Ganesh Chavan and Yogesh Ware with their ajwain crop 
यशोगाथा

नगदी पिकापेक्षाही ओवा ठरतोय फायदेशीर

कोरडवाहू स्थितीमध्ये कमी पाण्यातही तग धरणारे आणि कीड रोगाचा फारसा प्रादुर्भाव नसलेले पीक म्हणून शेतकरी ओवा पिकाकडे पाहत आहे. कमी उत्पादन खर्च, शाश्वत उत्पादन, साठवणीचा अधिक काळ यामुळे उत्तम दर मिळवण्याची क्षमता या पिकात आहे. मराठवाड्यातील अवर्षणाच्या स्थितीत उशिरा पेरणीसाठी उत्तम पर्यायी पीक ठरत आहे.

Santosh Munde

कोरडवाहू स्थितीमध्ये कमी पाण्यातही तग धरणारे आणि कीड रोगाचा फारसा प्रादुर्भाव नसलेले पीक म्हणून शेतकरी ओवा पिकाकडे पाहत आहे. कमी उत्पादन खर्च, शाश्वत उत्पादन, साठवणीचा अधिक काळ यामुळे उत्तम दर मिळवण्याची क्षमता या पिकात आहे. मराठवाड्यातील अवर्षणाच्या स्थितीत उशिरा पेरणीसाठी उत्तम पर्यायी पीक ठरत आहे.

राजस्थान, गुजरातच्या काही भागामध्ये ओव्याची लागवड केली जाते. या पिकाविषयी कुतूहल वाटल्याने औरंगाबाद जिल्ह्यातील शंकरपूर (ता. गंगापूर) येथील शेतकरी अशोकराव पोळ यांनी सुमारे वीस वर्षापूर्वी बडीशेपेसोबत ओव्याची प्रायोगिक पातळीवर लागवड केली. हे पीक आपल्याकडे चांगल्या प्रकारे येत असल्याचा अंदाज आल्यानंतर औरंगाबाद जिल्ह्यामध्ये या पिकाखालील क्षेत्र वाढत गेले. गतवर्षीच्या हंगामापर्यंत औरंगाबाद जिल्ह्यात ओवा शेतीचे क्षेत्र जवळपास पाचशे एकर पर्यंत विस्तारले. आपत्कालीन व्यवस्थापनात उत्तम पर्यायी पीक

  • ऑगस्टच्या मध्यान्हानंतर लागवड करणे शक्य. लेट खरिपासाठी उत्तम पर्याय ठरतो.
  • कोरडवाहू अवर्षणाच्या भागातही घेता येणारे पीक
  • सिंचनाची सोय असल्यास एकरी दहा क्विंटलपर्यंत उत्पादन शक्य.
  • सरळ वाण असल्याने घरगुती बियाणे वापरू शकतो.
  • मावा कीड व भुरी रोग वगळता अन्य कीड-रोगांचा फारसा प्रादुर्भाव नाही.
  • जास्त काळ साठवून ठेवण्याची क्षमता. साठवणीत कीड लागत नाही.
  • ओवा शेती ठरते फायद्याची...

  • उत्पादन खर्च ः एकरी चार ते सहा हजार रुपये
  • एकरी ४ ते १० क्विंटलपर्यंत उत्पादन शक्य
  • ६ ते १० हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत दर मिळतो.
  • निव्वळ नफा कपाशी पेक्षाही जास्त मिळू शकतो.
  • नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील अनेक शेतकरी या पिकाकडे वळले आहेत.
  • औरंगाबाद जिल्ह्यात लासुर स्टेशन येथे बाजारपेठ.
  • बेकरी इंडस्ट्री, वाइन इंडस्ट्री, मसाला उद्योग व आयुर्वेदिक क्षेत्रात भारतात व भारताबाहेर मागणी वाढती.
  • राज्यातील दहा वर्षातील दर पाहता पीक फायदेशीर ठरत असल्याचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे.
  • लागवडीची पद्धती टोकण पद्धतीने लागवड केली जाते. जमिनीच्या प्रकारानुसार दोन ओळीतील अंतर तीन फूट, साडेतीन फूट किंवा चार फूट ठेवतात. दोन झाडातील अंतर एक फूट ते दीड फुटापर्यंत ठेवतात. औरंगाबादसह मराठवाड्यातील ओवा उत्पादकांनी साधारणतः दोन बाय एक, दोन बाय दोन, अडीच बाय एक, अडीच बाय अडीच, साडेतीन बाय साडेतीन फूट अंतरावर लागवडीचे प्रयोग आत्तापर्यंत केले आहेत. मूल्यवर्धनाची संधी ओवा पिकाचे वाढते क्षेत्र पाहता या पिकांमध्ये मूल्यवर्धनाची संधी आहे. केवळ स्वच्छता, प्रतवारी यासह आकर्षक पॅकिंग केल्यास उत्तम ब्रँड तयार होऊ शकतो. या पिकावर आधारीत एखाद्या प्रक्रिया उद्योगाची उभारणी शक्य झाल्यास शेतकऱ्यांना अधिक दर मिळू शकेल, या माहिती डॉ. किशोर झाडे यांनी दिले. शेतकऱ्यांचे अनुभव... वीस वर्षांपूर्वी माझ्या वडिलांनी झेंडू शेतीजवळ बडीशेप व ओव्याची थोड्या प्रमाणात लागवड केली. बडीशेपेवर रोगाचा प्रादुर्भाव झाला. मात्र, ओवा पीक कमी पाण्यातही तगले. कीडरोगांनाही बळी पडले नाही. तेव्हापासून आजपर्यंत सातत्याने एक एकर क्षेत्रावर ओव्याची लागवड असते. गेल्या हंगामात कोरडवाहूमध्ये एकरी पाच क्विंटल उत्पादन मिळाले. सध्या आठ ते नऊ हजार रुपये प्रतिक्विंटल असे दर आहेत. अपेक्षित दर मिळेपर्यंत विक्री न करण्याचे तंत्र अवलंबतो. - सुनील पोळ, ९५८८४९३५९९ (शंकरपूर, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) ओवा लागवडीनंतर उगवणीला थोडा वेळ लागतो. मात्र, ओवा पीक इतर पिकांच्या तुलनेत उत्पादन खर्च कमी आहे. नुकत्याच पार पडलेल्या हंगामात दोन एकर क्षेत्रामध्ये ओव्याचे पीक घेतले. ७ ते ८ क्विंटल ओवा घरात साठवला आहे. - योगेश वारे (औराळी, ता. कन्नड, जि. औरंगाबाद.) २००६ पासून किमान दोन एकरवर ओवा शेती करतो. अडीच बाय अडीच अंतरावर लागवड केलेल्या ओव्यातून गेल्या हंगामात आठ क्विंटल उत्पादन मिळाले. गेल्या काही वर्षात प्रती क्विंटल सहा ते सोळा हजार असे दर मिळाले आहेत. - गणेश चव्हाण, ९४२०९४४५६० (वजनापूर, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद.) मी कृषी विद्यापीठातून सेवानिवृत्त प्राचार्य असून, स्वतः संपूर्ण सेंद्रिय पद्धतीने ओवा शेती करतो. संवेदनशील अवस्थेमध्ये एक पाणी दिल्यास एकरी साडेआठ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळू शकते. उत्पादन खर्चाच्या तुलनेमध्ये चांगला फायदा हाती येत आहे. - डॉ. पी. एस. कदम, ८००७८१०७७८ (पोटा (शेळके), ता.औंढा नागनाथ, जि. हिंगोली.) कायम दुष्काळाचा सामना करणाऱ्या मराठवाड्यात कोरडवाहू पीक म्हणून ओवा फायदेशीर ठरत आहे. कमी पावसात एखादे संरक्षित पाणी दिल्यास शाश्वत उत्पादन देणारे हे पीक आहे. उत्पादन खर्च कमी असल्याने चांगला फायदा मिळतो. केव्हिकेमार्फत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाते. - डॉ. किशोर झाडे, ९९२१८०८१३८ (कार्यक्रम समन्वयक, कृषी विज्ञान केंद्र, औरंगाबाद.)

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Mahayuti Press Conference : महाराष्ट्रातील हा ऐतिहासिक विजय असून लाडक्या बहिणींनी अंडरकरंट दिला; महायुतीच्या पत्रकार परिषदेतून शिंदे, फडणवीस, अजित पवार यांची मविआवर टीका

    Onion Cultivation : एक लाख हेक्टरपर्यंत पोहोचले कांदा लागवड क्षेत्र

    Sangli Vidhansabha Election : सांगलीत भाजपचं मायक्रो प्लॅनिंग; आर. आर. आबांच्या मुलाने वादळात दिवा लावला

    Lumpy Skin Disease : दिघंचीमध्ये ‘लम्पी’चा विळखा

    Agrowon Podcast : कांदा बाजारभाव दबावात; कापूस, सोयाबीन, कांदा तसेच काय आहेत गहू दर?

    SCROLL FOR NEXT