Rain Forecast Agrowon
हवामान

Weekly Weather : राज्यात पावसात उघडीप राहण्याची शक्यता

Agriculture Weather : ८ ते १० सप्टेंबर पर्यंतचा कालावधी लागेल. त्यावेळी राज्याच्या दुष्काळी भागात जोराचा पाऊस होण्याची शक्यता राहील.

 डॉ. रामचंद्र साबळे 

Agriculture Rain Update : या आठवड्यात महाराष्ट्रावर १००४ ते १००६ हेप्टापास्कल इतके अधिक हवेचे दाब राहतील. त्यामुळे पावसात काही काळ उघडीप राहण्याची शक्यता आहे. जेथे हवेचे दाब कमी होतील त्या ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता निर्माण होईल. आकाश अंशतः ढगाळ राहील. पावसातील उघडीप व सूर्यप्रकाशामुळे उभ्या पिकांना वाढीच्या काळात हवामान अनुकूल राहील.

बंगालच्या उपसागराच्या उत्तर भागावर हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन ते बराच काळ कायम राहील. त्यामुळे महाराष्ट्राच्या पूर्व भागात विदर्भ, मराठवाडा, सोलापूर, लातूरसह सातारा, सांगली, पुणे आणि नगर जिल्ह्यांत पावसाची शक्यता निर्माण होईल. तर पुन्हा काही काळ उघडीप अशी स्थिती राहील.

आंध्रप्रदेश, तेलंगणावर मोठ्या प्रमाणात ढगांचा समूह जमा होत असून वारे प्रथम उत्तरेस व नंतर पश्चिम दिशेने वाहत आहेत. त्यामुळे अधूनमधून राज्याच्या पूर्वेकडील काही भागात पावसाची शक्यता निर्माण होईल.

परतीचा मॉन्सून सुरु होण्यास काहीसा वेळ आहे. राजस्थानमध्ये अद्यापपर्यंत अधूनमधून पाऊस सुरु आहे. राजस्थानमध्ये ज्यावेळी हवेचे दाब वाढतील तेव्हा तेथे पाऊस थांबेल व वारे आग्नेयेकडून ईशान्येकडे व तेथून दक्षिण दिशेने वाहतील. तेव्हाच परतीचा मॉन्सून सुरु होईल. त्यास साधारण ८ ते १० सप्टेंबर पर्यंतचा कालावधी लागेल. त्यावेळी राज्याच्या दुष्काळी भागात जोराचा पाऊस होण्याची शक्यता राहील.

कोकण

आज आणि उद्या (ता.१, २ सप्टेंबर) सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यांमध्ये ६ ते ९ मिमी, तर ठाणे व पालघर जिल्ह्यांत ६ ते १६ मिमी पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत वायव्येकडून, तर रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत नैऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ९ किमी राहील. कमाल तापमान सिंधुदुर्ग जिल्ह्यात २७ अंश सेल्सिअस, तर रत्नागिरी, रायगड व ठाणे जिल्ह्यांत २८ अंश सेल्सिअस व पालघर जिल्ह्यात २९ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९१ ते ९३ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ८० टक्के राहील.

उत्तर महाराष्ट्र

आज आणि उद्या (ता.१, २ सप्टेंबर) नाशिक जिल्ह्यात ४ ते १२ मिमी, धुळे जिल्ह्यात ५ ते १२ मिमी, नंदूरबार जिल्ह्यात ४ ते १५ मिमी व जळगाव जिल्ह्यात ६ ते २० मिमी पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा वायव्येकडून, तर वाऱ्याचा ताशी वेग १४ ते १९ किमी राहील. कमाल तापमान नाशिक जिल्ह्यात २८ अंश सेल्सिअस, धुळे व नंदूरबार जिल्ह्यांत ३० अंश सेल्सिअस, तर जळगाव जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९० ते ९३ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ७० टक्के राहील.

मराठवाडा

आज आणि उद्या (ता.१, २ सप्टेंबर) धाराशिव जिल्ह्यात १६ ते १७ मिमी, लातूर जिल्ह्यात १८ ते २५ मिमी, नांदेड जिल्ह्यात २५ ते २७ मिमी, बीड जिल्ह्यात ११ ते १६ मिमी, परभणी जिल्ह्यात १२ ते २० मिमी, हिंगोली जिल्ह्यात १९ ते २७ मिमी, जालना जिल्ह्यात १० ते २५ मिमी व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ५ ते १७ मिमी पावसाची शक्यता आहे. सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा वायव्यकेकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग २१ ते २३ किमी राहील. कमाल तापमान धाराशिव व लातूर जिल्ह्यांत २५ अंश सेल्सिअस, नांदेड व हिंगोली जिल्ह्यांत २६ अंश सेल्सिअस राहील. कमाल तापमान बीड व परभणी जिल्ह्यांत २७ अंश सेल्सिअस व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २९ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८५ ते ९१ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६५ ते ८० टक्के राहील.

पश्चिम विदर्भ

आज आणि उद्या (ता.१, २ सप्टेंबर) बुलडाणा जिल्ह्यात ७ ते १० मिमी, अकोला जिल्ह्यात १६ ते २६ मिमी, वाशीम जिल्ह्यात ११ मिमी व अमरावती जिल्ह्यात २३ ते २५ मिमी पावसाची शक्यता आहे. सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा वायव्येकडून, तर वाऱ्याचा ताशी वेग २० ते २५ किमी राहील. कमाल तापमान वाशीम व अमरावती जिल्ह्यांत २७ अंश सेल्सिअस, तर बुलडाणा व अकोला जिल्ह्यांत २८ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २४ अंश सेल्सिअस राहील.

आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९० ते ९१ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता बुलडाणा व अकोला जिल्ह्यात ७५ ते ७८ टक्के, तर वाशीम व अमरावती जिल्ह्यांत ८२ टक्के राहील.

मध्य विदर्भ

आज आणि उद्या (ता.१, २ सप्टेंबर) यवतमाळ जिल्ह्यात २१ मिमी, वर्धा जिल्ह्यात १३ ते १४ मिमी व नागपूर जिल्ह्यात २० ते ३० मिमी पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग नागपूर जिल्ह्यात ताशी १५ किमी, वर्धा व यवतमाळ जिल्ह्यांत ताशी २१ ते २४ किमी राहील. कमाल तापमान यवतमाळ, वर्धा व नागपूर जिल्ह्यांत २९ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सर्वच जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ८८ ते ९१ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ७७ ते ८४ टक्के राहील.

पूर्व विदर्भ

आज आणि उद्या (ता.१, २ सप्टेंबर) चंद्रपूर जिल्ह्यात २२ ते २९ मिमी, गडचिरोली जिल्ह्यात २६ ते ३२ मिमी, भंडारा जिल्ह्यात २२ ते ३८ मिमी व गोंदिया जिल्ह्यात ३० ते ४० मिमी पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ८ ते १९ किमी राहील. कमाल तापमान गडचिरोली जिल्ह्यात २९ अंश सेल्सिअस, तर चंद्रपूर, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ३० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९२ ते ९८ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ७७ ते ८४ टक्के राहील.

पश्चिम महाराष्ट्र

आज आणि उद्या (ता.१, २ सप्टेंबर) कोल्हापूर जिल्ह्यात २ ते ५ मिमी, सांगली जिल्ह्यात ७ ते ८ मिमी, सातारा जिल्ह्यात २ ते ६ मिमी, सोलापूर जिल्ह्यात ७ ते १० मिमी, पुणे जिल्ह्यात ३ ते १७ मिमी व नगर जिल्ह्यात २ ते १२ मिमी पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यात वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून, तर सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यांत वायव्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग सर्वच जिल्ह्यांत १५ ते २३ किमी राहील. सांगली व सोलापूर जिल्ह्यांत वारे ताशी २२ ते २३ किमी इतक्या वेगाने वाहतील. कमाल तापमान कोल्हापूर जिल्ह्यात २५ अंश सेल्सिअस, सातारा जिल्ह्यात २६ अंश सेल्सिअस, पुणे जिल्ह्यात २७ अंश सेल्सिअस व सांगली व सोलापूर जिल्ह्यांत २८ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांत २१ अंश सेल्सिअस, पुणे

जिल्ह्यात २२ अंश व सांगली, सोलापूर व नगर जिल्ह्यांत २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८० ते ९० टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ७० ते ८० टक्के राहील.

कृषी सल्ला

खरीप पिकांमध्ये पावसाच्या साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था करावी.

भात लागवडीमध्ये पाण्याची पातळी ५ सेंमी पर्यंत नियंत्रित करावी. बांध तणमुक्त ठेवावेत.

कीड-रोगांच्या प्रभावी नियंत्रणासाठी तयार केलेल्या रासायनिक फवारणी द्रावणात स्टिकरचा वापर करावा.

(ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ, सदस्य, ॲग्रिकल्चर मेटरॉलॉजी फोरम फॉर साउथ आशिया)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT