नाशिक ः कोरोना संकटकाळात अनेकांनी संधी गमावल्या, तर अनेकांनी संधी निर्माण केल्या.चांदवड तालुक्यातील शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी असलेल्या आणि सध्या नाशिकमध्ये स्थायिक झालेल्या पाच मैत्रिणींचे हे एक सकारात्मक उदाहरण. नागलीचे पौष्टिक व आरोग्यवर्धक गुणधर्म ओळखून व्यावसायिक पातळीवर मूल्यवर्धन करण्याची संकल्पना या महिलांना सुचली. प्रबळ इच्छाशक्तीतून उद्योगाची उभारणी केली. कोरोना काळात निर्मला शशिकांत जाधव, लता श्यामराव जाधव, वैशाली रावसाहेब रकिबे, पूनम कमलेश उशीर आणि अंजली उल्हास बोरसे या पाच मैत्रिणी नागली पदार्थांसंबधी चर्चा करायच्या. एप्रिल, २०२० मध्ये घरगुती स्तरावर नागलीचे पदार्थ बनविले. या पदार्थांना ग्राहकांकडून मागणी लक्षात आल्यावर प्रक्रिया उद्योगाचा निर्धार हीच त्यांची उद्योजकीय प्रेरणा ठरली. प्रक्रिया उद्योगाची उभारणी पहिल्या टप्प्यात या महिलांनी कोरोना काळात अन्नप्रक्रियासंबधी ऑनलाइन प्रशिक्षणामध्ये नागली मूल्यवर्धनासंबंधी सखोल माहिती घेतली. प्रक्रिया व्यवसाय उभारणीसाठी उद्योग आधार कार्ड तसेच आवश्यक कागदपत्रे जमविली. उद्योग उभारणीसाठी जऊळके (ता. दिंडोरी) येथील औद्योगिक परिसरात ठिकाण निश्चित केले. स्थानिक बाजारपेठेसह गुजरातमध्ये प्रक्रिया यंत्रांची खरेदी झाली. कोरोनामुळे संचारबंदी असल्याने प्रक्रिया यंत्रे आणण्यासाठी घरातील पुरुषांची मदत झाली. परिचयाचे लोक, नातेवाइकांकडेच संपर्क करून नाशिक आणि धुळे जिल्ह्यातून नाचणीची खरेदी सुरू झाली. तसेच कृषी विभागामार्फत ‘विकेल ते पिकेल’ अभियानातून पेठ, सुरगाणा भागांतील आदिवासी शेतकऱ्यांकडून पुरवठा करार झाले. या महिलांनी सोने-नाणे गहाण ठेवून २० लाखांचे भांडवल जमविले. पण उद्योग उभारण्यासाठी प्रत्यक्षात एक कोटी रुपयांच्या जवळपास खर्च होता. त्यासाठी विविध बँकांकडे पाठपुरावा केला; मात्र कोरोना, व्यावसायिक अनुभव नसणे हे कारण देत कर्ज नाकारले गेले. अखेर एका बँकेने ‘क्रेडिट गॅरंटी फंड ट्रस्ट फॉर मायक्रो अँड स्मॉल एंटरप्राइज’योजनेतून कर्जाची मागणी मान्य केली. पतपुरवठा उपलब्ध झाल्यानंतर डिसेंबर २०२० मध्ये ‘स्टार बाइट’ ब्रॅण्डने नागली प्रक्रिया उद्योग उभा राहिला. यामध्ये १५ महिलांना रोजगार मिळाला आहे. या प्रकल्पास जिल्हा उद्योग केंद्राचे चांगले सहकार्य तसेच महिला आर्थिक विकास धोरणामधून अनुदान मिळाले. प्रक्रियेसाठी कच्चा माल खरेदी लता जाधव करतात. प्रकल्प व्यवस्थापन निर्मला जाधव, पूनम उशीर यांच्याकडे उत्पादनाची जबाबदारी, तर वाणिज्य पदवीधर अंजली बोरसे आर्थिक व्यवहार पाहतात. वैशाली रकिबे यांच्याकडे उत्पादन विक्री व्यवस्था आहे. नागलीपासून २५ प्रकारची उत्पादने
- निर्मला जाधव, ९८९०४८७६४३
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.