Maharashtra Rain  Agrowon
हवामान

Maharashtra Rain : पश्चिम महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी सरी

Pre Monsoon Rain : राज्यातील काही भागात मॉन्सूनोत्तर पावसाचा जोर कमी झाला आहे. तर कोकण, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी अजूनही जोरदार पाऊस पडत आहे.

Team Agrowon

Pune News : राज्यातील काही भागात मॉन्सूनोत्तर पावसाचा जोर कमी झाला आहे. तर कोकण, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी अजूनही जोरदार पाऊस पडत आहे. बुधवारी (ता.२३) सकाळी आठ वाजेपर्यंत सातारा जिल्ह्यातील वाठार-स्टेशन येथे ७७ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. पावसामुळे भात, सोयाबीन, कापूस, झेंडू, बाजरी पिकांच्या नुकसानीत वाढ होत असून शेतकरी अडचणीत येत आहे.

गेल्या पंधरा दिवसांपासून कडक ऊन पडत असल्याने बाजरी, सोयाबीन, कापूस पिकांची काढणी वेगाने सुरू होती. अनेक ठिकाणी मजुरांचा तुटवडा भासत असल्याने काही ठिकाणी इर्जिक पद्धतीने पिके काढली जात होती. परंतु मागील आठवड्यापासून होत असलेल्या मॉन्सूनोत्तर पावसास सुरुवात झाल्यानंतर पिकांचे नुकसान होत आहे. शेतकरी अडचणीत येत असताना रब्बीच्या तोंडावर नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी शेतकरी करू लागले आहेत.

कोकणातील रायगड, ठाणे, रत्नागिरी जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी हलक्या सरी बरसत आहे. तर, रत्नागिरीतील असुर्डे येथे ७२ मिलिमीटर पाऊस पडला असून चिपळूण ४० मिलिमीटर, वहाळ ३२, देवरुख, तुळसानी येथे ३३ मिलिमीटर पाऊस झाला. त्यामुळे निसवण्याच्या अवस्थेत असलेल्या भात पिकांचे मोठे नुकसान होत आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात मॉन्सूनोत्तर पावसाचा रोज दणका सुरू आहे. दिवसभर ऊन, तर सायंकाळनंतर जोरदार पाऊस पडत आहे.

भोसरी येथे सर्वाधिक ५७ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. यामुळे रस्ते, ओढे, नाले भरून वाहू लागले आहे. जोरदार पावसामुळे या भागातील भाजीपाला व पिकांचे नुकसान झाले आहे. सोलापूरातील किणी येथे ७० मिलिमीटर, साताऱ्यातील वाठार-स्टेशन येथे ७७ मिलिमीटर, आनेवाडी ३७, केळघर, करहर, पिंपोडे-बु ३५, किन्हई ३८, वडूज, कातरखटाव ३३, खंडाळा ३१, पाचवड ४५, पाचगणी ४१, सांगलीतील मांजर्डे येथे ३२ मिलिमीटर पाऊस झाला. या पावसामुळे शेतकऱ्यांची धावपळ होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Farming : डोंगराळ, जंगलमय करूळची दुग्ध व्यवसायात आघाडी

Saline Land Improvement : खारपाणपट्टा जमीन सुधारणेवर लक्ष द्या

River Conservation : आमदारांनो, नद्यांचे पालक व्हा...

Crop Advisory : कृषी सल्ला : राहुरी विभाग

Assembly Election Kolhapur : कोल्हापुरातील ८ साखर कारखानदारांनी भरला विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज

SCROLL FOR NEXT