Temperature Update Agrowon
हवामान

Temperature Update : जळगावचे तापमान पोचले ४२ अंश सेल्सिअसवर

एप्रिल महिन्यातच तापमान वाढल्याने शेतीकांना फटका बसत आहे. मजूरटंचाई तयार होवू लागली आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात ऊन तापू लागले आहे. जळगावचे तापमान बुधवारी (ता. १२) ४२ अंश सेल्सिअसवर पोचले. एप्रिल महिन्यातच तापमान वाढल्याने शेतीकांना फटका बसत आहे. मजूरटंचाई तयार होवू लागली आहे.

उष्णतेपासून बचावासाठी मोठ्या आकाराचे लांबलच बागायतदार खादीचे रूमाल, टोप्यांचा उपयोग शेतकरी करू लागले आहेत.

सकाळीच शेतीकामे सुरू होत आहे. सकाळी साडेसात ते दुपारी दोन अशी कामाची नवी वेळ निश्चित झाली आहे. त्यात दुपारी अर्धा तास विश्रांतीदेखील असते. परंतु ऊन तापत असल्याने ५० ते ५५वर्षे वयापेक्षा अधिक वयाचे मजूर शेतीकामे टाळत आहेत.

तसेच मजूरटंचाई तयार झाली आहे. कारण बाजरी, ज्वारी व मका कापणी, मळणीची कामे एकाच वेळी सुरू झाली आहेत. कांदा काढणी व इतर कामांनाही वेग आला आहे. खानदेशात मध्य प्रदेश व सातपुड्यातील मजूरवर्ग दाखल झाला आहे.

या मंडळीमुळे मजूरटंचाई कमी दिसत आहे. कारण स्थानिक मजूर उष्णतेत कामे टाळत आहेत. मजुरीचे दरही वाढले आहेत. ज्वारी, मका कापणी, कणसे खुडणे व कणसे गोळा करण्यासाठी प्रतिएकर साडेचार हजार रुपये मजुरी घेतली जात आहे.

मका कापणीसाठी प्रतिएकर तीन हजार रुपये मजुरी आहे. ममुराबाद (ता.जळगाव) येतील महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत कार्यरत हवामान केंद्रावर बुधवारी ४१.६ अंश तापमानाची नोंद झाली. किमान तापमान २६.८ अंश होते, तर एका खासगी संस्थेच्या हवामान केंद्रात जळगावचे तापमान ४२ अंश नोंदविण्यात आले आहे.

तालुकानिहाय तापमान असे

जळगाव - ४२ अंश

भुसावळ - ४२

अमळनेर - ४१

बोदवड - ४१

भडगाव - ४२

चोपडा - ४१

चाळीसगाव - ४१

धरणगाव - ४१

एरंडोल - ४२

फैजपूर - ४२

जामनेर- ४१

मुक्ताईनगर - ४१

पारोळा - ४२

पाचोरा - ४२

रावेर - ४१

वरणगाव- ४२

यावल - ४१

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Biochar Production: कर्ब संवर्धनासाठी पीक अवशेषांपासून बायोचार निर्मिती

Turmeric Farming: हळद, आले पिकांतील अन्नद्रव्ये व्यवस्थापन 

Armyworm in Maize: मक्यातील लष्करी अळीचा करा नायनाट; कीड व्यवस्थापनाची संपूर्ण माहिती

Great Indian Bustard: माळढोक अभयारण्याच्या राखीव क्षेत्रात सोडले घातक रसायन 

Lumpy Disease: मोहोळमध्ये ‘लम्पी स्कीन’ने दोन जनावरांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT