Cold Weather Agrowon
हवामान

Maharashtra Cold : तापमानात चढ उतार राहणार; उत्तर भारतातील किमान तापमानात वाढ

Weather Update : राज्यातही अनेक भागात किमान तापमानात वाढ झाली. तरीही बहुतांशी भागात सकाळी वातावरणातील गारठा कायम आहे.

Anil Jadhao 

Pune News : उत्तर भारतात थंडीचा कडाका काहीसा कमी झाला. किमान तापमानात काहीशी वाढ दिसून येत आहे. तर राज्यातही अनेक भागात किमान तापमानात वाढ झाली. तरीही बहुतांशी भागात सकाळी वातावरणातील गारठा कायम आहे. 

उत्तर भारतातील बहुतांशी भागात किमान तापमान सरासरीपेक्षा २ अंश सेल्सिअस ते ३ अंश सेल्सिअसने जास्त आहे. पंजाब, दिल्ली, पश्चिम राजस्थान, उत्तर प्रदेश आणि बिहारच्या बहुतांशी भागात ही वाढ दिसून आली.

तर पंजाब, हरियाना, चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या बहुतांशी भागात किमान तापमानाची नोंद ७ अंश सेल्सिअस ते १० अंश सेल्सिअसच्या दरम्यान झाली.

तर बिहार, झारखंड, छत्तीसगड, विदर्भ आणि ओडिशाच्या बहुतांशी भागांमध्ये किमान तापमान ११ अंश सेल्सिअस ते १२ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. अनेक भागात दाड धुकेही पडले होते. 

राज्यात मागील दोन दिवसांमध्ये थंडीचा कडाका काहीसा कमी झाला आहे. उत्तर भारतात किमान तापमानात वाढ झाल्याचा परिणाम राज्यातील वातावरणातही दिसून येत आहे. राज्यात पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला. तर राज्यातील तापमानात चढ उतार दिसू शकतात, असाही अंदाज दिला आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Raju Shetti: कोकणातील बागायतदारांची क्रूर थट्टा, राजू शेट्टींची मुख्यमंत्र्यांच्या मदतीच्या घोषणेवर टीका

Nashik ZP Budge: ‘झेडपी’च्या अर्थसंकल्पात कृषी, पशुसंवर्धनासाठी ७.१८ कोटी

Shade Net House: उन्हाळ्यामध्ये शेडनेट हाउसमधील व्यवस्थापन

Burhanpur Ankleshwar Highway: बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्ग चौपदरीकरणाच्या प्रक्रियेस गतीच नाही

Agrowon Podcast: कापसात काहिशी सुधारणा, कांदा भाव दबावातच, काकडीचा भाव टिकून, गव्हाची आवक वाढली, कैरीला उठाव

SCROLL FOR NEXT