poultry farming of barred breed
poultry farming of barred breed 
यशोगाथा

बेरड जातीच्या कोंबडीपालनाने अर्थकारण केले भक्कम

Vinod Ingole

प्रयत्नवाद, सातत्याने प्रयोग करण्यातला उत्साह, दुग्धव्यवसाय, सविस्तर नोंदींसह शेतीचा ताळेबंद आदी अनेक वैशिष्ट्य़े कान्हादेवी (जि. नागपूर) येथील राम दशरथ लांजेवार यांची सांगता येतील. बेरड जातीचे कोंबडीपालन हे त्यांचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य़. अर्धा एकर शेती असूनही करार शेती करून प्रयत्नवादातून समाधानी व आर्थिक दृष्ट्य़ा स्थिर होता येते हे त्यांनी सिद्ध केले आहे. नागपूर जिल्ह्यातील कान्हादेवी (ता. पारशिवणी) येथील राम लांजेवार यांची जेमतेम अर्धा एकर शेती. सुमारे १५ एकरांत ते करार शेती करतात. भातशेती, त्याला पूरक व्यवसायांची जोड देत त्यांनी शेतीच्या अर्थकारणाची घडी बसवली आहे. भातशेती

  • प्रयोगशीलतेचा वारसा जपणाऱ्या लांजेवार एसआरआय पद्धतीने भात लागवड करतात.
  • साधारण २१ दिवसांनी पुर्नलागवड होते. २५ बाय २५ सेंमी अंतरावर साधारण तीन ते चार रोपे ते लावतात. फुटव्यांची संख्या अधिक मिळते. एसआरआय पद्धत उत्पादकतवाढीस पूरक ठरते.
  • भाताची एकरी उत्पादकता गेल्या दोन वर्षांत ३६ ते ४५ पोते (प्रति ८० किलोचे पोते) पर्यंत त्यांनी मिळवली आहे.
  • शेतीपूरक व्यवसायांची जोड दुग्धव्यवसाय लांजेवार यांनी कसायाकडून जादा दराने गाय विकत घेत संगोपन केले. त्यानंतर गायींच्या संगोपनाची अधिक ओढ लागली. त्यानंतर व्यवसायात झोकून दिले. सुरुवातीला बंदिस्त गोपालन होते. आता मुक्त गोठा पद्धतीचा अंगीकार केला आहे. शेतात २४ तास लक्ष देता यावे यासाठी १९९१ मध्ये गावातील घराला सोडचिठ्ठी देत टीनपत्र्यांचा वापर करून छोटासा निवारा शेतातच बांधला. आपल्या निवाऱ्यापेक्षा सिमेंटचा गोठा बांधत जनावरांच्या निवाऱ्याची अधिक काळजी घेतली. नवा गोठा ६० बाय २५ फूट आकाराचा आहे. सध्या १४ गायी आहेत. त्यात ११ गीर, साहिवाल व राठी प्रत्येकी १, दोन म्हशी व लहान अशी एकूण ३२ जनावरे आहेत. दूधविक्री

  • सद्यःस्थितीत ४० लीटर दूध संकलित
  • सुमारे १५ किलोमीटरवरील पारशिवणी येथील मदर डेअरीच्या संकलन केंद्राला पुरवठा
  • सध्या ११ गायी गर्भार आहेत. येत्या काही काळात दूध संकलन १०० लीटरवर जाईल असे लांजेवार सांगतात.
  • या व्यवसायातून वर्षाला दोन ते तीन लाख रुपये मिळतात. त्यातून जनावरे विकत घेणे शक्य होते असे ते म्हणतात.
  • कुकूटपालनाचा आदर्श लांजेवार यांच्या शेतीचे मुख्य वैशिष्ट्य़ म्हणजे बेरड जातीच्या कोंबड्यांचे ते संगोपन करतात. ही जात चवीला चांगली आहे. रोगप्रतिकारक क्षमता चांगली आहे असे ते सांगतात. नागपूर येथील सावजी भोजनालयात या कोंबड्यांच्या मांसाला सर्वाधिक मागणी राहते. तीन ते चार कोंबड्यांपासून सुरू केलेल्या कुकूटपालनात त्यांनी आज भरारी घेतली आहे. मध्यंतरी त्यांच्याकडील कोंबड्याची संख्या हजारांवर पोचली. सध्या ४५५ कोंबड्या आहेत. कमी खर्चीक व्यवसायाची रचना

  • ३२ बाय ८ फुटाच्या लोखंडी खुराड्यातच अंड्यावर बसणाऱ्या कोंबड्यांसाठी डाले (टोपली)
  • या भागात माणसांचा त्रास किंवा संपर्क येत नाही.
  • अंडी दिल्यावर विक्री करण्याऐवजी त्यापासून पिल्ले तयार करून संगोपनावर भर
  •  वर्षभरात प्रति चार महिन्यांनी वेत
  • योग्य वजन झाल्यानंतर मांसल कोंबड्यांची विक्री
  • सन २०१६ पासून ६०३ कोंबड्यांची विक्री. प्रति नग ३००, ५००, ७०० पासून ते कमाल २०००, ४००० रूपयांपर्यंतही दर मिळाला आहे.
  • पैदाशीसाठी कोंबड्याला अधिक दर. आत्तापर्यंत पाच लाख ४१ हजार रुपयांचे उत्पन्न या व्यवसायातून मिळाल्याचे लांजेवार सांगतात.
  • वर्षाला ५० ते २०० पर्यंत कोंबड्यांची विक्री.
  • याच कोंबडीपालनातून टूमदार घर बांधण्यापर्यंतची आर्थिक क्षमता तयार केली.
  • लॉकडाऊनमध्ये नुकसान यंदा ब्रॉयलर पक्षांचे संगोपन सुरू केले होते. मात्र लॉकडाऊनमध्ये सुमारे साडे १० हजार कोंबड्यांचे नुकसान होऊन आठ लाख रुपयांचा आर्थिक फटका बसला. सध्या या कोंबड्यांच्या संगोपनाची जबाबदारी मित्राकडे सोपवली आहे. मत्स्यपालन

  • भाडेतत्त्वावरील १५ एकरांपैकी दोन एकरांवर तलाव.
  • गेल्यावर्षी ४० किलो मत्स्यबीज टाकले. परंतु पाऊस जास्त झाल्याने बरेच मत्स्यबीज वाहून गेले. केवळ ४८ किलो मासे मिळाले. यंदा लॉकडाऊनमध्ये २२ मार्चनंतर ४८ किलो माशांची विक्री २०० रुपये प्रति किलो दराने.
  • सध्या ७० किलो मासे तयार बिजांवर आहेत.
  • शेतीतील अन्य वैशिष्ट्य़े

  • सेंद्रिय शेतीवर भर. शेणखताची मात्रा दर तीन वर्षांनी. गोमूत्राचाही वापर. रासायनिक खतांचा कोणत्याही प्रकारे वापर नाही.
  • नेपीयर गवत, ज्वारी यांची लागवड. चार एकरांतील करार शेतीत मका लागवड
  • फेब्रुवारीत लागवड केलेल्या मक्यापासून मुरघास निर्मिती
  • रेनगन, स्प्रिंकलरचाही वापर
  • तत्कालीन कृषी साहाय्यक आर.जी. नाईक यांचे मार्गदर्शन
  • तालुका कृषी विभागाचा १० हजार रुपयांचा पुरस्कार तसेच यंदा कृषी दिनानिमित्त प्रयोगशील शेतकरी म्हणून नागपूर येथील संस्थेचा ३१ हजार रूपयांचा पुरस्कार.
  • अ‍ॅग्रोवनचा संग्रह लांजेवार ॲग्रोवनच्या साह्याने शेती करतात. सन २०१० पासून अ‍ॅग्रोवनच्या अंकांचा संग्रह त्यांच्याकडे पाहण्यास मिळतो. अ‍ॅग्रोवनमुळेच प्रयोगशीलतेला उत्तेजन मिळाल्याचे ते आत्मविश्‍वासाने सांगतात.

    ताळेबंद ठेवला अनेक वर्षांपासून शेतीतील कामे, मजूर व अन्य व्यवस्थापन यांच्या नोंदी ठेवल्या आहेत. त्यातून शेतीचा ताळेबंद दरवर्षी समजून अर्थकारण भक्कम करण्यास मदत होते. संपर्क- राम लांजेवार- ९७६५४४४२१९

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Maharashtra Rain : सोमवारपासून पुन्हा पावसाचा अंदाज; राज्यातील बहुतांशी भागात ऊन आणि उकाडा वाढण्याची शक्यता

    Kharif Planning Review Meeting : आठ लाख हेक्टरवर खरीप पेरण्यांचे नियोजन

    Banana Farming Management : सिंचन, खत व्यवस्थापनावर भर

    Kokan Development : कोकणातील आंबा पिकासाठी स्वतंत्र मंडळ स्थापणार

    Indian Agriculture : शेतातील सेंद्रिय पदार्थाचे पुनर्चक्रीकरण

    SCROLL FOR NEXT