Weather  Agrowon
हवामान

Maharashtra Cold Weather: राज्यात थंडी कधीपर्यंत असणार? राज्यातील तापमानाची स्थिती पुढील चार दिवस कशी राहील ?

Maharashtra Weather Forecast: महाराष्ट्रात थंडीचा जोर कायम असून, तापमानात सातत्याने घट होत आहे. पुढील चार दिवस राज्यातील हवामान कसे राहील? तापमानात किती बदल होऊ शकतो? जाणून घ्या सविस्तर अपडेट.

Anil Jadhao 

Pune News: राज्यात दोन दिवस चांगलीच थंडी जाणवली. आज मात्र अनेक भागात तापमानात वाढ दिसून आली. राज्यातील बदललेल्या परिस्थितीविषयी हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे म्हणाले की, बुधवारपासून उत्तर भारतातून उत्तर दिशेने महाराष्ट्राकडे थंडी घेऊन येणारे वारे महाराष्ट्रातील संपूर्ण विदर्भ, मराठवाडा, खानदेश तसेच नाशिक आणि नगर उत्तर जिल्ह्यासहित महाराष्ट्रातील २३ जिल्ह्यात धडकू लागल्यामुळे एकाकी ही थंडीत वाढ झाली. 

श्री. खुळे पुढे म्हणाले की, गेल्या दिड महिन्यापासून म्हणजे २५ जानेवारीपासून ते बुधवारपर्यंत बंगालच्या उपसागरातून पूर्वीय दिशेचे दमट व आर्द्रतायुक्त वाऱ्यांच्या एकसूरी वहनातून उत्तर दिशेने महाराष्ट्रात थंडी घेऊन येणाऱ्या वाऱ्यांना अटकाव होत होता. तो अटकाव वारा वहन प्रणालीतील बदलातून जाणवत आहे. 

संपूर्ण विदर्भ, मराठवाडा, खानदेश तसेच नाशिक आणि नगर उत्तर जिल्ह्यासहित महाराष्ट्रातील २४ जिल्ह्यात बुधवारपासून पहाटे ५ वाजेच्या किमान तापमानात एकाकी घसरण झाली. तर महाराष्ट्रातील काही ठिकाणी म्हणजे नगर, जळगाव, नाशिक ह्या शहर व जिल्हा परिसरात सकाळच्या वेळी थंडीची लाट आणि थंडीच्या लाटेसदृश्य स्थिती जाणवत आहे.

किमान तापमानाचा पारा ह्या ठिकाणी १० अंशापर्यंत घसरू लागला आहे. ही परिस्थिती बुधवारपासून शनिवारपर्यंत असे चार दिवस राहण्याची शक्यता जाणवते. मुंबईसह संपूर्ण कोकण तसेच पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर अशा जिल्ह्यांत मात्र ही स्थिती नाही. तेथे पहाटेचे किमान तापमान हे सरासरी इतके किंवा काही ठिकाणी सरासरीपेक्षा काहीसे अधिक तर काही ठिकाणी किंचितसे कमी आहे, असेही खुळे यांनी स्पष्ट केले. 

पहाटेच्या किमान तापमानाचे ठिक असले तरी संपूर्ण विदर्भ, नगर, जळगाव, जेऊर वगळता उर्वरित महाराष्ट्रातील २३ जिल्ह्यांत दिवसाचे तापमान म्हणजे दुपारी ३ वाजेच्या कमाल तापमानात सरासरीपेक्षा २ ते ३ अंशाने वाढ झालेली जाणवत आहे. मुंबईसह कोकणात तर ही वाढ ४ ते ५ अंशापर्यंत झेपावली आहे. त्यामुळे तेथे दिवसाची उष्णतेची ताप चांगलीच जाणवत आहे, असे त्यांनी सांगितले.

मुंबईसह संपूर्ण कोकणात उष्ण व दमट वातावरणातून जाणवत आलेला रात्रीचा उकाडा बुधवारपासून शनिवारपर्यंततच राहण्याची शक्यता जाणवते. तर रविवार आणि सोमवारही उष्णतेच्या लाटेची शक्यताही नाकारता येत नाही, असेही खुळे यांनी सांगितले. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ativrushti Anudan : शेतकऱ्याने तहसीलदाराच्या गाडीच्या फोडल्या काचा; अतिवृष्टीचं अनुदान न मिळाल्याने शेतकरी संतप्त

Electric Tractors in Agriculture: शेतीत आता आवाज, धूर निघणार नाही, खर्चही कमी, इलेक्ट्रिक ट्रॅक्टरचे काय आहेत फायदे?

Unseasonal Rain : रायगडला अवकाळी पावसाचा तडाखा

Bamboo Cultivation : बांबू लागवडीतून रोजगाराची हमी

Crop Management: अवकाळी पावसानं भातशेती संकटात; 'या' उपाययोजना केल्यानं उत्पादनातील घट टाळता येईल

SCROLL FOR NEXT