Rain News  Agrowon
हवामान

Rain Update In Parbhani : अकरापैकी सहा वर्षे पडला सरासरीपेक्षा कमी पाऊस

Rain : परभणी जिल्ह्याची जून ते ऑक्टोबर या कालावधीतील पावसाची (वार्षिक) सरासरी ८३८.९० मिमी आहे.

Team Agrowon

Parbhani Rain News : परभणी जिल्ह्याची जून ते ऑक्टोबर या कालावधीतील पावसाची (वार्षिक) सरासरी ८३८.९० मिमी आहे. मागील अकरा (२०१२ ते २०२२) पैकी ६ वर्षी सरासरीपेक्षा कमी, तर केवळ २ वर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस झालेला आहे. गतवर्षी (२०२२) वार्षिक सरासरी पावसात ९.४६ टक्के तूट आली होती.

२०१९ पर्यंत परभणी जिल्ह्याची जून ते ऑक्टोबर या कालावधीत (वार्षिक) पडणाऱ्या पावसाची सरासरी ७७४.५९ मिमी होती. २०२० च्या मे महिन्यातील शासन निर्णयानुसार वार्षिक सरासरीमध्ये सुधारणा करण्यात आली आहे.

त्यानुसार जानेवारी ते डिसेंबर या कालावधीतील सरासरी ९३०.३० मिमी आहे. जून ते ऑक्टोबर या कालावधीतील सरासरी ८३८.९० मिमी आहे. मोसमी पावसाच्या कालावधीतील जून ते सप्टेंबर महिन्याची सरासरी ७६१.३ मिमी आहे. जिल्ह्यात मागील ११ पैकी २०१२, २०१४, २०१५ २०१७,२०१८,२०२२ या ६ वर्षात सरासरीपेक्षा कमी, तर २०१३, २०१६, २०१९, २०२०, २०२१ या ५ वर्षांत सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला.

त्यात २०२१ मध्ये ११९६.४० मिमी म्हणजेच १४२.६१ टक्के, सरासरीच्या तुलनेत ३५७.४ मिमी एवढा जास्त पाऊस झाला. तो सरासरी पावसाचा उच्चांक होता.

गतवर्षी (२०२२) जूनमध्ये सरासरी १४५.३ मिमीपैकी १३७.४ मिमी (९४.६ टक्के), जुलैमध्ये सरासरी २१९.२ मिमी अपेक्षित असताना प्रत्यक्षात ३१२.९ मिमी (१४२.७ टक्के), ऑगस्टमध्ये सरासरी २२७.८ मिमीपैकी ५९.५ मिमी (२६.१ टक्के), सप्टेंबरमध्ये १६९ मिमीपैकी १४०.७ मिमी (८३.३ टक्के), ऑक्टोबरमध्ये सरासरी ७७.६ मिमी अपेक्षित असताना प्रत्यक्षात १०८.९ मिमी (१४०.३ टक्के) पाऊस झाला.

जुलैमध्ये सततचा पाऊस, तर ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यांत दीर्घ खंडामुळे उत्पादनावर परिणाम झाला. ऑक्टोंबरमध्ये जास्त पाऊस झाल्यामुळे काढणीच्या अवस्थेतील पिके भिजल्याने मालाच्या दर्जावर परिणाम झाला.

परभणी जिल्हा जून ते ऑक्टोबरमधील तुलनात्मक पाऊस स्थिती (मिलिमीटरमध्ये)

वर्ष - सरासरी - प्रत्यक्ष झालेला पाऊस- टक्केवारी

२०१२- ७७४.५९- ६३५.७ - ८२.०८

२०१३ -७७४.५९- ८८१.१८ - ११३.८५

२०१४- ७७४.५९ - ३५७.७३ -४८.१८

२०१५ - ७७४.५९ - ३४०.४६ - ४३.९५

२०१६ ७७४.५९ - ८३८.०९ - १०८.२६

२०१७- ७७४.५९- ५४६ - ७०.५०

२०१८ - ७७४.५९- ४६८.०१- ५९.४८

२०१९ - ७७४.५९ - ७९१.६- १०२.१९

२०२० - ८३८.९०- ९४०.९० - ११२.१४

२०२१- ८३८.९०- ११९६.४०- १४२.६१

२०२२- ८३९.९०- ७५९.३०- ९०.५१

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Subsidy for Equipment: पन्नास टक्के अनुदानावर पंप, रोटाव्हेटर, कडबाकुट्टी

Solapur Water Shortage: सोलापुरात टंचाई निवारणासाठी ९.६७ कोटींचा कृती आराखडा

Drought Compensation: दुष्काळग्रस्तांना हेक्टरी एक लाखाची मदत द्या : राष्ट्रवादी

Rabi Sorghum Seeds: रब्बी ज्वारीचे बियाणे १०० टक्के अनुदानावर

Fisheries Business: मत्स्य व्यवसाय विकासासाठी मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना

SCROLL FOR NEXT