Heat Wave
Summer HeatAgrowon

Vidarbha Heat Wave : विदर्भ भाजून निघतोय ; देशात अकोल्याने मोडला तापमानाचा उच्चांक

Summer Heat Update : राज्यात उन्हाच्या चटका वाढू लागला आहे. अनेक कमाल तापमानाचा पारा सातत्याने ३६ अंशांपार गेल्याने उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे.
Published on

Pune News : राज्यात उन्हाच्या चटका वाढू लागला आहे. अनेक कमाल तापमानाचा पारा सातत्याने ३६ अंशांपार गेल्याने उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. रविवारी (ता. २) सकाळ पर्यंतच्या २४ तासांमध्ये अकोला येथे देशातील उच्चांकी ३८.५ अंश तापमान नोंदले गेले. आज (ता. २) विदर्भासह राज्याच्या कमाल तापमानातील वाढ कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

रविवारी (ता. ३) विदर्भातील अकोला येथे देशातील उच्चांकी ३८.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर ब्रह्मपुरी येथे ३८.२ अंश तापमान नोंदले गेले. तर रत्नागिरी, मालेगाव, सोलापूर, चंद्रपूर, वर्धा येथे तापमानाचा पारा ३७ अंशापार होता.

Heat Wave
Weekly Weather: कमाल-किमान तापमान वाढणार! राज्यभर उन्हाचा तडाखा

तर पुणे, जेऊर, सांगली, सातारा, परभणी, अमरावती, बुलडाणा, नागपूर, वाशीम, यवतमाळ येथे ३६ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. राज्यातील किमान तापमानात घट झाल्याने थंडी गायब होऊन रात्रीच्या वेळी उकाडा जाणवू लागला आहे.

Heat Wave
Heat Wave : पालघर जिल्ह्याला उष्णतेचा तीव्र तडाखा बसणार

यातच चटका वाढल्याने दुपारच्या वेळी उन्हाच्या झळा तापदायक ठरत आहेत. आज (ता. ३) विदर्भासह राज्याच्या कमाल तापमानातील वाढ कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

रविवारी (ता. २) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान

पुणे---३६.२---१७.७

अहिल्यानगर---३५.२---१८.७

धुळे---३५.५---१५.५

जळगाव---निरंक---१७.०

जेऊर---३६.०---१७.५

कोल्हापूर---३४.२---२०.७

महाबळेश्वर---३१.४---१८.६

मालेगाव---३७.८---१९.२

नाशिक---३५.४---१७.५

निफाड---३३.९---१३.२

सांगली---३६.३---१९.८

सातारा---३६.२---१८.६

सोलापूर---३७.६---२१.५

सांताक्रूझ---३४.८---२३.०

डहाणू---३०.१---२१.९

रत्नागिरी---३७.५---२१.६

छत्रपती संभाजीनगर---३५.२---२०.६

धाराशिव---३५.१---१८.६

परभणी---३६.५---२०.५

परभणी (कृषी)---३५.६---१६.८

अकोला---३८.५---२१.६

अमरावती---३६.६---१९.९

भंडारा---३५.६---१८.०

बुलडाणा---३६.५---२१.४

ब्रह्मपुरी---३८.२---१९.५

चंद्रपूर---३७.२---निरंक

गडचिरोली---३५.६---१७.८

गोंदिया---३४.९---१९.४

नागपूर---३६.२---१९.६

वर्धा---३७.०---२१.२

वाशीम---३६.४---निरंक

यवतमाळ---३६.०---२०.६

सरासरी तापमान (अंश से.)

विभाग---किमान---कमाल

विदर्भ---१७.८---३८.५

मराठवाडा---१६.८---३५.६

पश्‍चिम महाराष्ट्र---१७.५---३७.६

उत्तर महाराष्ट्र---१३.२---३७.८

कोकण---२१.६---३७.५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com