Dana Cyclone Agrowon
हवामान

Dana Cyclone : `दाना`चक्रीवादळ कुठे धडकणार ? राज्यातील काही भागात आज आणि उद्या पावसाचा अंदाज

Weather Update : बंगालच्या उपसागरात दाना चक्रीवादळाची निर्मिती झाली. हे चक्रीवादळ ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या दरम्यान उद्या मध्य रात्रीनंतर जमिनीवर येण्याची शक्यता आहे.

Anil Jadhao 

Pune News : बंगालच्या उपसागरात दाना चक्रीवादळाची निर्मिती झाली. हे चक्रीवादळ ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या दरम्यान उद्या मध्य रात्रीनंतर जमिनीवर येण्याची शक्यता आहे. राज्याला या चक्रीवादळाचा फटका बसणार नाही. तर राज्यात आज आणि उद्या काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.

पूर्वमध्य बंगालच्या उपसागरात काल निर्माण झालेल्या तीव्र दाब क्षेत्राचे रुपांतर दाना चक्रीवादळात झाले आहे. दाना चक्रीवादळ ईशान्य दिशेने १५ किलोमीटर प्रतितास वेगाने प्रवास करत आहे. हे चक्रीवादळ ओडिशातील पारादिपपासून आग्नेय दिशेला ५२० किलोमीटर, पश्चिम बंगालमधील दक्षिण आग्नेयला ६०० किलोमीटर आणि बांगलदेशमधील खेपूपुरा येथून दक्षिण आग्नेयला ६१० किलोमीटर अंतरावर होते.

दाना चक्रीवादळाचा प्रवास ईशान्य दिशेने होत आहे. तर या चक्रीवादळाचे रुपांतर उद्या सकाळी तीव्र चक्रीवादळात होणार आहे. हे चक्रीवादळ उत्तर ओडिशा आणि पश्चिम बंगालची किनारपट्टी पुरी आणि सागर बेटाच्या दरम्यान ओडिशातील भितारकणिका आणि धमारा येथे उद्या रात्री आणि शुक्रवारी सकाळी पार करण्याची शक्यता आहे. यावेळी १०० ते ११० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे.

तर राज्यातील काही भागात आज आणि उद्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. हवामान विभागाने आज राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला. कोकणातील पालघर आणि मुंबई वगळता सर्व जिल्हे, नंदूरबार आणि धुळे वगळता मध्य महाराष्ट्रातील सर्व जिल्हे, मराठवाड्यातील सर्व जिल्हे आणि विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा आण वाशीम जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा येलो अलर्ट दिला.

उद्या कोकणातील सिंधुदूर्ग आणि रत्नागिरी तर मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूरस, सातारा आणि सांगली जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला. तर रायगड, ठाणे, पुणे, नाशिक, नगर, धाराशिव, बीड, नांदेड आणि लातूर जिल्ह्यातही काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Local Body Elections: सोलापुरात ‘आयात’ नेत्यांच्या जोरावर भाजपची मोर्चेबांधणी

E Crop Survey: रब्बी हंगामातील ४ लाख ५ हजार हेक्टर क्षेत्राची ई-पीक पाहणी बाकी

Maharashtra Elections 2026 Exit Poll: 'भाजप'चेच वर्चस्व; मुंबई ठाकरेंच्या हातून निसटणार, एक्झिट पोलचे आकडे काय सांगतात?

Cotton Rate: कापसाच्या भावात चढ उतार कशामुळे सुरू आहेत?

Livestock Health: बळीराजाचे पशुधन संसर्गजन्य रोगामुळे संकटात

SCROLL FOR NEXT