Rain Alert Agrowon
हवामान

Maharashtra Rain : सात जिल्ह्यांना आज येलो अलर्ट; राज्यातील काही भागात आज आणि उद्या पावसाचा अंदाज

Rain Alert : हवामान विभागाने दोन दिवस काही भागात पावसाचा अंदाज दिला.

Anil Jadhao 

IMD Report : राज्यात अनेक ठिकाणी आज काही वेळ ढगाळ वातावरण होते. तर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी हलक्या सरी पडल्या. हवामान विभागाने दोन दिवस काही भागात पावसाचा अंदाज दिला.

हवामान विभागाने आज राज्यातील सात जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट दिला. कोकणातील सिंधुदूर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज दिला. तर यावेळी ३० ते ४० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याचा अंदाजही आहे.

तसेच पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांनाही काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. तर पुणे, धाराशिव आणि ठाणे जिल्ह्यात विजांसह काही ठिकाणी हलक्या सरी पडतील, असा अंदाज हवामान विभागाने दिला.

उद्याही राज्यातील पाच जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला. सिंधुदूर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. तर पुणे, रायगड आणि सोलापूर जिल्ह्यात विजांसह हलक्या सरी पडतील, असाही अंदाज हवामान विभागाने दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Relief: नाशिकसह तीन जिल्ह्यांतील १ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना दिलासा, ८६ कोटी ६५ लाख मदत मंजूर

Agri University Research : कृषी विद्यापीठाची संशोधनात ओळख अधिक बळकट होईल

Ring Road Project : रिंग रोड बाधितांचा शासनाविरोधात एल्गार

Murrah Buffalo Subsidy: मुऱ्हा म्हैस खरेदीसाठी ‘चितळे’ देणार अनुदान

Kisan Credit Card : किसान क्रेडिट कार्ड, पशू किसान क्रेडिट कार्डातील अडचणी सोडवा

SCROLL FOR NEXT