Summer Weather Agrowon
हवामान

Vidarbha Heat: विदर्भात उन्हाचा चटका वाढला; विदर्भात देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद

Maharashtra Weather: विदर्भात उन्हाचा चटका चांगलाच वाढला. सलग दुसऱ्या दिवशी विदर्भात देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. आज सकाळपर्यंतच्या गेल्या २४ तासांमध्ये विदर्भातील ब्रम्हपुरी येथे देशातील सर्वाधिक ३८.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती.

Anil Jadhao 

Pune News: विदर्भात उन्हाचा चटका चांगलाच वाढला. सलग दुसऱ्या दिवशी विदर्भात देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. आज सकाळपर्यंतच्या गेल्या २४ तासांमध्ये विदर्भातील ब्रम्हपुरी येथे देशातील सर्वाधिक ३८.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. राज्यातील तापमानात चढ उतार कायम राहतील, असा अंदाज हवामान विभागाने दिला. 

उत्तर भारतील राज्यांमध्ये आणि महाराष्ट्रातही किमान तापमानात चांगली वाढ झाली आहे. तर कमाल तापमानात काहीसे चढ उतार दिसून येत आहेत. उत्तर भारतात आजही काही प्रमाणात सकाळी थंडी जाणवत आहे.

हरिनायातील कर्नूल येथे देशातील सर्वात कमी ८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर विदर्भातील ब्रम्हपुरी येथे देशातील सर्वाधिक ३८.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. 

विदर्भात उन्हाचा चटका वाढला तरी राज्यातील इतर भागात तापमानातील चढ उतार सुरुच आहेत. निफाडे येथील गहू संशोधन केंद्रात आज राज्यातील सर्वात कमी १२.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती.

तर रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यात आजपासून तीन दिवस उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा देण्यात आला आहे. तर राज्यातील तापमाना चढ उतार कायम राहतील, असा अंदाजही हवामान विभागाने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Groundwater Management: भूजलाचा वापर हवा जपूनच

Khaparkheda Pollution Case: प्रदूषणामुळे खापरखेडा ग्रामस्थांचे स्थलांतर

Shetkari Hakk Morcha: कापूस, सोयाबीन, तुरीला भावासाठी बीडमध्ये शेतकरी हक्क मोर्चा

Wheat Variety: ‘फुले समाधान’ गहू वाणाची कुंदेवाडीत विक्रमी २५ टन विक्री

Moneylender Surrender: फरार सावकाराची अखेर शरणागती

SCROLL FOR NEXT