Weather Forecast Agrowon
हवामान

Maharashtra Rain Alert: राज्यात आज आणि उद्या पावसाची शक्यता  दोन दिवस राज्यातील बहुतांशी भागात पावसाची अंदाज

Rain Update : हवामान विभागाने आज आणि उद्या राज्यातील अनेक भागात पावसाचा अंदाज दिला. तर गुरुवारपासून पावसाची उघडीप राहील, अशी शक्यता व्यक्त केली.

Anil Jadhao 

Pune News : राज्यातील काही भागात मध्यम ते जोरदार पाऊस हजेरी लावत आहे. तर अनेक ठिकाणी दुपारी उन्हाचा चटकाही जाणवत आहे. हवामान विभागाने आज आणि उद्या राज्यातील अनेक भागात पावसाचा अंदाज दिला. तर गुरुवारपासून पावसाची उघडीप राहील, अशी शक्यता व्यक्त केली. 

हवामान विभागाने आज राज्यातील अनेक भागात पावसाचा दिला होता. विदर्भातील भंडारा आणि गोंदीया जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला. तर नागपूर जिल्ह्याला काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला.

विदर्भातील इतर जिल्ह्यांना काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. तर खानदेशसह नाशिक, पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात तसेच कोकणातील रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. 

उद्या म्हणजेच बुधवारी विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट कायम ठेवण्यात आला. तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. तर खानदेशील तिन्ही जिल्हे, नाशिक, पुणे, सातारा आणि कोल्हापूर तसेच कोकणातील सिंधुदूर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला. 

गुरुवारी मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज देण्यात आला. तर राज्यातील इतर भागात पावसाची उघडीप राहील, असा अंदाज हवामान विभागाने दिला. शुक्रवारी आणि शनिवारीही राज्यात पावसाची उघडीप राहू शकते. मात्र स्थानिक वातावरणामुळे काही ठिकाणी पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT