Crop Damage Agrowon
हवामान

Unseasonal Rain: पुणे, जुन्नर आणि आंबेगावात अवकाळी पाऊस; पिकांचे नुकसान!

Crop Damage: पुणे शहरासह जुन्नर व आंबेगाव तालुक्यांत अवकाळी पाऊस आणि गारपटीमुळे शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. गहू, हरभरा, कांदा, भाजीपाला आणि फळबागांना मोठा फटका बसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे.

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

Pune News: पुणे शहरात आणि जुन्नर तालुक्याच्या काही भागात जोरदार वाऱ्यासह गारपीट झाली आहे. अनेक ठिकाणी झाडे पडली असून पिकांचे नुकसान झाले आहे. मागील काही दिवसांपासून उन्हाच्या झळा तीव्र झाल्या आहेत. तुरळक पावसाने थोडा दिलासा मिळाला आहे. आकाश ढगाळ झाले होते. सायंकाळच्या सुमारास काही भागात तुरळक तर काही ठिकाणी मध्यम प्रकारचा पाऊस झाला आहे.

या पावसाचा फटका भाजीपाला पिकांना बसणार आहे. चार-पाच दिवस असेच वातावरण राहिल्यास पिकांवर रोगराई पडून पिकांचे नुकसान होण्याची शक्यता असल्याने चिंतेचे वातावरण आहे. काही ठिकाणी बटाटे काढण्याचे काम सुरू आहे. तर कांदा चाळीतून कांदा पिशव्यात भरण्याचे काम सुरू असल्यामुळे या तुरळक पावसामुळे शेतकऱ्यांची धांदल उडाली आहे.

हवेली तालुक्यातील शिवाजीनगर व उपनगर भागात दुपारी पाच वाजेच्या दरम्यान जोरदार पाऊस झाला. नवी सांगवी, औंध, निगडी, पिंपरी, चिंचवड, बिबवेवाडी, उंड्री, कोथरूड, वारजे या भागातही हलका ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसल्या.

तर जुन्नर तालुक्यातील आळेफाटा, वडगाव आनंद, पिंपरी पेंढार परिसरात जोरदार वारे व पाऊस आणि गारपीट झाली. त्यामुळे काही ठिकाणी झाडे पडल्याच्या घटना घडल्या. काढणीच्या अवस्थेत असलेल्या गहू, हरभरा, ज्वारी, कांदा, फळबागांचे नुकसान झाले.

पावसामुळे हवेत काही प्रमाणात गारवा तयार झाला होता. आंबेगाव तालुक्यातील साकोरे, चास, महाळुंगे पडवळ, कळंब, लौकी, चांडोली बुद्रूक आदी १० गावांत गुरुवारी दुपारी अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. चास येथे जोरदार पावसाने हजेरी लावल्याने रस्त्यावर पाणी साचले होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fake Agriculture Input: बनावट निविष्ठांचे जाळे राज्यांच्या सीमापार

Jantar Mantar Protest: जंतरमंतरवरील आंदोलन आणि सप्तपर्णीची अ‍ॅलर्जी

Fake Pesticide Issue: बनावट कीडनाशके : हवी सक्षम यंत्रणा

Tissue Culture Lab Scheme: उती संवर्धन प्रयोगशाळेसाठी अर्जाची संधी

Agriculture Services Reform: कृषी विभागाच्या अकरा सेवांचे डिजिटल सुसूत्रीकरण

SCROLL FOR NEXT