flower MarketAgrowon

Panvel News : संपूर्ण महाराष्ट्रात यंदा दुष्काळ असल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे पिकांना भर उन्हाळ्यात पाणी नसले तरी या दिवसांत लग्नसराईमुळे फुलांना मोठी मागणी असते. त्यामुळे हार, बुके खरेदीवर अनेकांचा भर असतो. मात्र, यंदा पाण्याअभावी गुलाब दोनशे रुपये किलो; तर निशिगंध तब्बल अडीचशे ते तीनशे रुपये किलो झाला आहे. परिणामी, उन्हाळ्यात फुलांचा सुगंध महाग झाल्याचे चित्र आहे.

प्रत्येक कार्यक्रमाला जाताना बुके किंवा फुलांचा हार घेऊन जाण्याची प्रथा काही नवीन नाही. त्यामुळे दररोज हजारो किलो फुलांची गरज भासते. यंदा जिल्ह्यात दुष्काळ असल्याने फुलांची आवकही कमी असल्याचे चित्र आहे. परिणामी, फुलांच्या दरात वाढ झाली आहे. महिनाभरापूर्वी गुलाब शंभर ते दीडशे रुपये किलो होता. आता तो दोनशे रुपये किलो झाला आहे; तर सव्वादोनशे ते अडीचशे रुपये किलो भाव असलेला निशिगंध आज अडीचशे ते तीनशे रुपये किलो आहे.

Flower Market
Flower Farming : कमी पाण्यात उत्पादन मिळविण्यासाठी धडपड सुरू

फुलांचे दर वाढल्याने बुके आणि हारांचे दरही वाढले आहे. त्यात लग्नसराई असल्याने फुलांच्या हारांची मोठी मागणी आहे. अशात बाजारात फुलांची आवक कमी झाल्याने हार, बुके खरेदी करताना खिशाला मोठी कात्री लागत असल्याचे चित्र आहे.

उन्हाळ्याचे दिवस असल्याने निशिगंध, जरबेरा, डच गुलाब ही फुले लवकर सुकतात. त्यामुळे ग्राहकांना ताज्या फुलांचे हार देण्यासाठी दररोज फुलांची गरज पडते. मात्र, उन्हाळ्याचे दिवस असल्याने बाजारात फुलांची आवक जेमतेम असून फुलांचे दर वाढले आहे. त्यामुळे हार आणि बुके यांचे दरही काही प्रमाणात वाढले आहेत.- दिनेश वर्मा, हार-बुके विक्रेता, पनवेल

Flower Market
Flower Market : गुढीपाडव्यामुळे फुलबाजार फुलला

फुलबाजारातील दर

फुलांचे प्रकार किलोचा दर (रु.)

गुलाब २००

निशिगंध २५०

मोगरा ५००

जरबेरा १०० (१० नग)

डचगुलाब ४०० (२० नग)

लाल डचगुलाब २५० (२० नग)

फुलांचे हार दर (रु.)

लहान १००

मध्यम २००

मोठा ५००

व्हीआयपी १५०० (जोडी)

क्रेन हार २५००

नवीन गाडीसाठी २५००

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com