Irrigation Water Management: खानदेशात सिंचन प्रकल्पांमधील जलसाठा कमी होत असून, हा साठा सुमारे ६२ टक्के एवढा आहे. गिरणा धरणातील साठा ४३ टक्के एवढा आहे. जलसाठा बऱ्यापैकी आहे. पण पाणी वापर, मागणी वाढत आहे..नोव्हेंबर २०२५ महिन्यातही चांगला पाऊस झाला. पिकांची हानी झाली, पण पाणी यंदा मुबलक आहे. ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी सतत आहे. रब्बीसाठी शेतकऱ्यांना पाणी मिळाले. भुसावळ (जि.जळगाव) येथील तापी नदीवरील हतनूर धरणासह गिरणा, वाघूर प्रकल्पातील जलसाठा यंदा मुबलक आहे..Water Storage: सातपुड्यातील सिंचन प्रकल्पांत जलसाठा स्थिर.काही दिवसांपूर्वी तापी नदीला प्रवाही पाणी हतनूरमधून पाणी नदीत सोडले होते. गिरणा नदीतही पाणी आहे. खानदेशात धुळ्यातील पांझरा, अनेर, नंदुरबारातील गोमाई, उदय, सुसरी, जळगावात कांग, अंजनी, सुकी, भोकर , वाघूर आदी नद्या मात्र कोरड्या आहेत. गिरणा, तापीनदीकाठची टंचाई दूर झाली आहे. पण गिरणा नदीवरील गिरणा धरणातील साठा कमी झाला आहे. या धरणात आता ४३ टक्के जलसाठा आहे..Water Storage: साक्री तालुक्यात प्रकल्पांतील जलसाठा मुबलक.यंदा हे धरण १०० टक्के भरले होते. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, एरंडोल, धरणगाव, जळगाव या तालुक्यांमधील अनेक गावांमधील टंचाई दूर करण्यासाठी गिरणा धरणातून पाणी यंदाही देण्यात आले आहे. रब्बीत २१ हजार हेक्टरला गिरणा धरणाचा लाभ मिळतो. या धरणातून तीनदा नदीत पाणी सोडले जाते. धरणाची साठवण क्षमता १८ टीएमसी एवढी आहे. .गिरणा धरणातील पाण्याचा चांगला लाभ गिरणा काठच्या गावांना झाला आहे. हतनूर (ता.भुसावळ) धरणातील जलसाठा धरणात यंदाही जलसाठा ५१ टक्के आहे. त्यातून रब्बीला तीन वेळेस पाणी देण्यात आले. दीपनगर (ता.भुसावळ) येथील औष्णिक विद्युत प्रकल्प, वरणगाव (ता.भुसावळ) येथील आयुध निर्माणी, भुसावळ शहर, जळगाव येथील औद्योगिक वसाहत व नदीकाठच्या सुमारे १० गावांमधील टंचाई निवारणार्थ नदीत पाणी सोडले जाते..वाघूरमध्येही जलसाठा घटलातसेच जामनेरातील वाघूर धरणाची साठवण क्षमता आठ टीएमसी आहे. यातही सुमारे १०० टक्के जलसाठा होता. पण पाणी वापर, मागणी वाढली आहे. त्यातही जलसाठा ६० टक्क्यांपेक्षा कमी आहे. जळगाव जिल्ह्यातील अंजनी, तोंडापूर, अभोडा, मंगरूळ, सुकी, मोर, अग्नावती, मन्याड, बोरी या धरणातील साठाही मिळून ६५ टक्क्यांपर्यंत आहे. धुळ्यातील अनेर, पांझरा, अमरावती, सोनवद, बुराई या प्रकल्पातील साठाही सुमारे ६३ टक्क्यांपर्यंत आहे, अशी माहिती मिळाली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.