Winter Season Agrowon
हवामान

Maharashtra Cold Wave : आज रात्री चक्रीवादळाची निर्मिती होणार ? उत्तर भारत आणि राज्यातील बहुतांशी ठिकाणी थंडीचा कडका कायम

Maharashtra Winter Weather : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या वादळी प्रणालीचे रुपांतर चक्रीवादळात होण्याची शक्यता आहे. तर उत्तर भारत आणि महाराष्ट्रात थंडीचा कडाका कायम आहे.

Anil Jadhao 

Pune News : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या वादळी प्रणालीचे रुपांतर चक्रीवादळात होण्याची शक्यता आहे. तर उत्तर भारत आणि महाराष्ट्रात थंडीचा कडाका कायम आहे. मध्य प्रदेशातील मांडला येथे आज ६.५ अंश सेल्सिअसची नोंद झाली. तर धुळे आणि निफाड येथे ८ अंश तापमान होते.

आग्नेय बंगालच्या उपसागरात वादळी प्रणाली तयारी झाली आहे. ही वादळी प्रणाली उत्तर वायव्य दिशेने प्रवास करत आहे. ही वादळी प्रणाली त्रिंकोमलाईपासून दक्षिण ईशान्येला १०० किलोमीटर, नागापट्टीनमपासून आग्नेयला ३१० किलोमीटर, पुद्दीच्चेरीपासून आग्नेयला ४१० किलोमीटर आणि चेन्नईपासून दक्षिण आग्नेयला ४८० किलोमीटर अंतरावर होती. 

पुढच्या १२ तासांमध्ये ही वादळी प्रणाली श्रीलंकच्या किनाऱ्याकडे उत्तर वायव्य भागाकडे चाल करण्याची शक्यता आहे. त्यानंतर ही प्रणाली ३० नोव्हेंबरच्या दरम्यान ही प्रणाली उत्तर वायव्य दिशेने वाटचाल करेल आणि उत्तर तमिळनाडू आणि पुद्दुचेरी किनाऱ्यावर कराईकल आणि महाबलीपुरम दरम्यान जमिनिवर येण्याची शक्यता आहे. यावेळी ५० ते ६० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज अंदाज आहे. 

तसेच आज रात्री किंवा उद्या सकाळपर्यंत या वादळी प्रणालीची तीव्रता वाढून त्याचे रुपांतर चक्रीवादळात होण्याची शक्यताही आहे. यावेळी ६५ ते ७५ किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याचीही शक्यता आहे. 

तर उत्तर भारतात आणि महाराष्ट्रात थंडीचा कडाका कायम आहे. किमान आणि कमाल तापमानातील घटही कायम आहे. आज मध्य प्रदेशातील मांडला येथे देशातील सर्वात कमी ६.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. बिहार आणि उत्तर प्रदेशच्या अनेक भागात धुक्याचे प्रमाण वाढले आहे. 

तर राज्यातही थंडीचा कडाका वाढला. आजही धुळे येथील कृषी महाविद्यात आणि निफाड येथील गहू संशोधन केंद्रात ८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. जेऊर येथेही किमान तापमान ८ अंश सेल्सिअस होते. तर नगर येथे ९.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. राज्यातील तापमानातील घट कायम राहू शकते, असा अंदाज हवामान विभागाने दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agricultural Damage: पंजाबमध्ये १.८४ लाख हेक्टरवर पिकांचे नुकसान

Electricity Subsidy: उपसा योजनांना वीजबिलात आणखी दोन वर्षे सवलत

Maharashtra Rain: राज्यात पावसाची उघडीप शक्य

Paddy Crop Damage : मुसळधार पावसामुळे भातपीक कुजण्याचा धोका

Zero Tillage: मातीची सुपीकता वाढवणारी शून्य मशागत खर्चाची बचत कशी करते

SCROLL FOR NEXT