Weather Update Agrowon
हवामान

Rain Update : राज्यातील काही भागात दोन दिवस पाऊस पडणार; चक्रीवादळ उद्या किनारपट्टीला धडकणार

Weather Update : मिगजौम चक्रीवादळ उद्या दुपारपर्यंत आंध्र प्रदेशच्या नेलोर आणि मच्छलीपट्टणम दरम्यान धडकणार आहे.

Anil Jadhao 

IMD Alert : राज्यात कालपासून पावसाची उघडीप आहे. मात्र काही भागात ढगाळ वातावरण होते. पण मंगळवारी आणि बुधवारी राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले. तर मिगजौम चक्रीवादळ उद्या दुपारपर्यंत आंध्र प्रदेशच्या नेलोर आणि मच्छलीपट्टणम दरम्यान धडकणार आहे.

बंगालच्या उपसागरातील ‘मिगजौम’ चक्रीवादळाची तीव्रता वाढत आहे. दक्षिण आंध्र प्रदेश आणि उत्तर तमिळनाडूच्या किनाऱ्याजवळ असलेले हे तीव्र चक्रीवादळ उद्या दुपारपर्यंत आंध्र प्रदेशच्या नेलोर आणि मच्छलीपट्टणम दरम्यान धडकणार असून, बपतला जवळ जमिनीवर येण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या प्रणालीमुळे राज्यात ढगाळ हवामान झाले असून, विदर्भात पावसाची शक्यता आहे.

नैऋत्य बंगालच्या उपसागरातील ‘मिगजौम’ चक्रीवादळ सोमवारी तीव्र झाले असून, चक्रीवादळाचे केंद्र चेन्नईपासून ९० किलोमीटर पूर्वेकडे, तर नेल्लोरपासून १७० किलोमीटर आग्नेयेकडे, पदुच्चेरीपासून २०० किलोमीटर ईशान्येकडे, बपतला पासून ३०० तर मच्छलीपट्टणम पासून ५३० किलोमीटर आग्नेय दिशेला होते.

विदर्भातील काही भागात उद्या म्हणजेच मंगळवारी आणि परवा म्हणजेच बुधवारी काही भागात पावसाचा अंदाज आहे. मंगळवारी यवतमाळ, गोंदीया आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला होता. तसेच बुधवारी यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात विजांसह हलक्या ते मध्यम पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Majhi Ladki Bahin Yojana: 'माझी लाडकी बहीण' योजनेचा जून महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात; मंत्री आदिती तटकरेंची ट्विटद्वारे माहिती

RCGF gas Leak : वायू गळतीमुळे हजारो शेतकऱ्यांची भातशेती नापीक

Wet Drought : सुधागड तालुक्यामध्ये ओल्या दुष्काळाची स्थिती

eKYC : ‘शासन आपल्या दारी’तून घरपोच ई-केवायसी

Animal Vaccination : सोलापूर जिल्ह्यात १६ लाख जनावरांचे मॉन्सूनपूर्व लसीकरण पूर्ण

SCROLL FOR NEXT