Weather Agrowon
हवामान

Maharashtra Heatwave: तापमानाची होळी पेटली; महाराष्ट्रात उन्हाने गाठला ३९.४ अंशांचा टप्पा

Maharashtra Weather Forecast: सोलापूरमध्ये बुधवारी देशातील उच्चांकी ३९.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. राज्यभरात उन्हाचा तडाखा वाढत असून अनेक शहरांमध्ये तापमान ३८ अंशांच्या पुढे गेले आहे.

अमोल कुटे

Pune News: सूर्य तळपायला लागल्याने तापमानाची होळी पेटली आहे. कमाल तापमानाचा पारा चांगलाच वाढू लागला आहे. उन्हाचा चटका वाढल्याने बुधवारी (ता. ५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर येथे देशातील उच्चांकी ३९.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज (ता. ६) राज्यात कमाल तापमानातील वाढ कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

बुधवारी (ता. ५) सकाळपर्यंतच्या २४ तासांत सोलापूर पाठोपाठ चंद्रपूर येथे ३९ अंश तापमान नोंदले गेले. मध्य महाराष्ट्रातील जेऊर, सांगली, मराठवाड्यातील परभणी, तसेच विदर्भात अकोला, ब्रह्मपुरी येथे तापमान ३८ अंशांच्या पुढे गेले होते. कोल्हापूर, अमरावती, भंडारा, गडचिरोली, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ येथे तापमानाचा पारा ३७ अंशांच्या पार पोहोचला होता.

तापमानात वाढ होत असतानाच काही ठिकाणी दुपारनंतर अंशतः ढगाळ हवामान पाहायला मिळत आहे. कमाल आणि किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक असल्याने दिवस रात्रीच्या उकाड्यातील वाढ कायम आहे. यातच बुधवारी (ता. ५) सकाळपासून अनेक ठिकाणी जोरदार वाहत असल्याचे दिसून आले आहे. आज (ता. ६) राज्याच्या तापमानातील वाढ कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

बुधवारी (ता. ५) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)

ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान

पुणे---३६.८---१६.९

अहिल्यानगर---३४.९---१८.३

धुळे---३४.५---११.५

जळगाव---३५.७---१७.२

जेऊर---३८.५---१७.५

कोल्हापूर---३७---२२.५

महाबळेश्वर---३१.६---१७.५

मालेगाव---३५---निरंक

नाशिक---३५---१५.२

निफाड---३४---११.६

सांगली---३८.४---२१

सातारा---३६.८---१९.५

सोलापूर---३९.४---२१.८

सांताक्रूझ---३६.८---१९.७

डहाणू---३२.८---२०

रत्नागिरी---३४.४---२१.८

छत्रपती संभाजीनगर---३५.५---१९.४

धाराशिव---३६.६---निरंक

परभणी---३८.०---१८.७

परभणी (कृषी)---३७.३---१६.४

अकोला---३८.५---१९.२

अमरावती---३७---१८.३

भंडारा---३७---१८.०

बुलडाणा---३४.८---१८.५

ब्रह्मपुरी---३८.२---१८.३

चंद्रपूर---३९---निरंक

गडचिरोली---३७.४---१६.८

गोंदिया---३६---१७.०

नागपूर---३७.६---१९.६

वर्धा---३७.५---१८.०

वाशीम---३६.६---निरंक

यवतमाळ---३७.२---१८.६

सरासरी तापमान (अंश से.)

विभाग---किमान---कमाल

विदर्भ---१६.८---३९

मराठवाडा---१६.४---३८

पश्‍चिम महाराष्ट्र---१६.९---३९.४

उत्तर महाराष्ट्र---११.६---३५.७

कोकण---१९.७---३६.८

शुक्रवारी (ता. ७) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये देशातील कमाल तापमानाचा अंदाज दर्शविणारा नकाशा. (स्रोत : हवामान विभाग)

पिवळ्या व लाल रंगछटा - ३८ अंशांपेक्षा अधिक तापमान

हिरव्या रंगछटा - ३२ ते ३८ अंश तापमान

निळ्या रंगछटा - २४ ते ३२ अंशापेक्षा कमी तापमान

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये चढ उतार ; टोमॅटो दर टिकून, केळीला मागणी, आल्याला उठाव तर गवारची आवक टिकून

Sugarcane FRP Dues: थकीत 'एफआरपी'प्रश्नी ८१ साखर कारखान्यांना नोटिसा, सहकारमंत्री बाबासाहेब पाटलांची विधानपरिषदेत माहिती

Cotton Productivity Mission: कापूस उत्पादकता अभियान फसण्याचे संकेत

Rain Update In Maharashtra: कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील ६ जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अंदाज 

Crop Insurance: पीकविमा योजनेत शेतकऱ्यांना वेळेत नुकसान भरपाई मिळेना; कृषिमंत्र्यांची कबुली

SCROLL FOR NEXT