Crop Damage Agrowon
हवामान

Pre Monsoon Rain: वादळी पावसाचा दणका; राज्यात ५ दिवस पावसाचा अंदाज

Crop Damage News: राज्यात काही ठिकाणी वादळी पावसाने चांगलाच दणका दिला. वादळी पावसाचा भाजीपाला पीके, आंबा, कांदा, डाळींब बागा तसेच हळद पिकाला दणका बसला.

Anil Jadhao 

Pune News: राज्यात काही ठिकाणी वादळी पावसाने चांगलाच दणका दिला. वादळी पावसाचा भाजीपाला पीके, आंबा, कांदा, डाळींब बागा तसेच हळद पिकाला दणका बसला. राज्यातील काही ठिकाणी पावसाला पोषक हवामान आहे. त्यामुळे पुढील ५ दिवस राज्यातील काही भागात वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.

राज्यात कालपासून काही ठिकाणी वादळी पावसाने दणका दिला. आज सकाळपासून विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात वादळी पाऊस झाला. पावसामुळे नुकसानही झाले. मराठवाडा आणि विदर्भात आंबा पिकाला फटका बसला. मध्य महाराष्ट्र आणि खानदेशात केळी बागांना वादळी पावसाने दणका दिला. तसेच कांदा, आंबा, डाळींब पिकांचे मोठे नुकसान आहे. यासह भाजीपाला लागवडी खराब झाल्या आहेत. अनेक ठिकाणी आता तोंडाशी आलेला घास या आसमानी संकटाने हिसकावून घेतला आहे. शेतात वाळवत घातलेली हळद, काढणी सुरु असलेल्या उन्हाळी भुईमुगाला पावसाचा तडाखा बसला.

राज्यात उद्यापासून पुढील ५ दिवस वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. विदर्भातील अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, गडचिरोली, भाडारा, गोंदीया आणि चंद्रपूर जिल्ह्यात वादळी पावसाला पोषक हवामान आहे. विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज देण्यात आला.

मराठवाड्यातील धाराशिव, बीड, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही काही ठिकाणी वादळी पाऊस झाला. तसेच या जिल्ह्यांमध्ये पुढील ५ दिवस वादळी पावसासाठी पोषक हवामान आहे. काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज आहे. तसेच ढगाळ हवामानामुळे तापमानातही घट होईल, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली.

मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यातही काही भागात पावसाने हजेरी लावली. या जिल्ह्यांमध्ये हळद, आंबा, भाजीपाला पीके, डाळींब आणि कांदा पिकाचे नुकसान झाल्याचे शेतकरी सांगत आहेत. पुढील ५ दिवसही या जिल्ह्यांमध्ये वादळी पावसासाठी पोषक हवामान आहे.

मध्य महाराष्ट्र आणि खानदेशात विजा आणि ढगांच्या गडगडासह काही ठिकाणी पाऊस पडेल, तसेच यावेळी ४० ते ६० किलोमीटर प्रतितास वेगाने वारेही वाहतील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला. खानेदशातील जळगाव, धुळे आणि नंदूरबार तसेच कोकणातही काही ठिकाणी पाऊस पडला. या जिल्ह्यांमध्येही पुढील ५ दिवस काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT