‘व्हॅलेंटाइन डे’साठी फुलला गुलाब
‘व्हॅलेंटाइन डे’साठी फुलला गुलाब 
यशोगाथा

‘व्हॅलेंटाइन डे’साठी फुलला गुलाब

गणेश कोरे

पुणे जिल्ह्यातील मावळ तालुका हा निर्यातक्षम गुलाब उत्पादनासाठी अग्रेसर. तालुक्यात सुमारे २५० हेक्टरवरील पॉलिहाउसमध्ये दर्जेदार गुलाबांचे उत्पादन घेतले जाते. या वर्षीच्या हंगामाबाबत पवना फूल उत्पादक संघाचे अध्यक्ष मुकुंद ठाकर म्हणाले, की कोरोना संकटामुळे गेली दोन वर्षे फुलशेती अडचणीत आली होती. मात्र कोरोना संकट निवळल्यानंतर आता गुलाब फुलांची मागणीदेखील वाढली आहे. ‘व्हॅलेंटाइन डे’च्या निमित्ताने जगभरातून भारतीय गुलाबांना मागणी असते. या वर्षी मावळ तालुक्यातील सुमारे २५० हेक्टरवरील लागवडीतून गेल्या १० ते १२ दिवसांत सुमारे ४० लाख गुलाब फुलांची निर्यात झाली. सुमारे ६० लाख फुले देशांतर्गत बाजारपेठेत विक्रीसाठी पाठविण्यात आली. कोरोना, निसर्ग चक्रीवादळाने उत्पादनात घट कोरोना संकटात फुलांची मागणी ठप्प झाल्याने मोठ्या प्रमाणावर गुलाब फुले टाकून देण्याबरोबरच वर्षभर रोपे टिकविण्यासाठीचा व्यवस्थापन खर्च वाढला होता. पॉलिहाउसमध्ये काम करणारे कामगार हे बहुतांश झारखंड आणि परप्रांतीय असल्याने ते त्यांच्या गावी निघून गेले होते. अशा परिस्थितीत पॉलिहाउस टिकविणे अवघड झाले होते. परिणामी, अनेक पॉलिहाउसधारकांनी आणि कंपन्यांनी गुलाब फुलांऐवजी भाजीपाला उत्पादनाला प्राधान्य दिले. निसर्ग चक्रीवादळात पॉलिहाउसचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. परंतु त्याची नुकसान भरपाई शासनाकडून मिळालेली नाही. अशा दुहेरी संकटामुळे पॉलिहाउसमधील फुलांचे उत्पादन सुमारे २५ टक्क्यांनी घटल्याचे मुकुंद ठाकर आणि तळेगाव फ्लोरिकल्चर पार्क फूल उत्पादक संघाचे सचिव मल्हारराव ढोले यांनी सांगितले. देशांतर्गत बाजारपेठेत चांगले दर  कोरोना आणि निसर्ग चक्रीवादळामुळे पॉलिहाउसचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे फुलांचे उत्पादन २५ ते ३० टक्क्यांपर्यंत घटल्याने बाजारपेठेतील आवक कमी राहिली. परिणामी, या वर्षी निर्यातीपेक्षा देशांतर्गत बाजारपेठेत चांगली मागणी राहिल्याचे ठाकर आणि ढोले यांनी सांगितले. या वर्षी विमानाचे भाडे तिप्पट वाढल्याने निर्यातदारांनी देखील निर्यातीसाठी आखडता हात घेतला. यामुळे नियमित निर्यातीपेक्षा ३० टक्क्यांनी निर्यात कमी झाली. देशांतर्गत कोरोना आणि ओमिक्रॉनचे संकट निवळल्यामुळे लग्न हंगाम जोरात सुरू झाला आहे. एका सर्वेक्षणानुसार दिवाळीपासून ते जूनपर्यंत देशात सुमारे २५ लाख लग्न होत आहेत. या लग्नाच्या सजावटीसाठी फुलांची मागणी वाढल्याने निर्यातीपेक्षा देशांतर्गत बाजारपेठेत प्रति फुलांचे दर दोन ते तीन रुपयांनी जास्त राहिले. ‘फ्लोरिकल्चर पार्क'मधून निर्यात  तळेगाव फ्लोरिकल्चर पार्क फूल उत्पादक संघाचे सचिव मल्हारराव ढोले म्हणाले, की पार्कमध्ये सुमारे २०० एकर क्षेत्रावर पॉलिहाउसची उभारणी आहे. यामधील सुमारे ६० ते ७० टक्के पॉलिहाउसमधून गुलाबाचे उत्पादन होत आहे. उर्वरित पॉलिहाउसमधून रोपवाटिका आणि भाजीपाल्याचे उत्पादन होत आहे. या वर्षी व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने फ्लोरिकल्चर पार्कमधून गेल्या १० दिवसांत सुमारे ३ लाख फुलांची निर्यात झाल्याचा अंदाज आहे. तर देशांतर्गत बाजारपेठेत १५ लाख फुलांची विक्री झाल्याचा अंदाज आहे. माझ्या साडेतीन एकरातील पॉलिहाउसमध्ये लाल आणि विविधरंगी फुलांचे उत्पादन होत आहे.व्हॅलेंटाइन डेसाठी मी या वर्षी निर्यातीपेक्षा देशांतर्गत विक्रीवर भर दिला. यामध्ये लाल गुलाब सुमारे ६० हजार आणि विविधरंगी सुमारे ४० हजार फुलांची विक्री केली. गुलाबाला १५ ते १८ रुपये दर... कोरोना आणि निसर्ग चक्रीवादळाने नुकसानीत आलेल्या गुलाब शेतीला आता चांगले दिवस आले आहेत. व्हॅलेंटाइन डे आणि लग्न हंगामामुळे गुलाबाला उच्चांकी दर मिळत असून आज प्रति गुलाबाला १५ ते १८ रुपये असा दर मिळत असल्याची माहिती दावडी येथील शेतकरी बाबाजी गाडगे आणि खरपुडी मांडवळा (ता. खेड) येथील कैलास चौधरी यांनी दिली. या वर्षी जानेवारीतील थंडीमुळे फुले लवकर उमलली नाहीत; परिणामी गुलाबाचे उत्पादन निम्म्याने घटले. १५ फेब्रुवारीपर्यंत बाजारात जाणारी फुले थंडीमुळे कमी प्रमाणात जात आहे. व्हॅलेंटाइन डे आणि लग्नसराईमुळे बाजारात गुलाबास जास्त मागणी आहे. मागील वर्षी वीस फुलांच्या बंचला जेमतेम १५० ते २०० रुपये दर मिळाला होता. मात्र आता वीस फुलांच्या बंचला फुलांच्या दांडीच्या लांबीनुसार तीनशे ते साडेतीनशे रुपये दर मिळत आहे. पहिल्यांदाच गुलाबास उच्चांकी भाव मिळत असल्यामुळे फूल उत्पादक खुशीत आहेत. खेड तालुक्यातून रांची, हैदराबाद, पाटणा, दिल्ली, इंदूर, जयपूर व नागपूर येथे फुले पाठवली जातात अशी माहिती शेतकरी बाबाजी गाडगे, कैलास चौधरी, संदीप भोगाडे, सुरेश कान्हूरकर यांनी दिली. बाजार समितीत चांगले दर.. . ‘‘पुणे बाजार समितीमध्ये सात फेब्रुवारीपासून व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने गुलाबाची आवक सुरु झाली. गेल्या चार पाच दिवसांपासून रोज सुमारे २ ते ३ हजार बंडल (४० ते ५० हजार फुले) आवक होत आहे. एका बंडलला (२० फुले) ३०० ते ३५० रुपये दर मिळत आहे. गेल्या अनेक वर्षांतील हा सर्वोच्च दर आहेत. लग्न हंगामामुळे पुणे बाजार समितीतून बंगलोर, हैद्राबाद, राजकोट येथून मागणी वाढली आहे.‘‘ - किरण ननावरे (आडतदार,पुणे बाजार समिती) लाल रंगाच्या गुलाबाचे दर फूल दांड्याची लांबी (सेंमी.) : दर (रुपये) ४० : १३-१४ ५०-६० : १५--१६ ६०-७० : १७-१८ विविध रंगी गुलाबाचे दर रंग :  दर (रुपये) पांढरा : २२-२५ गुलाबी : २२-२५ पिवळा : २०-२२ मागणी असलेल्या जाती ः लाल, ॲव्हलांच व्हाइट, जुमेलिया, पिंक ॲव्हलांच, गोल्ड स्ट्राइक (पिवळा), सोलेट (पिवळा), रिव्हाव्हल (लाइट पिंक), हॉटशॉट (डार्क पिंक) देशांतर्गत बाजारपेठ दिल्ली, जम्मू-काश्‍मीर, अमृतसर, लुधियाना, कटारा, कोलकाता, रांची, इंदूर, भोपाळ, जयपूर, पाटणा, गुजरात, गोवा. निर्यात होणारे देश ः लंडन, जर्मनी, जपान, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, युरोप, सिंगापूर, दुबई. संपर्क ः मल्हारराव ढोले, ८६००३००७९५ मुकुंद ठाकर, ९८२३४४०८०३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT