सनपुरी (जि. परभणी) येथील प्रयोगशील शेतकरी नरेश गणेशराव शिंदे हे नैसर्गिक शेती पद्धतीने हळदीचे उत्पादन घेतात. शेतकरी गटाच्या माध्यमातून त्यांनी शेती विकासाला चालना दिली आहे. हळद पावडर तयार करून `हिरण्य' ब्रॅंन्डने विक्री करतात. याचबरोबरीने डाळी तसेच धान्याची थेट ग्राहकांना विक्री करत शेती किफायतशीर केली आहे.
सनपुरी (जि. परभणी) येथील प्रयोगशील शेतकरी नरेश शिंदे यांनी वनस्पतिशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केल्यानंतर स्पर्धा परिक्षेच्या माध्यमातून नोकरीसाठी प्रयत्न केले. स्पर्धा परिक्षेत यशाने हुलकावणी दिल्यानंतर ते निराश झाले नाहीत. व्यवसायासाठी गॅस एजन्सीमध्ये व्यवस्थापनाचा अनुभव घेतला. सकारात्मक दृष्टिकोन ठेवत परंपरागत शेतीमध्ये बदल घडविण्यासाठी २००१ पासून पूर्णवेळ शेती नियोजनाला सुरवात केली. त्यावेळी संयुक्त कुटुंबाची एकूण ९० एकर एकूण जमिनीपैकी २० क्षेत्र बारमाही बागायती तर बाकीची हंगामी बागायती होते. दोन विहीर, कूपनलिकेच्या जोडीला काही किलोमीटरवर असलेल्या दुधना नदीवरून पाइप लाईनव्दारे सिंचनासाठी पाणी आणले. त्यामुळे केळी,ऊस पिकांसोबत जिरायती क्षेत्रात मूग, तूर, तर रब्बी ज्वारी, गहू, हरभरा लागवडीचे नियोजन ठेवला. भावांच्या मदतीने शेती व्यवस्थापन ठेवले. आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार कृषी विभागाची शेतीशाळा, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांच्या गाठी-भेटीतून नवीन पीक पद्धती, लागवड तंत्रज्ञानाची माहिती मिळू लागली. हैदराबाद येथील इक्रिसॅट संस्था आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ यांच्यातर्फे रब्बी ज्वारीच्या होप प्रकल्पांतर्गत गावाची निवड झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय संस्थेतील शास्त्रज्ञ गावी येऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करू लागले. चार वर्षापूर्वी सनपुरी गावात त्यांनी समविचारी शेतकऱ्यांना एकत्र करून आत्मा अंतर्गत हरितक्रांती सेंद्रिय शेतकरी गटाची स्थापना केली. आंतरपीक पध्दतीचे प्रयोग
दहा एकरावर नैसर्गिक पद्धतीने शेती दरम्यानच्या काळात कुटुंबामध्ये जमिनीची विभागणी झाल्यानंतर नरेश शिंदे यांच्या वाट्याला २० एकर जमीन आली. त्यापैकी १० एकर क्षेत्रात गेल्या सहा वर्षापासून नैसर्गिक पद्धतीने पीक व्यवस्थापन ठेवले आहे. प्रामुख्याने गोखूर खत, जीवामृत, परभणी कृषी विद्यापीठाची जिवाणू खते, लसूण, तंबाखू, मिरचीपासून तयार केलेल्या कीडनाशकाचा वापर केला जातो. यंदा नैसर्गिक पद्धतीने अडीच एकरावर हळद लागवड आहे. उर्वरित क्षेत्रामध्ये खरिपात मूग, उडीद, तूर आणि रब्बीमध्ये हरभरा, बन्सी गहू, ज्वारी लागवड असते. उर्वरित दहा एकर क्षेत्रावर सोयाबीन, कपाशी लागवड असते.
हळद लागवडीचे नियोजन
डाळ, हळद लोणचे निर्मिती
सोलर ड्रायरव्दारे हळद पावडर निर्मिती
थेट ग्राहकांना विक्री
अॅग्रोवन दिशादर्शक नरेश शिंदे हे ‘अॅग्रोवन'चे सुरुवातीपासूनचे वाचक आहेत. अॅग्रोवनमधील प्रयोगशील शेतकऱ्यांच्या यशकथापासून प्रेरणा घेत त्यांनी शेतामध्ये अनेक प्रयोग केले. दिवाळी भेट म्हणून अनेक शेतकरी मित्रांना शिंदे अॅग्रोवन दिवाळी अंक देतात. नुकतीच नरेश शिंदे यांची वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कृषी रसायन शाखेच्या अभ्यास मंडळावर सदस्य म्हणून निवड झाली आहे.
- नरेश शिंदे ः ९४२१३८६८३३
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.