Summer Heat Agrowon
हवामान

Monsoon Return: राज्यात उन्हाचा चटका वाढला; मॉन्सून परतीसाठी पोषक स्थिती

Monsoon Rain : हवामान शास्त्र विभागाने पुढील पाच दिवस राज्यात कोरड्या हवामानाचा अंदाज दिला आहे. राज्यात पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांची शेतीकामे सुरू आहेत.

Dhananjay Sanap

Rain Alert : राज्याच्या सर्वच जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. तापमानाच्या चटक्यात वाढ झाली आहे. त्यामुळे दुपारी उकाडा जाणवतोय. हवामान शास्त्र विभागाने पुढील पाच दिवस राज्यात कोरड्या हवामानाचा अंदाज दिला आहे. राज्यात पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांची शेतीकामे सुरू आहेत. 

राज्यात पावसाने उघडीप दिल्यानंतर ‘ऑक्टोबर हीट’चा प्रभाव वाढला आहे. शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अकोला येथे सर्वाधिक ३५.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अनेक ठिकाणी तापमान ३४ अंशांच्या पुढे राहिले. 

हवामान विभागाने मॉन्सूनच्या परतीसाठी पोषक स्थिती असल्याचं सांगितलं. पुढील २ ते ३ दिवसांत मॉन्सून पूर्व उत्तर प्रदेश, पूर्व मध्य प्रदेशच्या उर्वरित भागासह बिहार, झारखंड, ओडीशा, छत्तीसगड, तेलंगणाच्या काही काही भागासह महाराष्ट्र आणि मध्य अरबीसमुद्रातून माघार घेण्याची शक्यता आहे. 

मॉन्सूनच्या परतीच्या सीमा शनिवारी लखनऊ, सटाणा, नागपूर, परभणी, पुणे आणि अलिबाग भागात आहे. पुढील दोन तीन दिवसात राज्याच्या आणखी काही भागातून मॉन्सून माघार घेण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Someshwar Sugar Factory: ‘सोमेश्वर’निवडणुकीत सुनेत्रा पवार पॅनेलची मुसंडी

Baramati KVK: कृषी विज्ञान केंद्र बारामतीला पुरस्कार

Madhu Kambikar Death: ज्येष्ठ अभिनेत्री मधु कांबीकर यांचे निधन

AI in Agriculture: ‘एआय’च्या मदतीने मराठवाड्यात एकरी १२५ टन ऊस

Soybean Price: अकोल्यात सोयाबीनचा सरासरी दर ६५०० रुपयांवर

SCROLL FOR NEXT