Winter Season Agrowon
हवामान

Maharashtra Winter: राज्यात कडाक्याच्या थंडीची प्रतीक्षा

Winter Weather Forecast: आज (ता. २५) राज्यात आकाश निरभ्र आकाशासह किमान तापमानात १ ते २ अंशांची घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

अमोल कुटे

Pune News: जानेवारी महिना अखेरच्या टप्प्यात आला असताना राज्यात अद्यापही कडाक्याच्या थंडीची प्रतीक्षा आहे. राज्यात किमान तापमानाचा पारा १० ते २० अंशांदरम्यान आहे. आज (ता. २५) राज्यात आकाश निरभ्र आकाशासह किमान तापमानात १ ते २ अंशांची घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

मध्य प्रदेश आणि परिसरावर, तसेच दक्षिण केरळच्या किनाऱ्यालगत अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्यांच्या स्थिती निवळून गेल्या आहेत. वायव्य भारतात १२५ नॉट्स वेगाने पश्‍चिमेकडील जोरदार वाऱ्यांचे झोत कायम आहेत. एकामागोमाग येणाऱ्या पश्‍चिमी चक्रावातांमुळे थंडी कमी-अधिक होत आहे. यंदा उत्तर भारतातही थंडीचा कडाका कमी असल्याचे दिसून आले आहे. शुक्रवारी (ता. २४) पंजाबच्या अमृतसर येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ५.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

राज्यात थंडीचा कडाका कमी-अधिक होत असून, उन्हाचा चटका जाणवत आहे. गेले काही दिवस पहाटे धुक्याची चादर पसरल्याचे दिसून येत असून, दुपारच्या वेळी काहीसा उकाडा अनुभवायला मिळत आहे. शुक्रवारी (ता. २४) निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील नीचांकी १०.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यात किमान तापमान १० ते १९ अंशांच्या दरम्यान आहे.

शुक्रवारी (ता. २४) सकाळपर्यंतच्या २४ तासांत सोलापूर येथे ३५.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज (ता. २५) राज्यात निरभ्र आकाशासह किमान तापमानात १ ते २ अंशांनी घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

शुक्रवारी (ता. २४) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान

पुणे---३३.२---१४.२

अहिल्यानगर---३२.८---१२.५

धुळे---२९.५---१०.५

जळगाव---३१.४---१४.४

जेऊर---३४.५---१२.५

कोल्हापूर---३२.२---१९.२

महाबळेश्‍वर---२९.१---१७.०

मालेगाव---२९.२---१४.८

नाशिक---३१.२---१३.४

निफाड---३०.२---१०.४

सांगली---३४.१---१७.२

सातारा---३३.२---१५.१

सोलापूर---३५.६---१८.६

सांताक्रूझ---३१.५---१७.१

डहाणू---२७.४---१७.०

रत्नागिरी---३३.४---१९.२

छत्रपती संभाजीनगर---३२.४---१५.८

धाराशिव---३१.८---१४.४

परभणी---३३.४---१४.५

परभणी (कृषी)---३२.१---११.६

अकोला---३४.१---१५.८

अमरावती---३३.०---१४.६

भंडारा---३०---१५

बुलडाणा---३२---१७

ब्रह्मपुरी---३५.३---१४

चंद्रपूर---३२---निरंक

गडचिरोली---३२---१४

गोंदिया---३१.४---१६.४

नागपूर---३२.४---१५

वर्धा---३३---१५

वाशीम---३४.२---१८.४

यवतमाळ---३१.६---१४.२

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Road Committee: शेतरस्त्यांसाठी समिती स्थापन करणार : फडणवीस

Mahakrushi App: ‘महाकृषी’ ॲपमुळे कामकाजात पारदर्शकता

APMC Cess Scam: सेस चोरीप्रकरणी ‘पणन’ने अहवाल मागविला

Maize Production: राज्यात यंदा खरिपात मका क्षेत्र वाढीचा अंदाज

Raisin Illegal Import: चीनमधून बेदाण्यांची बेकायदा आयात थांबवा

SCROLL FOR NEXT