Weather  Agrowon
हवामान

Weather Update: उन्हाचा चटका होतोय असह्य; राज्यातील बहुतांशी भागात किमान आणि कमाल तापमानात आजही वाढ

Heatwave Alert: राज्यात उन्हाचा चटका अधिक जाणवत असून, कमाल आणि किमान तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक भागांत उष्णतेची तीव्रता अधिक असून, कोकणात पुढील तीन दिवसांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Anil Jadhao 

Pune News: राज्यातील बहुतांशी भागात उन्हाचा चटका पुन्हा वाढला आहे. किमान आणि कमाल तापमानात वाढ दिसून आली. तर कोकणात आजपासून पुढील तीन दिवस उष्ण व दमट हवामानामुळे सतर्कतेचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट कायम आहे. राज्याच्या इतर भागातील उन्हाचा चटकाही कायम राहील, असा अंदाज हवामान विभागाने दिला.

राज्यातच नाही तर देशात उन्हाचा चटका वाढत आहे. उत्तर भारतातही थंडीचा कडाका कमी झाला. किमान तापमानातही वाढ दिसून आली. किमान तापमानाचा विचार करता उत्तर प्रदेशात सर्वात कमी तापमानाची नोंद झाली होती. आज उत्तर प्रदेशातील अयोध्या येथे ८.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. तर सर्वात जास्त तापमान आज केरळमध्ये होते. केरळमधील कन्नूर येथे सर्वाधिक ४०.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. 

राज्यातही आज किमान तापमानात वाढ झाली होती. सकाळी हवेत काहीसा गारवा जाणवत असला तरी दुपारी मात्र उन्हाचा कडाका चांगलाच वाढला. निफाड येथील गहू संशोधन केंद्रात ११.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. राज्यातील इतर भागात किमान तापमान १२ ते २० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. तर राज्यातील सर्वाधिक तापमान कोकणात नोंदले जात आहे. 

मागील २४ तासांमध्ये रत्नागिरी येथे ३८.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मुंबईतील सांताक्रुझ येथे ३८.४ अंश सेल्सिअस तापमान होते. कोकणातील तापमान अधिक आहे. राज्यात कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात उन्हाचा चटका अधिक आहे. राज्यातील सोलापूर येथे ३७.६ अंश सेल्सिस तापमान होते. तर सातारा, सांगली, कोलाबा, जेऊर येथे ३६ अंशाच्यावर तापमानाची नोंद झाली. राज्यातील उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Potato New Variety : बटाट्याच्या चार वाणाला मान्यता; बटाटा उत्पादन वाढीसह प्रक्रियेला फायदा

Sugarcane Weighing Irregularities: उसाची काटामारी आणि अपघात रोखण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारचा मोठा निर्णय

Dubai Food Business: दुबई : वाळवंटातील जागतिक व्यापार केंद्र

Maharashtra Politics: सर्वोदयी सपकाळांची पायवाट

Microfinance Loan: सूक्ष्म कर्जाचा विळखा मोठा

SCROLL FOR NEXT