Rain Update Agrowon
हवामान

Maharashtra Rain : पावसाला पोषक हवामान

Rain Forecast : राज्यात मुख्यतः उघडिपीसह हलक्या सरींची अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

अमोल कुटे

Pune News : बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्र जमिनीवर आले आहे. यातच राज्यातही पावसाला पोषक हवामान होत आहे. आज (ता. १९) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात मुख्यतः उघडिपीसह हलक्या सरींची अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

आग्नेय मध्य प्रदेश आणि नैॡत्य उत्तर प्रदेशात ठळक कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. गुरुवारी (ता. १९) या प्रणालीची तीव्रता आणखी ओसरणार आहे. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा फिरोजपूर, नर्नुल, ठळक कमी दाबाचे केंद्र, पेंद्रा रोड, पुरी ते पूर्व - मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय होते. हरियाना आणि उत्तर पंजाबमध्ये चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे.

पावसाच्या उघडिपीने राज्याच्या कमाल तापमानात वाढ झाली आहे. बुधवारी (ता. १८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अकोला येथे राज्यातील उच्चांकी ३४.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अनेक ठिकाणी तापमान ३२ अंशांच्या पुढे गेले आहे. उन्हाचा चटका वाढला असून उकाड्याने घामटा निघत आहे.

राज्यात पावसाने उघडीप दिली असतानाच, राज्यात पावसाला पोषक हवामान होत आहे. आज (ता. १९) कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे, तर विदर्भासह उर्वरित राज्यात पावसाची उघडीप राहण्याची शक्यता आहे. उद्यापासून (ता. २०) राज्यात पाऊस वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

गुरुवारी (ता. १९) राज्यातील पावसाचा अंदाज दर्शविणारा नकाशा. (स्रोत : हवामान विभाग) :

विजांसह पावसाची शक्यता :

मुंबई, ठाणे, रायगड, नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, सातारा, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election Result 2024 : छत्रपती संभाजीनगर, बीड, जालन्यात महायुतीच सरस

Solapur Assembly Election Result : सोलापूर जिल्ह्यात भाजपची सरशी

Maharashtra Vidhansabha Election Result : परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात महायुतीला घवघवीत यश

BJP Dominance : महाराष्ट्रावरील भाजपची मांड पक्की

Vidhansabha Election Result 2024 : लातूर,धाराशिवकरांची महायुतीला पसंती

SCROLL FOR NEXT