Pune Weather News : अरबी समुद्रातील ‘बिपॉरजॉय’ (Biporjoy cyclone) चक्रीवादळामुळे मॉन्सूनच्या वाटचालीवर परिणाम होत आहे. कोकणातील रत्नागिरीपर्यंत पोचल्यानंतर नैर्ऋत्य मोसमी वाऱ्याची (मॉन्सून) महाराष्ट्रातील वाटचाल थांबली आहे.
चक्रीवादळ निवळल्यानंतर मॉन्सूनची प्रगती होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
अरबी समुद्रातील ‘बिपॉरजॉय’ तीव्र चक्रीवादळ गुजरातच्या किनाऱ्याजवळ आले आहे. वादळाचे केंद्र गुजरातच्या जखाऊ बंदरापासून १४० किलोमीटर, नालीयापासून १९० किलोमीटर पश्चिमेकडे, द्वारकेपासून १९० किलोमीटर, आणि पोरबंदरपासून २८० किलोमीटर वायव्येकडे आणि पाकिस्तानच्या कराचीपासून २३० किलोमीटर दक्षिणेकडे होते.
हे चक्रीवादळ गुरुवारी (ता. १५) रात्री उशिरापर्यंत जखाऊ बंदराजवळ भूभागावर येण्याचे संकेत होते.
चक्रीवादळ जमिनीवर येताना ताशी ११५ ते १४० किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहेत. गुजरातमध्ये जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. समुद्राला उधाण आल्याने गुजरात आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर उंच लाटा उसळत आहेत.
सखल भागात समुद्राचे पाणी घुसण्याची शक्यता आहे. वादळामुळे मोठे नुकसान होण्याचा अंदाज आहे. जनजीवनावर परिणाम होणार असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
तळ कोकणात, दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या काही भागात दाखल झालेल्या मॉन्सूनने सोमवारी (ता. १२) दक्षिण भारताच्या काही भागासह, संपूर्ण पूर्वोत्तर राज्ये आणि सिक्कीमसह, पश्चिम बंगाल, बिहारच्या काही भागांत प्रगती केली. त्यानंतर मॉन्सूनची वाटचाल थांबली आहे.
रविवारपर्यंत (ता. १८) ही वादळी प्रणाली राजस्थानमध्ये निवळून जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर मॉन्सून पुढे चाल करण्याचे संकेत आहेत. १८ ते २१ जून दरम्यान दक्षिण द्वीपकल्प आणि पूर्व भारताच्या आणखी काही भागात मॉन्सूनची प्रगती होण्याचा अंदाज आहे.
- रविवारपर्यंत (ता. १८) ही वादळी प्रणाली राजस्थानमध्ये निवळून जाण्याची शक्यता
- रविवारनंतर मॉन्सून पुढे चाल करण्याचे संकेत
- १८ ते २१ जून दरम्यान दक्षिण द्वीपकल्प आणि पूर्व भारताच्या आणखी काही भागांत मॉन्सूनची प्रगती होण्याचा अंदाज
- वादळामुळे गुजरातमध्ये मोठे नुकसान होण्याचा अंदाज
- गुजरात आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर उंच लाटा
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.