Monsoon Update Agrowon
हवामान

Monsoon Update : महाराष्ट्रात यंदा लवकर ‘आनंद सरी’

Rain Update : नैॡत्य मोसमी वारे (मॉन्सून) ४ जूनपर्यंत तळ कोकणात धडकण्याची शक्यता असून, महाराष्ट्राच्या अंतर्गत भागातही वेगाने प्रगती होण्याचे संकेत आहेत.

अमोल कुटे

Pune News : जमीन भाजून काढणारी तप्त सूर्य किरणे, उष्ण झळा, तीव्र लाटांमुळे होणारी होरपळ, असह्य उकाड्यामुळे वाहणाऱ्या घामाच्या धारा यामुळे हैराण झालेल्या महाराष्ट्रात यंदा वेळेआधीच ‘आनंद सरीं’ची बरसात होणार आहे. नैॡत्य मोसमी वारे (मॉन्सून) ४ जूनपर्यंत तळ कोकणात धडकण्याची शक्यता असून, महाराष्ट्राच्या अंतर्गत भागातही वेगाने प्रगती होण्याचे संकेत आहेत.

सध्या तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. यातच सूर्य कोपल्याने कमाल तापमान ४७ अंशांपार गेले. अशातच यंदा देशामध्ये १०६ टक्के पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या. तर केरळमध्ये वेळेआधीच दिमाखात आगमन झाल्याने महाराष्ट्र देखील मॉन्सूनची चातकाप्रमाणे वाट पाहत आहे.

दरम्यान, ‘रेमल’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे बंगालच्या उपसागरावरील मॉन्सूनची शाखा अधिक सक्रिय झाली आहे. मॉन्सूनने यंदा ११ दिवस आधीच पूर्वोत्तर राज्यांसह सिक्कीम आणि पश्चिम बंगालपर्यंत मजल मारली आहे.

या भागात साधारणतः १० जूनपर्यंत मॉन्सून पोचतो. शुक्रवारी (ता. ३१) आसाम, मेघालय, त्रिपुरासह संपूर्ण पूर्वोत्तर राज्ये आणि पश्चिम बंगालचा हिमालयाकडील भाग आणि सिक्कीम राज्यात मॉन्सूनने प्रगती केली.

मॉन्सूनच्या अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील दोन्ही शाखा रविवारपासून (२ जून) अधिक बळकट होणार आहेत. त्यामुळे मॉन्सूनची वेगाने वाटचाल होण्याचे संकेत हवामान प्रारूपांमधून (मॉडेल्स) मिळत आहेत.

यातच गोव्यासह राज्याच्या दक्षिणेकडील भागात पावसाचे प्रमाण वाढणार असल्याने मॉन्सूनचे आगमन देखील लवकर होण्याची अंदाज आहे. गोव्यामध्ये ३ जून रोजी, तळकोकणात ४ जून रोजी तर पुण्यात ६ जून रोजी मॉन्सून दाखल होण्याचा शक्यता असल्याचे हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: शेवगा तेजीतच, सोयाबीन दर कमीच, बीटला उठाव, वांगी दर टिकून तर सीताफळ आवक स्थिर

Rabi Sowing : रब्बी पेरणी रखडत दीपोत्सवानंतर वेग शक्य

Crop Damage Compensation : अतिवृष्टिग्रस्तांना एकरी ५० हजारांची मदत द्या

Maharashtra Rain Update : राज्यात 'ऑक्टोबर हिट' वाढली; ढगाळ हवामानसह पावसाचा अंदाज

Ativrushti Madat: सप्टेंबरमधील नुकसानीसाठीची मदत म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा; विरोधकांची टीका

SCROLL FOR NEXT