Agriculture Update : गुणवत्तापूर्ण बियाणे, खते शेतकऱ्यांना द्या : इटनकर

Dr. Vipin Itankar : कृषी विभागाने रासायनिक खतांसह गुणवत्तापूर्ण बी-बियाणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी दक्षता घेणे आवश्यक आहे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
Dr. Vipin Itankar
Dr. Vipin Itankar Agrowon

Nagpur News : खरीप हंगामासाठी आवश्यक असलेले बी-बियाणे, रासायनिक खते, याची मुबलक उपलब्धी असणे गरजेचे आहे. यादृष्टीने कृषी विभागाने रासायनिक खतांसह गुणवत्तापूर्ण बी-बियाणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी दक्षता घेणे आवश्यक आहे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

सोयाबीन सारख्या बियाण्यांची उगवण क्षमता ही कोणत्याही शेतकऱ्यांना तपासता येऊ शकते. याबाबत अधिक जनजागृती झाल्यास शेतकऱ्यांना याचा लाभ घेता येईल, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील बचत भवन येथे खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते.

Dr. Vipin Itankar
Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, परिविक्षाधीन सहायक जिल्हाधिकारी कुशल जैन, उपवन संरक्षक डॉ. भारतसिंग हाडा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बाप्पा नेमाणे, विभागीय कृषी सहसंचालक शंकर तोटावार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे, आत्मा प्रकल्प संचालिका अर्चना कडू, कृषी महाविद्यालयाचे प्रा. विनोद खडसे आदी उपस्थित होते.

Dr. Vipin Itankar
Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

असे आहे खरिपाचे प्रस्तावित लक्ष्य

या हंगामात तृणधान्य, कडधान्य, गळीत धान्य क्षेत्रात वेळेवर बियाण्यांसह खतांचा पुरवठा होण्यावर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. यात भात पिकाचे उत्पादन हे ९५ हजार हेक्टर क्षेत्रावर घेतले जाईल. यात १ हजार ३४१ हेक्टर क्षेत्राची वाढ दृष्टिपथात ठेवली आहे.

सोयाबीन पिकासाठी ९० हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित ठेवले असून सुमारे ३ हजार ५२९ हेक्टर क्षेत्राची यात वाढ अपेक्षित आहे. कापूस पिकासाठी २ लाख २५ हजार हेक्टर क्षेत्र निर्धारित असून यात ३ हजार ७८१ हेक्टर वाढ अपेक्षित आहे. तेल बियांवर भर देण्याच्या दृष्टिकोनातून जवसाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अधिक उत्पादन हाती कसे घेता येईल, यादृष्टीने नियोजन करण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com