Custard apple arrives at the market committee at Gultekdi, Pune.
Custard apple arrives at the market committee at Gultekdi, Pune. 
यशोगाथा

सीताफळाने दिला शेतकऱ्यांना आधार

sandeep navale

ऑगस्ट ते डिसेंबर कालावधीपर्यंत सातत्याने मागणी असलेल्या फळांमध्ये सीताफळाचा समावेश असतो. यंदा ऑगस्ट ते ऑक्टोबर हंगामात दररोज १० ते १२ टन आवक झाली. मागणी अधिक राहून प्रति किलो १० ते २०० रुपयांपर्यंत उच्चांकी दर मिळाला. यामुळे शेतकऱ्यांना चांगलाच आधार मिळाला. दसरा, दिवाळी व त्यापुढील काळ हा विविध फळांच्या बाजारपेठेतील आवकेचा असतो. सीताफळ हे त्यातील मागणी असलेले महत्त्वाचे पीक आहे. पुणे- गुलटेकडी येथील छत्रपती शिवाजी महाराज मार्केटमध्ये पुणे जिल्ह्यातील वडकी, राजगुरुनगर, उरळी कांचन, यवत, पाटस, पुरंदर, नगर जिल्ह्यातील पारनेर, नगर, नेवासा, सातारा, औरंगाबाद या भागातून मोठ्या प्रमाणात आवक होते. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना संकटामुळे थेट विक्रीवर शेतकरी भर देऊ लागले आहेत. गुलटेकडी येथे यंदा ऑगस्ट ते ऑक्टोबर या हंगामात दररोज अवघी १० ते १२ टन आवक झाली. त्यातच मागणी अधिक राहिल्याने दरात चांगलीच वाढ होऊन प्रति किलोला २०० रुपयांपर्यंतचा उच्चांकी दर मिळाला. यामुळे शेतकऱ्यांना चांगलाच आधार मिळाला आहे. सध्या दररोज चार ते पाच टन आवक सुरू असून, प्रति किलोला १० रुपयांपासून ते ७० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. या भागातून होते आवक राज्यात जवळपास १० ते १५ हजार हेक्टर क्षेत्र सीताफळाखाली आहे. पुणे मार्केटमध्ये या जिल्ह्यातील वडकी, खेड, राजगुरुनगर, उरुळी कांचन, लोणी, यवत, पाटस, पुरंदर, नगरमधील, पारनेर, नगर, नेवासा, सातारा, औरंगाबाद या भागांतून मोठ्या प्रमाणात आवक होते. यंदाचे दर (प्रति किलो रु.) जून ते ऑक्टोबर- ५० ते २०० ऑक्टोबर ते नोव्हेंबर- १० ते १०० डिसेंबर ते जानेवारी ४० ते २०० या वाणांची आवक बाजारात गावरान, बाळानगर, एनएमके गोल्डन अशा तीन वाणांची आवक मोठ्या प्रमाणात पाहण्यास मिळत आहे. गावरान वाणात गराचे प्रमाण चांगले असते. टिकवणक्षमता अधिक व मागणीही चांगली असते. बाळानगर वाणात गराचे प्रमाण कमी व गोडी जास्त असते. एनएमके गोल्डन वाणाची फळे आकारानी मोठी असतात. गोडीही चांगली असते. बहुतांश सण ऑगस्ट ते डिसेंबर कालावधीत येतात. त्या वेळी या फळांना ग्राहकांकडून मागणी अधिक असते. साहजिकच मार्केटमध्ये दररोज १० ते १२ टन आवक व्हायची. त्या वेळी किलोला १० ते २०० रुपयांपर्यंत दर होता. त्यानंतर दरात घसरण झाल्याने प्रक्रिया दारांचा खरेदीकडे कल वाढला होता. त्या वेळी दर १० ते १०० रुपयांपर्यंत झाले. बासुंदी, कुल्फी, पल्प, आइस्क्रीम, रबडी आदी पदार्थांसाठी सीताफळाला मागणी असते. मार्केटमध्ये हंगामात चांगली आवक होत असली तरी इतर वेळेस ती दररोज ३ ते १० टनांपर्यंत असते. फळांना सरासरी ६० पासून ८० रुपये दर मिळत असून, महिन्याला सरासरी ४ ते ५ कोटींची उलाढाल होत असावी असा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे. प्रतिक्रिया यंदा हंगामात पहिल्यांदाच सीताफळाची आवक कमी झाली आहे. त्यामुळे दर दोनशे रुपयांपर्यंत गेले होते. सध्या आवक कमी असून, दर किलोला ७० ते ८० रुपयापर्यंत आहेत. एनएमके गोल्डन या जातीच्या फळाला गोवा, बंगळूर, हैदराबाद येथे सर्वाधिक मागणी असल्याने तेथे ती पाठवली जात आहेत. - युवराज काची, उपाध्यक्ष, अडते असोसिएशन, पुणे शेतकरी अनुभव  वडकी येथील शशिकांत फाटे म्हणाले, की पुणे शहरापासून १५-२० किलोमीटर अंतरावर वडकी (तळेवाडी) गावात आमची एकत्रित दहा ते बारा एकर शेती आहे. आमचे वडील पांडुरंग फाटे नोकरी करीत असताना पूर्वी अर्धा एकर क्षेत्रात सीताफळ बाग केली होती. त्यानंतर क्षेत्र वाढविण्यावर भर दिला. आता अडीच एकर क्षेत्र आहे. एकरी आठ ते दहा टन उत्पादन मिळते. काढणी केल्यानंतर ग्रेडिंग करून हंगामात दररोज ३० ते ३५ क्रेट बाजारात पाठवितो. यंदा प्रति किलो दहा ते कमाल १८० रुपयांपर्यंत दर मिळाला. सरासरी दर ७० रुपयांपर्यंत मिळाला. - शशिकांत फाटे, वडकी ९५११६८९१९३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tata Tea : ‘टाटा टी’कडून शेतकऱ्यांनी काय शिकायला हवे?

Indian Politics : पतंग, रेवड्या आणि वास्तव

Cotton Market : कापूस का काळवंडला?

Agriculture Commodity : मक्याच्या दरात घसरण; हळदीची पुन्हा उसळी

Kolhapur Market Rate : कोंथिबीर, पालेभाज्या २० रुपये पेंढी उष्म्यामुळे भाजी मंडईत आवक घटली

SCROLL FOR NEXT