Rain Update  Agrowon
हवामान

Weather Forecast : मराठवाडा, विदर्भात पावसाचा येलो अलर्ट

Rain Update : सुर्य आग ओकायला लागल्याने कमाल तापमान हंगामातील उच्चांकी पातळीवर पोचले आहे. राज्यात वादळी वाऱ्यासह पाऊस देखील हजेरी लावत आहे.

अमोल कुटे

Pune News : सुर्य आग ओकायला लागल्याने कमाल तापमान हंगामातील उच्चांकी पातळीवर पोचले आहे. राज्यात वादळी वाऱ्यासह पाऊस देखील हजेरी लावत आहे. अकोला येथे हंगामातील उच्चांकी ४४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

आज (ता. २१) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी वारे, विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे. उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता आहे.

विदर्भापासून कर्नाटक गोव्याच्या किनारपट्टीपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. तर दक्षिण कर्नाटक, दक्षिण तामिळनाडूपर्यंत वाऱ्यांचे प्रवाह खंडीत झाले आहेत. यामुळे राज्यात पावसाला पोषक हवामान आहे.

आज (ता. २१) मध्य महाराष्ट्रातील जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, बीड लातूर, नांदेड विदर्भातील यवतमाळ, गडचिरोली जिल्ह्यात वादळी वारे, विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

शनिवारी (ता. २०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अकोला येथे राज्यातील यंदाच्या हंगामातील उच्चांकी ४४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर अकोला, चंद्रपूर, वाशीम, जळगाव, ब्रह्मपूरी येथे तापमान ४३ अंशाच्या वर आहे. विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी कमाल तापमानाचा पारा पुन्हा ४२ अंशांपार आहे. आज (ता. २१) राज्यात ढगाळ हवामानासह उन्हाचा चटका, उकाडा कायम राहण्याची शक्यता आहे.

शनिवारी (ता. २०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३९.५, नगर ४०.०, धुळे ४२.५, जळगाव ४३.२, कोल्हापूर ३६.६, महाबळेश्वर ३१.६, मालेगाव ४२.०, नाशिक ३९.४, निफाड ३९.२, सांगली ३७.८, सातारा ३९.०, सोलापूर ३८.२, सांताक्रूझ ३४.८, डहाणू ३६.३, रत्नागिरी ३३.८,

छत्रपती संभाजीनगर ४०.९, बीड ४१.४, नांदेड ४१.०, परभणी ४२.२, अकोला ४४.०, अमरावती ४२.८, बुलढाणा ४०.६, ब्रह्मपूरी ४३.१, चंद्रपूर ४३.८, गडचिरोली ४१.८, गोंदिया ४१.१, नागपूर ४१.४, वर्धा ४२.५, वाशीम ४३.६, यवतमाळ ४२.५.

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, बीड लातूर, नांदेड, यवतमाळ, गडचिरोली.

४२ अंशांपेक्षा अधिक कमाल तापमान असलेली ठिकाणे :

अकोला ४४.०, चंद्रपूर ४३.८, वाशीम ४३.६, जळगाव ४३.२, ब्रह्मपूरी ४३.१, अमरावती ४२.८, धुळे ४२.५, वर्धा ४२.५, यवतमाळ ४२.५.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT